को जागर्ति?
अनेक दिवसांनी आम्ही चार पाच मैत्रिणी एकीकडे जमलो होतो. जेवण झाल्यावर गप्पा मारताना चला झोपूया उद्या मला लवकर निघायचंय, मला ट्रेन आहे, ट्रॅफिक लागला कि मला एकाच्या जागी दोन तास लागतात. हे सगळे म्हणतानाही गप्पा काही थांबत न्हवत्या. घड्याळाचा काटा पाणी,कॉफी ,गप्पा अशा चक्रात गोल गोल फिरत होता. पहाट झाली आणि थोडे पडूया म्हणत सगळ्या झोपल्या. सकाळी थोडीशीच झोप झालेल्या पण खूप फ्रेश चौघी आपापल्या घरी परतल्या घरी येताना माझ्या मनात घोळत राहिल्या रात्रीच्या आठवणी आणि मनात आले का जागलो इतक्या?रात्रीच का रंगल्या या गप्पा? रात्री मारलेल्या गप्पांची जादू मनावर टिकून राहते. रात्रीची शांतता,कामांमधून मिळालेली उसंत,कशाचीच नसलेली घाई या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय जागरणाला उत येत असावा वाटते. मुळात गप्पा मारायला सुरवात झाली कि स्थळकाळाचे भान विसरणे हेच त्यातील यश आहे. चार जवळची माणसे आणि जिव्हाळ्याचा विषय. आणखी हवे तरी काय? निरर्थक,निरुद्देश गप्पानीच जगण्यातील मजा टिकून राहते. अशा रात्र रात्र जागूनच गप्पातून काहीतरी नवनिर्मितीही होते. Sharing is Caring हे लहानपणापासून माह...