वाचू आनंदे
परवा लायब्ररीत लहान मुलांच्या section मध्ये Ruskin Bond यांचे The Road To Bazaar हे पुस्तक दिसले आणि अक्षरश : memories flooded back! देहरा गावच्या बाजारातील सगळ्या गोष्टी आठवू लागल्या . कोकी , मुकेश , सुरज शेजारी पाजारीच वावरत असल्यासारखे वाटले . खरे पाहता हे पुस्तक शेवटचे वाचले त्याला१५ - २० वर्ष तर नक्कीच झाली , पण ते जसेच्या तसे लक्षात राहण्याची जादू त्या पुस्तकात , लिखाणात होती . असे वाचतानां बर्याचदा होते , आपण जणू त्या कथेचा भागच होतो . नाकतोड्यांची शर्यत लावणार्या या मुलांचे आपणही एक सवंगडी आहोत असे वाटायला ...