कोण कुठले...
काल अनिल अवचट गेले आणि माझ्यासारख्या असंख्याना , ज्यांनी त्यांना नुसतेच चित्रात पहिले होते , पुस्तकात वाचले होते , खरंच मनापासून वाईट वाटले. कितीतरी जण असतात असे. कुठेतरी वाचून , ऐकून , बघून आपलेसे वाटायला लागलेले. जवळच्यां हु न ही जवळचे झालेले. ते कधी ओळखणारही नसतात. पण ती अपेक्षाही नसतेच ना. पहिल्यांदा कधीतरी त्यांचे लिहलेले , बोललेले वाचतो ऐकतो आणि भारावल्यासारखे सगळेच वाचायला ऐकायला लागतो. काही जणांच्या बाबतीत हे भारावलेपण क्षणिक असते तर काहींचे जन्मभर पुरते. कां एवढे भारून जातो ? अगदी फॅन क्लबचे मेंबर होतो ? बऱ्याचदा आवडणारे , करावेसे वाटणारे पण न जमणारे , न झेपणारे ते करत असतात. त्या वाटेवरचा एखादा तरी पाडाव चालायची इच्छा असते मग जमो किंवा न जमो. तर काही वेळा या सगळ्याच्या पलीकडे मनाला काहीतरी क्लिक झालेले असते जे मेंदूला उलगडून दाखवताही येत नाही. हे सगळे लोक काय खातात पितात ? कुठे राहतात ? रोज काय करतात ? घरच्यांशी कसे वागतात ? या सगळ्याशी काही देणे घेणे नसते. किंबहुना ते असूच नये. ते असेल तरच अनैसर्गिक. आपल्याला आवडतो तो एखादा गुण , एखादी कला. त्या क्षेत्रातले नाणे खण...