कम्फर्टर

 

 गेले आठ दहा दिवस सतत पाऊस पडतोय. Autumn सुरु होऊन महिना झाला असला तरी फारशी थंडी जाणवत न्हवतीच. पण या पावसाने हवेत दोन दिवसापुरता तरी गारवा आणलाच, आणि मग कपाटातल्या जाड पांघरूणाना बाहेर यायचे वेध लागले. रजई, दोहर, गोधडी, doona काहीही म्हणा आहेत हे सगळे कॅम्फर्टर.

इथल्या अल्पकाळ टिकणाऱ्या थंडीमुळे हि सगळी पांघरुणे वर्षाचा बराच काळ कपाटात hibernation mode मधेच असतात. त्यामुळे बाहेर निघाली कि डांबराच्या गोळ्या, लवंगा, वेखंड, लव्हेंडर बॉल्स असले असंख्य वास मन भरून टाकतात. वातावरण उबदार करून टाकतात. त्या बिचार्या पांढऱ्याशुभ्र naphthalene बॉल्स ना डांबर गोळ्या का म्हणतात हे एक ना सुटणारे कोडे आहे. समोर येणारी प्रत्येक घटना अनेक आठवणी नेहमीच जाग्या करते. या डांबर गोळ्यांचा वास आणि माझ्या सासूबाईंचे कपाट हे डोक्यातले एकदम फिट समीकरण आहे. त्यांचे कपाट उघडले कि कोणत्याही घडीखालून डांबराच्या गोळ्या निघतच. फारसा आवडीने ना घेतला जाणारा हा वास, आम्हा सगळ्यांच्या आठवणींच्या कप्प्यात कधी जाऊन बसला ते कळलेच नाही. अशा या जपून ठेवलेल्या धुवट साडीच्या गोधडीची सर कोणत्याच पांघरुणाला येणार नाही. छोट्यामोठ्या दुखण्यावर औषधाचे अर्धे काम तर आजीची गोधडीचं करते. आया आज्यांच्या साड्यांचे असे रिसायकलिंग अव्याहत चालूच असते. वर्षानुवर्षे या आपण जपून ठेवतोच. किती जीव लावतो आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींना. वास्तूंमध्ये अडकलोय म्हणावे तर त्यात नाही पण त्याबरोबर निगडित असेलेली माणसे,आठवणी, ते क्षण यात अडकलेले असते आपले मन. वस्तू काय वापरून खराब होतिल,तुटतील फुटतील पण या आठवणी टिकणारच.काही वेळा विसराव्या वाटतात पण नाहीच जमत आपल्याला ते. असतातच कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात लपलेल्या. कपाट उघडून ठेवणीतले काही काढले कि त्याबरोबर एकावर एक फ्री असलेल्या.

माझे स्वतःचे सुई दोऱ्याशी फारसे संख्या नाही. कामचलाऊ, वेळ मारून नेण्यापुरते जमते त्यामुळे छानसे  पॅचवर्क करून एक तरी गोधडी शिवायची हे बकेट लिस्ट मधले टार्गेट आहे. आपला कंफर्ट असलेले पांघरूण द्यायची इच्छा हि होत नाही कुणा दुसऱ्याला. कम्फर्ट झोन असतो तो आपला.त्याच्या उबेत सुरक्षित वाटते हे नक्की.

तसाही माणसाचा स्वभाव कम्फर्ट शोधत असतोच नेहमी.माणसे, अन्न,कपडे,पुस्तके,काम जे काही comfortable ते हवेच असते आपल्याला. साधी चप्पल घेताना पटकन हि comfortable नाहीय म्हणतो आपण.बदल स्वीकारायला मनाचा कोपरा सदैव रेझिस्ट करत असतोच. चाललंय ना मग कशाला बदला! पण हाच कम्फर्टर जाचक व्हायला लागतो कधी तरी.उन्हे वाढायला लागली कि गुंडाळून योग्यवेळी कपाटात गेलेलाच बरा,पुढच्या थंडीत बाहेर यायला. Nostalgia पण असाच पदार्थात मिठापुरताच. पुन्हा कोपऱ्यात बंद करून रोजच्या आयुष्याला समोर जायला मदत करण्यापुरता. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक नव्या आठवणींचे पॅचवर्क करत नवी गोधडी नवा कम्फर्टर तयार करायला मदत करण्यापुरताच! म्हणजे मग पुन्हा निसर्गाचे चक्र फिरले कि त्या उबेत गुरफटायला हे भरकटणारे मन मोकळेच.



-श्रुतकिर्ती

०९/०४/२०२१

Comments

  1. हा लेख वाचताना, मला माझी लहानपणीची शाल आठवली. तिची आठवण अजूनही comforting आहे. Thanks श्रुती ~ CK

    ReplyDelete
    Replies
    1. Comforting आठवणीच बहूधा लक्षात राहतात.. बाकीचे उडून जाते.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान