दिवस
" आकाशवाणी पुणे , सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे." , किंवा ' इति वार्ताः " अशी दिवसाची अनेक वर्षे सुरवात होत असल्याने सकाळी सकाळी गुगल ला काहीतरी वाजवायला लावल्याशिवाय सकाळच्या कामांना गती येत नाही. माझे आणि त्या गूगल काकूंचे फार संख्या नाही. लावायला एक सांगितले कि लागते भलतेच. कुमार गंधर्वांचा , अक्षय कुमार करणारी गूगल मग डोक्यात जाते बऱ्याचदा. चूक तिची नसतेच. एक तर माझा accent तिला कळत नाही नाहीतर माझी आणि तिची गती मॅच होत नाही. असेच आज सकाळी काहीतरी लावताना तिने अचानक , " बुद्धा वीकली" नावाचा यु ट्यूब चॅनल लावला. वैतागून स्टॉप म्हणायच्या आत एक शांत गंभीर आवाज , 'Chant with us ." म्हणाला आणि मी थबकले , काय म्हणतोय ऐकू या म्हणून ऐकत राहिले. आधी दोन एक मिनिटे काहीतरी माहित सांगत होते पण माझे लक्ष त्यातून उडालेले होते. त्या तिबेटी भिक्कूच्या आवाजामुळे हा आता ' ओम मणी पद्मे हम ' म्हणतो कि काय ? मग त्या वाक्य बरोबर डोळ्यापुढे आलेली अनेक बुद्ध लेण्यांमधली चित्रे , तिसरी-चौथीमध्ये असतानाची काळ्यापांढर्या दूरदर्शन वरची नेपाळ मधली स्मगल...