मन वढाय वढाय
भीती या शब्दांचीच कधी कधी भीती वाटायला लागते. भीती , एन्झायटी या शब्दांकडे बाहेरून त्रयस्थ म्हणून बघणे आणि स्वत: त्यातून जाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. डोळ्यात टचकन पाणी येणाऱ्याला इमोशनल म्हणून हिणवणे , भित्र्यभागूबाईची उपमा देणे फार कॉमन आहे. स्वतः त्या ठिकाणी नसताना सल्ला देणेही फारच सोपे आहे नाही. कां पण हे सगळे वाटले आज ? चार-पाच आठवड्यांपूर्वी ठरले कि एक ठराविक वीकेंड एकीकडे. सकाळी लवकर जमून परतण्याची घाई न असण्याचा. भेटण्याच्या ओढीने तयाऱ्या सुरु झाल्या. उत्साहाच्या भरात एका अगदी छोटयागोष्टीकडे माझे जरा दुर्लक्षच झाले. मैत्रिणीच्या घराचा पोस्टल ऍड्रेस आता बदललाय. जिपीएस शिवाय तिच्या घरी जायला यायला आत्ता कुठे जमायला लागले आणि ताईंनी घरच बदलले. झाले! डाव्या उजव्याचा घोळ घालणारी मी गूगल काकूंनी टर्न लेफ्ट म्हटले कि तीन लेन बदलत बरोबर उजवीकडे टर्न घेते. त्यामुळे हे लक्षात आल्यावर आदल्यादिवशी पासून मोर्चे बांधणी सुरु झाली. तीनचार महत्वाची वळणे बघून ठेवली. मनाला जे होईल ते होईल वगैरे समजावत दुसरा दिवस उजाडला. आणि गूगल मॅप्स ला गम्मत करायचा मूड आला. आणखीनच भलता रस्ता तिने ...