संवाद
काल रात्री एक forward आलेला , एक लोकसंगीत गाणारी गायिका अतिशय सुंदर आवाजात काहीतरी गात होती. गंभीर सूर , पार्श्वभूमीला एकच वाद्य आणि कुठेतरी डोंगराच्या कड्यावर बसून एकटीच स्वतःत हरवून ती गात होती. जेमतेम पाच मिनिटांचा विडिओ पण सगळ्याचा विसर पडला. स्थळकाळाचे भान हरपणे म्हणजे काय ते हेच असते का ? असाही प्रश्न पडला. ती काय गात होती त्यातले एक अक्षरही कळले न्हवते. भाषा ओळखीची अजिबातच न्हवती. आशयाची सुताराम कल्पना न्हवती. ऐकणारी त्यावेळी मी एकटीच होते त्यामुळे मी माझ्या मनानेच अर्थ लावला पण चार जण असते तर प्रत्येकाचा वेगळा अर्थ समोर आला असता हे नक्की. म्हणावे तर ती स्वतःसाठी गात होती , स्वतःत हरवून आपल्याशीच बोलत होती पण तिच्याही आणि माझ्याही नकळत ती माझ्याशी संवाद साधत होती. ज्यात न्हवती कोणतीच समान भाषा , न्हवता समान विषयाचा पार्श्वभूमीचा धागा. पण काहीतरी सांगितले जात होते. काहीतरी उमजत , उकलत , उलगडत होते. शब्दावाचून भावना कळणे हे ऐकून माहित होतेच , इथे शब्द होते , सूर होता , भावनाही होतीच पण तिची आणि माझी भाषा वेगवेगळी असूनही एक संवाद होता आणि तो नक्कीच सुसंवाद होता. संवादाला ...