सरते वर्ष
आज ३१ तारीख , वर्ष संपणार आणि नवे देखील येणार. मागच्या वर्षीही , त्या आधीही वर्षानुवर्ष हेच चाललेय. तरीही येणाऱ्या वर्षाकडे बघण्याचा उत्साह टिकून आहे आणि जाणाऱ्या वर्षाकडे बघत , जमाखर्च मांडायची सवयही. माणसानेच दिवस रात्री , चंद्र सूर्याकडे बघत आठवडा , महिना , वर्ष या संकल्पना तयार केल्या आणि त्या मानून त्या बरहुकूम आयुष्य बेतले. ते बदलले कि अस्वस्थता , वैताग , निराशा सगळे पटकन येते. गेली दोन वर्षे हे सगळे जास्तच जाणवतेय. जवळच्यांना भेटायला सुद्धा इतका विचार , इतका प्लांनिंग आणि त्यानंतरही निर्णय आपल्या हातात नाही याची हतबलता. भौगोलिक अंतर किती लांब असते याची जाणीव , ते पार करावेच लागते वेळेला मनात अंतर नसले तरी याची बोच रोजच होत होती. गृहीत धरलेल्या घटना , वस्तू , प्रसंग या कडे विचारपूर्वक पाहायलाही याच वर्षाने शिकवले. किती प्लॅन ठरले आणि मोडले. काही वेळा दिवस , आठवडे संपत संपले नाहीत तर काहीवेळा , वेळ भुर्रकन उडून गेला. 'I trust you are well.' किंवा 'I'm fine hope the same at your end' हि formality अगदी formally लिहितानाही या वर्षीच हात थरथरले. आजचा क्षण महत...