Are you a local?

हा प्रश्न मुळ गाव सोडल्यानंतर फार वेळा समोर येतो , मन नक्की त्याजागेत कधी रमते ? हाच तो क्षण असे pin point करता येते कां ? Electricity च्या बीलावर नांव आले की ? मतदार यादीत आलात की ? घरदार झाले की ? नक्की कधी ? Office मधले सहकारी पहिल्या नावाने ओळखू लागले की ? नेहमीचा कॉफीवाला न मागता order तयार करू लागला की ? राहता तिथले प्रश्न आपलेसे वाटले की ? देश बदलला असेल तर भाषा , अन्न आपलेसे केले की ? हे सगळे घडूनही मन आपल्या मुळ गावाची देशाची ओढ धरून असतेच. मग नक्की काय घडते आणि हा प्रवास सुरू होतो ? माझ्या रोजच्या रस्त्यावर एक bottle brush tree आहे , एक गुलमोहोरही आहे. पुर्वी हा गुलमोहोर पाहीला की मला पुण्याचा मे महीना आठवायचा , मन उन्हाळ्यात फेरफटका मारून यायचे आणि आठवणीत रमायचे.... या वर्षी वसंतात bottle brush अचानक फुललेला दिसला आणि मी गुलमोहराची आणि पर्यायाने उन्हाळ्याची वाट पाहू लागले. मनाने दक्षिण उत्तर गोलार्धाचे , उन्हाळी मह...