कहानी पोटली बाबा की!
गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीच्या एका शिकाऊ ड्रायव्हरला सिग्नल ला शांतपणे उभे असताना मागून येऊन एकाने धडक दिली. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. गाड्यांचे नुकसानही झाले नाही. हे सगळे ऐकल्यावर “ चला बरे झाले काही वाईट झाले नाही” असे आपसूकच तोंडून निघाले. पण शिकवू ड्रायव्हर पटकन म्हणाला " Now I have a car crash story to share, my first crash story" फार मजा वाटली. खरच किती गोष्टी वेल्हाळ आहोत आपण . सगळ्याची एक गोष्ट असते. लहानपणी चिऊ काऊ करत सुरू झालेल्या गोष्टी अशा रोजच्या अनुभवांपर्यंत येऊन पोहोचतात. मनोरंजनाचे पहिले साधन जे आपल्याला कळते तेच असते गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे. नुसत्या कल्पना , मग त्या कल्पनांमध्ये अनुभव , कधी एखादा सहज न पचनी पडणार सल्ला. या सगळ्याचे मिश्रण करून तयार होणाऱ्या गोष्टी तर महत्त्वाच्याच पण त्याहीपेक्षा रंजकदार पद्धतीने त्या सांगणारा महत्त्वाचा. सांगणारा गोष्टीची मजा वाढवतो किंवा घालवतो. आई बाबा , आजी आजोबा यांच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकताना गोष्टी इतकेच त्या सांगणाऱ्याच्या आवाजाने , अव...