
पहिलीच्या वर्गातल्या wobbly tooth चर्चेने हळूहळू tooth fairy आणि Santa कडे मोर्चा वळवला. प्रत्येक गटात असतोच अश्या , एका धाडसी , confident मुलाने “I know fairies don't exist and there is no Santa” असे म्हणताच सगळा गलका एकदम शांत झाला. एकीच्या डोळ्यात पाणी पण आले . एक छोट्याश्या मुलीने मात्र ठसक्यात , “I know they don't exist but I believe in them and their magic. ” असे म्हटले आणि माझ्याजवळ येऊन “ Do you believe in them, Mrs K? ” असे म्हटले मात्र आणि विचारांचा एक मोठा गुंता मनात तयार झाला. तिने हे किती सोपे केले होते स्वतःसाठी , माहित आहे ते खरे नाहीत पण मी विश्वास ठेवते आहे त्यावर. आपणही हेच करतो कि , अनेक माहित असलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतोच कि फक्त तिचा पुढचा भाग , च्या जादूवर विश्वास असणे मोकळेपणाने मान्य करण्याचा , तो वयानुसार हरवत जातो. खरेतर अवतीभोवती किती जादू घडत असतात पण प्रत्येक घटनेचे विवेचन , एक्सप्लेनेशन , reasoning देऊन देऊन आपण त्यातली जादू घालवूनच टाकतो. सकाळी उठून झाडावरची नवी पाने फुले पाहणे यात मॅजिक आहेच कि. द...