मनातला ढग


आषाढातला ढग, सुटला धावत 

मनातल्या मला मग उरली नाही उसंत 


मन आणि ढग एकटेच दोघे 

केले पार नदी नाले 


उंच डोंगरावरून खोल वाकत 

तर दरीच्या तळातून वर उसळत 

चालूच प्रवास ,

झाली दिवसाची रात्र 


दूरवर होते चमकणारे तारे 

कितीही लांब गेले तरी संपतच न्हवते सारे 

ढगाआड लपले कि चमकत होते मनात 

लपवून ठेवू मनात म्हटले तर,

गायबच क्षणात 


दूरवर जाताना हळूच पहिले जमिनीवर 

लुकलुकत होते मनातले तारे,

वाळूवर आणि पाण्यावर 

पाण्याबरोबर वाहात गेलो आम्ही सारे 

ढग, मन आणि खूप तारे 


आता ढग झाला जड, मंदावली गती बदलला रंग 

मन मात्र हलके झाले, पाहून सगळे नवेच रंग ल्याले 

ढग चालला नदीपार, त्याच्या मनात 

आता पावसाचाच विचार 

मानाने घेतली आकाशाची आस, 

एकाच जागी न थांबण्याचा लागला मग ध्यास 


ढग गेला त्याच्या मार्गे 

मनाला गवसले, जुनेच नव्याने 


काय माहित कसे घडले असे?

आषाढातल्या मेघाचे पंख मनालाच फुटले जसे 

आभाळातून प्रवास करून आले मन 

आता रोजच मनातले आभाळ आणि आभाळभर मन!


श्रुतकिर्ती 

२३/०६/२०२३






Comments

  1. छान कविता रचलीस श्रुती,

    ढगांनी जावं आपल्या मार्गी
    मनाला रंगवावं नव्या रंगांनी
    💜

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान