माझी उशी

 ही जी उशी आहे ना ,

कापूसच नाही तीच्या आत

पण भरली आहेत स्वप्नं मात्र  सात….

कधी रंगीबेरंगी, कधी धवल

तर कधी कधी अगदीच सरळ

उशीची आणि स्वप्नांची;

खुप गाढ मैत्री

डोकं ठेवताच दोघांच्या

गप्पा रोज रात्री

डोळे ही मग यात होतात सामील,

मिटून घेतलेल्या पापण्या मेंदूला ठेवतात गाफील

स्वप्नांचा हात धरून डोळे खुप लांबवर जातात,

दमून भागून गजराआधी बरोब्बर परत येतात

चुकूनमाकून कधीकधी तिथेच रमतात,

परत आल्यावर स्वप्ने उशीवरच रेंगाळतात

उघड्या डोळ्यांना दिसतात ती खरी,

पण हाती लागतील तर स्वप्ने ती कसली?

उशीवरची स्वप्ने लपतात उशीत परत;

उघडे डोळे आणि मन,

मात्र असतात त्यांनाच शोधत

 

-श्रुतकिर्ती

०८/१०/२०२३



Comments

  1. Haha 😆 beautifully narrated dream process ♥️🦋 ~ Kalyani

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान