त्याला तयारी पाहिजे!
सध्या रोजच्या बातम्या पहिल्या , ऐकल्या , वाचल्या कि कुठेतरी संकट , अडचणी आजूबाजूला वावरताहेत याची जाणीव होते. मग ते वादळ असो , बुशफायर असो , किंवा गेल्या वर्ष दीडवर्षातला जीवघेणा अनुभव असो. पण संकटाशिवाय जगण्याला मजा ती काय ? एकदम self-help पुस्तकातला किंवा motivational quotes मधला dialogue वाटतो ना वाचायला. पण येणारच आहेत हि छोटीमोठी वादळे हे माहित असतेच कि रोज सकाळ झाल्यावर. नव्याने दिवसाची सुरवात केल्यावर , फरक एवढाच कधी वाघोबा म्हणावे लागते तर कधी वाघ्या. मग विचार करताना मनात आले ; आपल्या प्रत्येकाचा संकटाला फार काय छोट्यामोठ्या अडचणीला तोंड देण्याचा , react होण्याचा algorithm वेगवेगळा असतो. पद्धत वेगळी असते. कधी रणछोडदास बनणे पसंत करतो तर कधी आ बैल मुझे मार! तर कधी calculated risk. अडचण वेगळी , परिस्थिती वेगळी , माणूस वेगळा , प्रतिक्रिया वेगळी. ' आई ' ' बाबा ' असे मोठे भोकाड पसरण्यात दादा , ताई , मित्रमैत्रिणी अशी भर पडत पडत एक दिवस आपण एकटेच या सगळ्याला सामोरे जायला तयार होतो , आणि मग नंतर कुणाच्या तरी अशाच हाकेला ओ देण्याचा प्रवास सुरु होतो. आस्तिकांन...