Posts

मनातला ढग

Image
आषाढातला ढग, सुटला धावत  मनातल्या मला मग उरली नाही उसंत  मन आणि ढग एकटेच दोघे  केले पार नदी नाले  उंच डोंगरावरून खोल वाकत  तर दरीच्या तळातून वर उसळत  चालूच प्रवास , झाली दिवसाची रात्र  दूरवर होते चमकणारे तारे  कितीही लांब गेले तरी संपतच न्हवते सारे  ढगाआड लपले कि चमकत होते मनात  लपवून ठेवू मनात म्हटले तर, गायबच क्षणात  दूरवर जाताना हळूच पहिले जमिनीवर  लुकलुकत होते मनातले तारे, वाळूवर आणि पाण्यावर  पाण्याबरोबर वाहात गेलो आम्ही सारे  ढग, मन आणि खूप तारे  आता ढग झाला जड, मंदावली गती बदलला रंग  मन मात्र हलके झाले, पाहून सगळे नवेच रंग ल्याले  ढग चालला नदीपार, त्याच्या मनात  आता पावसाचाच विचार  मानाने घेतली आकाशाची आस,  एकाच जागी न थांबण्याचा लागला मग ध्यास  ढग गेला त्याच्या मार्गे  मनाला गवसले, जुनेच नव्याने  काय माहित कसे घडले असे? आषाढातल्या मेघाचे पंख मनालाच फुटले जसे  आभाळातून प्रवास करून आले मन  आता रोजच मनातले आभाळ आणि आभाळभर मन! श्रुतकिर्ती  २३/०६/२०२३

तीतर के दो आगे तीतर…

Image
काल सकाळच्या घाईत घराजवळच्या बागेपाशी, गाड्या हळू होत होत थांबल्या आणि काय झाले बघतानाच एका मागोमाग एक अशी बदकांची रांग फूटपाथ वरून बागेतील गवतात गायब झाली. वाहतूक सुरळीत झाली.  पटकन मनात लहानपणचे ‘ एका बदका मागे एक बदक होते’ वाले कोडे आठवले. गणित अवघड वाटण्याच्या काळात ही असली कोडी अवघड वाटतातच, पण उत्तर शोधण्याच्या धडपडीत ते जमले की जगजेता आलेक्झांडर आणि मी यात मीच श्रेष्ठ वाले फिलिंग यायचे. वय वाढले तशी समज वाढली आणि हे तर सोप्पे आहे पासून काय ही तिसरीतली कोडी! अशी तुच्छतेने बघण्याची वृत्तीही तयार झाली.  हे कोडे अवघड वरून सोपे होण्याच्या काळात नवी नवी कोडी पडायला लागली होतीच. अवघड वाटत काही सोपी होत होती तर काही अवघडच बनवून राहिली. अवघड असतात म्हणजे ती सुटतच नाहीत असे नव्हते. वेळेनुसार, समजानुसार उत्तरे बदलत गेली.  आणि मग कोडे घालणाऱ्याने  ती चूक किंवा बरोबर ठरवली. रांगेतली बदकं किती? हे शोधता शोधता ही बदकं कोठून आली? रांगेतच का आली? ती कशी दिसत आहेत? त्यांना जायचे कुठे? असे प्रश्न पडायचे ऐवजी कधी कधी नुसतीच त्यांची मोजणी करण्यातच कोडे सोडवायला दिलेली वेळ संपायला ...

शिवी

Image
  नेहमीच्या शॉपिंग सेंटरला दर शनिवार सकाळची नेहमीचीच गर्दी होती. गजबजाट होता , चेकआउटला रांगा होत्या . ट्रॉली , बास्केट्स कमी जास्त होत होत्या. मीही नेहमीप्रमाणेच त्या गजबजाटातल्या गर्दीचा भाग झाले आणि समोर बघून चालू लागले. आम्ही तीन माणसे एकाच घरातली असलो तरी दारातल्या गर्दीत जरा पुढे मागे झालोच होतो. दारापाशी बॅंका चेक करणारी मुलगी , तिथेच बास्केट ठेवणारे आणि उचलणारे यामुळे गर्दीचा वेग अधिकच मंदावला होता. तसाच तो माझाही कमी झालाच होता. पुढची व्यक्ती जरा थबकली आणि मी ही जागीच थांबले. एक पुरता क्षणही झाला नसेल याला आणि मागून “यु xxx इडियट! डोन्ट स्टॉप आय वॉन्ट टू वॅाक” अशी सणसणीत शेलकी शिवी आली. अनेकदा ऐकलेला शब्द पण मला उद्देशून कोणीतरी आकारण म्हणल्यानंतर काय रिएक्शन द्यावी हेही कळले नाही. थांबलेल्या मला आणि पुढच्या एक दोन जणांना बाजूला सारत तो माणूस आणि त्याच्याबरोबरची बाई काहीच न झाल्यासारखेच गप्पा मारत पुढे निघून गेले. मला मात्र सून्न करून गेले. चूक झाल्यावरही जे आपण कोणाला म्हणणार नाही ते तो अकारण मला बोलला आणि अंगावर पाल पडल्यासारखे वाटले. अशावेळी करायचे काय ? आपण ह...

न वाचलेले पुस्तक...

Image
  तीन-चार आठवड्यांपूर्वी, लायब्ररीत शिरल्या शिरल्या समोर डिस्प्लेमध्ये एक पुस्तक दिसले. लांबून नाव, लेखक काहीच दिसले नाही पण कव्हर लक्ष वेधणारे होते. कुठेतरी पाहिल्यासारखेही वाटत होते. दोन-चार सेकंदांमध्ये, चार पावलांवर गेल्यावर नाव दिसले आणि " अ रे हे पुस्तक होय!" असे भारी वाले फिलिंग आले. पुस्तकाचे नाव वाचले आणि बरेच काही क्लिक झाले.  लेखक, त्याची आधीची पुस्तके, हे नवे येणार याची बरीचशी झालेली जाहिरात. कोणीतरी वाचून त्याचा टाकलेला रिव्ह्यू आणि तो मी अर्धवट वाचून सोडल्याचेही आठवले.  लायब्ररी मधील इतर कामे करताना डोक्यातून हे पुस्तक काही जात नव्हते पण उचलून हातातही घेतले गेले नाही. कामे संपली. मी तशीच बाहेर  पडले.  पुस्तक तिथेच राहिले.  नंतर एक- दोन वेळा ते डिस्प्लेवर दिसलेही पण आता त्याकडे दुर्लक्ष होत होते. बहुतेक मुद्दामच.  हातात घ्यावे, चाळावे,घरी न्यावे,वाचावे असे सगळे वाटत होते पण तरीही टाळलेच गेले.  काल पुन्हा लायब्ररीत गेले तर डिस्प्लेला दुसरेच काहीतरी. रंगीबेरंगी शिवणकाम का विणकाम असे लावलेले. उगीचच मनखटू झाले. समोर होते तेव्हा घेतले नव्ह...

सारं कसं छान छान

Image
दिवस संपला , आठवडाही संपायला आला मग कोणालातरी उगाचच प्रश्न पडला , कसं काय ? दिवस पार पडला ? पटकन म्हटले छान छान दिले उत्तर , थांबला संवाद. जातोच ना रोजचा दिवस छान ? प्रश्न पडायलाच हवा का उत्तर देतांना ? अशी काय  मणामणाची  ओझी उचलली दमायला ? का गुंतागुंत सोडवली डोक्याला छळायला ? क्षणभराचा प्रश्न मग उत्तरही क्षणाचेच छान छान म्हटल्यावर कोडेच सुटते ना सगळ्यांचे. पण , कधीतरी हुकतोच तो एक पळ मधेच थांबवतो मग उत्तरही सोपे सरळ. उगीचच डोके जाते खाजवले आणि सापडते उत्तर नवे नवलाईचे. काहीतरी टोचलेले , काहीतरी बोचलेलें मिळाली उसंत म्हणून उगाचच सललेले, रिकामपणाचा उद्योग , दुखलेले सुख आठवते हळूच आणि मोठे होत जाते उत्तर खूप. मोठे उत्तर मग वाढवते प्रश्न सरळ वाटेला मग येते अवघड वळण. असली वळणे त्रासदायक फार खडखड , धडपड , रस्ताच चुकार धडपडले कि येते डोके जाग्यावर दिसायला लागते सगळे क्लिअर. तो उसंत घेतलेला क्षणाचं घालतो घोळ पळभराचा विचार फसवतोच कि सरळ. पटकन म्हटले छान छान   विषयच मिटला , नकोच तो रस्ता सगळा प्रश्नच सुटला.   ...

शेवटचा दिवस

Image
  शांत तरीही भरपूर गाज असणारा समुद्र किनारा. आजूबाजूला माझ्यासारखेच  एक दोन नमुने. लाटा येताहेत कधी फक्त जवळून तर कधी भिजवून पुन्हा गुडूप होताहेत. परत जाणारी लाट पायाखालची वाळू सरकवत असतानांच नवी लाट पाण्याचा आधार देत आहे. हे चक्र चालूच राहते. भरती, ओहोटी, खारे वारे- मतलई वारे, सगळे शिकून बरीच वर्ष झाली आहेत. तेंव्हाही ते गोंधळात टाकायचे तर आता आठवणे जरा अवघडच. पण समुद्रकाठी भर दुपारी टळटळीत उन्हात देखील जाणवणारा गारवा, फेसाळणार्या लाटा आणि ती गंभीर गाज. भूगोल इतिहास सगळ्याला दूर सारून तिथेच, त्या क्षणातच राहायला भाग पाडते. घड्याळातले काटे असूच नयेत वाटणारे हे क्षण तरीही त्यांच्या वेळेत संपतातच. पुढचा क्षण मला तो हवाय का नकोय हे विचारायला थोडीच थांबतोय. त्याला मी  तीथे आहे याची जाणिव देखील नाही. मला मात्र या सगळ्यांच्याच  असण्या नसण्याने फरक पडतो, खुप पडतो.  भान हरपून समुद्राकडे बघत राहण्यानेही आणि भानावर येत पुढचे plan अखण्यानेही. प्रत्येक क्षणाचे असणे मला आवडतेय मग त्याचे संपणे साजरे करावे तरी का वाटावे?  काहीतरी संपले तरच नवे सुरू होईल हे माहीत आहे म्हणू...

पोहे

Image
वर्षभर वाट पाहिलेल्या सुट्ट्या लागल्या आणि काय काय करू आणि काय नको असे झालेय. सुट्टीत बाकी काहीही करा किंवा न करा , हे खायचेय - ते करून बघायचेय असले प्लॅन असतातच असतात. त्यासाठी किराणा भाजीपाला आणलेला असतो , रेसिपी सेव्ह केलेली असते. सुगरणीचे सल्ले ऐकलेले असतात. थोडक्यात सगळी तयारी झालेली असते वाट फक्त सुट्टी लागण्याची. पण.... सकाळ होते , तीही निवांत आणि आता कुठे प्रयोग वाटतानाच मनात येते चला आता पोहे करूया आणि मग इतर सगळ्या विचारांना सुट्टी मिळते. जगाच्या पाठीवर कुठेही जा , हवामान कोणतेही असू द्या , पोहे आणि ब्रेकफास्ट या समीकरणाला तोड नाही. सुट्टी आहे , पोटभर झोप झालीय , गुगल-रेडिओ कोणीतरी काहीतरी बरे वाजवतेय , आणि जिरे-मोहरी-कढीलिंब-मिरचीच्या फोडणीचा वास सगळीकडे पसरलाय , याहून सुख सुख ते काय असते ? पटकन होणार सोपा म्हणून करावा असा पदार्थ असला तरी सगळ्यांच्याच हाताचे पोहे खाण्यासारखे असतात असे नाही. पोहे भिजवणे ते शेंगदाणे खरपूस परतणे , कांदा कोथिंबीर छान चिरणे पासून फोडणी नीट करणे. प्रत्येक स्टेप सोपी पण तितकीच कौशल्याची. बटाटा घालणार्याचे एकसारखे खरपूस काप , कोवळे मटार , फ्लॉ...

सोनचाफा

Image
काल सोनचाफ्याची भरपूर फुले वाहिलेल्या एका देवघराचा फोटो पहिला. ज्यांच्या घरचा होता त्यांच्याच अंगणातली फुले होती. फोटो पाहताच सुवास मनात दरवळला आणि भर दुपार प्रसन्न झाली. असेच थोड्यादिवसांपूर्वी अंगणात उगवलेली सूर्यफुले , दिवसाचा कोणताही क्षण हसरा करून टाकायची. या वर्षी उन्हाळा आलाय खरा पण थंडी , पाऊस गेलाच नाहीय. तरीही मधूनच तावणारे ऊन उन्हाळा आलाय हे अंगणातल्या मोगऱ्याला सगळ्यात आधी सांगते आणि तो हि बातमी खिडकी उघडताच वाऱ्याच्या झुळुकीबरोबर सगळ्यांना देतोय. कालच्या जोरदार पावसातही सिग्नलला , सगळ्या ग्रे वातावरणात गुलमोहोराचा शेंडा आणि सिग्नलचा लाल दिवा तेवढाच उठून दिसत होता. सदाफुली , कण्हेर , अबोली वर्षभर आपापल्या जागी राहून रंग उधळत असतात म्हणून त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होते हे खरे , पण पानगळीत जेव्हा एकाही झाडाला पानफूल नसते तेंव्हा याच सदाफुलीच्या सदा फुलण्याचे विशेष जाणवते. नखाएवढी , पेराएवढी इवलुशी इवलुशी हि फुले , पण रंग सुवासाचे भांडार असतात आणि एका दिवसाच्या आयुष्यात दोन्ही हातानी न्हवे तर असंख्य पाकळ्यांनी ते उधळून देतात. छान उमललेले फूल , कधी त्याचे चित्र तर कधी फोट...

दिवस

Image
 " आकाशवाणी पुणे , सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे." , किंवा ' इति वार्ताः " अशी दिवसाची अनेक वर्षे सुरवात होत असल्याने सकाळी सकाळी गुगल ला काहीतरी वाजवायला लावल्याशिवाय सकाळच्या कामांना गती येत नाही. माझे आणि त्या गूगल काकूंचे फार संख्या नाही. लावायला एक सांगितले कि लागते भलतेच. कुमार गंधर्वांचा , अक्षय कुमार करणारी गूगल मग डोक्यात जाते बऱ्याचदा. चूक तिची नसतेच. एक तर माझा accent तिला कळत  नाही नाहीतर माझी आणि तिची गती मॅच होत नाही. असेच आज सकाळी काहीतरी लावताना तिने अचानक , " बुद्धा वीकली" नावाचा यु ट्यूब चॅनल लावला. वैतागून स्टॉप म्हणायच्या आत एक शांत गंभीर आवाज , 'Chant with us ." म्हणाला आणि मी थबकले , काय म्हणतोय ऐकू या म्हणून ऐकत राहिले. आधी दोन एक मिनिटे काहीतरी माहित सांगत होते पण माझे लक्ष त्यातून उडालेले होते. त्या तिबेटी भिक्कूच्या आवाजामुळे हा आता ' ओम मणी पद्मे हम ' म्हणतो कि काय ? मग त्या वाक्य बरोबर डोळ्यापुढे  आलेली अनेक बुद्ध लेण्यांमधली चित्रे , तिसरी-चौथीमध्ये असतानाची काळ्यापांढर्या दूरदर्शन वरची नेपाळ मधली स्मगल...

समज

Image
  “ मी काय सांगितले ते समजले का ?” शेकडो वेळा किती तरी जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकले असेल. कधी कधी आपणही म्हटले असेल.   पण नक्की काय असते समजणे ?   समजते म्हणजे होते तरी काय ?   मेंदूला म्हणाला काही कळते का ? का ज्या अवयवाकडून एखादी कृती अपेक्षित आहे , ती कशी-कधी -केव्हा- कां करायची याची इन्स्ट्रक्शन कशी द्यावी हे मेंदूला कळते का ? नक्की काय घडते ?   विचार केला तर , असा लख्ख प्रकाश पाडणारा एखादा क्षणच   असतो जो बऱ्याच गोष्टी , न कळणे गटातून कळले गटात टाकून देतो. पण कधी कधी न करण्यातून ,   मला कळले-उमगले- समजले हे कधी घडते तेही तर समजत नाही. मनात , मेंदूत खोलवर कुठेतरी उत्पन्न होणाऱ्या आंतरिक संवेदना ज्यांना आपण समज म्हणतो त्या मनात मेंदूत त्यांची एक सृष्टी निर्माण करत असतात. त्यात असणाऱ्या सगळ्या संवेदना वेळी आवेळी ,   मेंदू/ मन लागेल तशा वापरते आणि आपण समजले किंवा नाही समजले , हा खेळ खेळतो. कधी कधी हा खेळ इतका पटकन घडतो की समजले   कधी हे ही समजतच नाही. मग मन त्याला लेबल लावते ,   उमजले , उमगले ,   नकळत कळले , इत्यादी इत्यादी. य...