चल रे भोपळ्या टुणूक टुणूक
क धीतरी कचऱ्यातून पडलेल्या बिया तून एक छोटासा वेल आला.पाने कशा सारखी वाटतात , याच्या चर्चेमध्ये भोपळ्याला बहुमत मिळाले. आणि डोळ्यासमोर आली , टुणुक टुणुक उड्या मारत भोपळ्यात बसून जाणारी म्हातारी. हुशार , चतुर आणि आश्वासनाच्या बळावर संकटांना थोपवणारी. आमिष दाखवून त्यांना टाळणारी. वेळ मारून नेणारी. मुलीच्या घरी जायच्या ओढीने , संकटे पार करणारी. का सांगतात असली तात्पर्य असणाऱ्या रूपककथा ? त्याही अगदी लहानपणी. ताटातली भाजी ओळखण्याच्या आधी हा गोष्टीतला भोपळा माहीत होतो लहान मुलांना. तेव्हा त्या म्हातारीशी वाघ कसा बोलला ? ती भोपळ्यात कशी बसली ? असले आचरट प्रश्न ही पडत नाहीत. गुण्यागोविंदाने गोष्ट ऐकत पिढ्यान पिढ्या झोपी जातात. हळूहळू या कथांतून मन मेंदू बाहेर पडतो. जग कळायला लागतं. अशाच कोणत्या तरी कारणाने , या गोष्टी वेगळ्या अर्थाने , रूपाने , समोर उभ्या राहतात. नकळत तेव्हा न कळलेला अर्थ आज उमजायला लागतो. म्हातारी सारखे आपणही कितीदा तरी वागतो , हे आठवते आणि हसूही येते. चार दिवसांनी परत येते या आशेवर , आपणही म्हातारी सारखे किती जणांना आणि...