Selective Memory.
घरातून निघताना केलेली ग्रोसरी लिस्ट चुकून घरीच राहीली , पण परत आल्यावर पाहिले तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणली गेली होती. पटकन स्वतःच्या बुद्धीला , स्मरणशक्तीला शाबासकी दिली आणि पाच मिनिटात भ्रमाचा भोपळा फुटला. कशाचा तरी दोन दिवसांपूर्वीच बदललेला पासवर्ड जाम आठवत नव्हता दोन्हीही मीच होते , दिवसही तोच होता , मेंदू ही तोच ; पण लक्षात काही राहिलं.काही नाही.अशा कितीतरी गोष्टी नकळत पक्क्या लक्षात राहतात पण कितीतरी लक्षात ठेवूया ठेवूया म्हणूनही विसरल्या जातात. कॉलेजमध्ये असताना , टीव्ही पुढे बसून जर्नल्स लिहिणे हा माझा आवडता उद्योग होता. झी सिनेमा वर बच्चन चे सिनेमे आणि असंख्य गाणी लागायची. फिजिक्स , स्टॅटिस्टिक्स जर्नल मध्ये काय लिहिले ते आज मुळीच आठवत नाही पण आजही ती नाईन्टीज मधली गाणी , काही तर टुकार म्हणावी अशीच असलेली शब्दनशब्द डोक्यात बसलीत. एक डायलॉग ऐकला की , पुढचा आठवावा इतके ते सिनेमे देखील लक्षात राहिलेत. काहीवेळा एखादी घटना , प्रसंग , पार डिटेल मध्ये आठवतो. त्यावेळी आजूबाजूला असणारी माणसे , त्यांचे कपडे , घरदार सगळ्या सकट! पण कधीकधी त्याच लोकांना समोर बघूनही त्या...