दिवस असेही/तसेही
कधीकधी , मनाला हवी असते विश्रांती तर मेंदूला असतो मुलखाचा उत्साह , मनाला माझ्या कधी आवडते शांतता , एकांत तर माझ्याच मेंदूला तेंव्हा हवा गर्दी , गोंगाट माणसांचा जमाव , मनाला प्रिय असतो घरातला कोपरा तर माझाच मेंदू मागत असतो मोकळे शिवार , मनाला बरे वाटते सवयीचे जगणे तेंव्हाच मेंदू म्हणतो करूया काहीतरी नवे , मग मन आणि मेंदू एकत्र येतात , मिळून एक तह करतात आता असाही - तसाही जाणारा दिवस बोलायला लागतो , मनाला मेंदूचा सल्ला पटायला लागतो मन आणि मेंदू होतात एक मग , हळूच बदलते माझे जग आता , स्वप्न लागतात व्हायला मोठी अपयशाची सावली भासू लागते छोटी आधीचे राखून राखून जगणे बदलायला लागते , लाजतबुजत वागणे संपलेलेच असते जगण्याला हवा असतो बदल , मन-मेंदू सांगतात सापडलीय दिशा लवकर चल असेच असतात माझे रोजचे दिवस कधी मनाप्रमाणे , तर कधी मेंदूप्रमाणे क्वचित जेंव्हा दोघे होतात एक , तेंव्हा दोघांप्रमाणे त्रिशंकू लटकलेला कधी आनंदात तर कधी दुःखांत , चकचकीत स्वच्छ तर कधी पार धुळ खात कालचे , आजचे आणि कधी उद्याचे , वाचून न झालेल्या ; का लिहून न ...