ख्वाबिदा
ख्वाबिदा - माझ्या मनात डोक्यात केव्हाही , कधीही येणारे विचार , त्या क्षणी जरी मला ते रँडम वाटले तरी मलाही माहितेय त्यांचा कुठे तरी माझ्या भूत , वर्तमान यांच्याशी संबंध असतोच. कोणताच विचार हा आभाळातून पडल्यासारखा किंवा कुत्र्याच्या छत्रीसारखा उगवत नक्कीच नाही. मग कां येतात ते मनात ? मांडावेसे , सांगावेसे वाटतात म्हणजे तरी काय ? कोणीही लिहते , बोलते म्हणजे तरी नक्की काय करते ? प्रत्येक विचारातली , लिखाणातली पात्रे , प्रसंग काल्पनिक म्हणजे तरी काय ? १००% कल्पना असे काही असते कां ? पण १००% सत्य हे तरी असते कां ? आपले विचार सत्य आणि कल्पना या तळ्यात मळ्यात सदैव वावरत असतात. एखाद्या क्षणी हि रेषा धूसर होते आणि मग उमटतो तो आपल्या मनाचा प्रवास. सत्य , असत्य , कल्पना , वास्तव या पलीकडचा. रिपोर्ताज लिहणारे वास्तव मांडतात. पण ते तरी वास्तव कुठे असते ? ते त्यांच्या मनाला पटलेले विचारांनी दाखविलेले वास्तव असूच शकते. माणसे वेगळी मने वेगळी वास्तव वेगळे. सत्य आणि कल्पना या दोघांच्या मिश्रणातून आपल्याच मनात आपले एक जग असते. ते प्रत्येक व्यक्तीकडे घटनेकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून ब...