संततधार
मागच्या शुक्रवारी ख्वाबिदा लिहताना तीव्र उन्हाळा त्रास देत होता . घरी-दारी प्रत्येक जण ऊन कमी होण्याची वाट पाहत होते . सोमवार पर्यंत घामेजूननच सगळी कामे चालू होती . हवामान खात्याने भरपूर पाऊस सांगितलेलाही होता पण त्या दिवशी मात्र भरपूर काय याचा अंदाज अंधुकहि येत नव्हता . मंगळवार उजाडला आणि पावसाला सुरूवात झाली . आठवडा पुढे सरला आणि पाऊसही . गुरुवारपासून तो संततधार झाला , जनजीवन विस्कळीत , मथळे बातम्यात आले . अजूनही रोजचे व्यवहार चालू होते व्यवस्थित . फक्त ओल्या कपड्यांची , बूट मोजे यांची , निथळणारा छत्र्यांची , आणि दारातल्या पाय पुसण्यावर चिखलाच्या ठशांची संख्या वाढली होती . पाच मिनिटाचे अंतर रांगत्या ट्रॅफिक ने दहा-बारा मिनिटे केले होते . आता तीव्रता जाणवायला लागली होती . नद्यांचे, धरणाचे पाणी वाढल्याची नोटिफिकेशन्स कॅन्टिन्यूअस झाली. रस्ते बंद , पॉवर फेल्युअर , रस्ता वाहून गेला , हे टीव्ही आणि रेडिओवर धोक्याच्या एकामागोमाग येणाऱ्या सूचनांमध्ये सारखे क ळत होते . रोजच्या वेळेला घरी परत येताना रस्त्यातले शॉपिं...