Posts

ख्वाबिदा

Image
  ख्वाबिदा - माझ्या मनात   डोक्यात केव्हाही , कधीही येणारे विचार , त्या क्षणी जरी मला ते रँडम वाटले तरी मलाही माहितेय त्यांचा कुठे तरी माझ्या भूत , वर्तमान यांच्याशी संबंध असतोच. कोणताच विचार हा आभाळातून पडल्यासारखा किंवा कुत्र्याच्या छत्रीसारखा उगवत नक्कीच नाही. मग कां येतात ते मनात ? मांडावेसे , सांगावेसे वाटतात   म्हणजे तरी काय ? कोणीही लिहते , बोलते म्हणजे तरी नक्की काय करते ? प्रत्येक विचारातली , लिखाणातली पात्रे , प्रसंग काल्पनिक म्हणजे तरी काय ? १००% कल्पना असे काही असते कां ? पण १००% सत्य हे तरी असते कां ? आपले विचार सत्य आणि कल्पना या तळ्यात मळ्यात सदैव वावरत असतात. एखाद्या क्षणी हि रेषा धूसर होते आणि मग उमटतो तो आपल्या मनाचा प्रवास. सत्य , असत्य , कल्पना , वास्तव या पलीकडचा. रिपोर्ताज लिहणारे वास्तव मांडतात. पण ते तरी वास्तव कुठे असते ? ते त्यांच्या मनाला पटलेले विचारांनी दाखविलेले वास्तव असूच शकते. माणसे वेगळी मने वेगळी वास्तव वेगळे. सत्य आणि कल्पना या दोघांच्या मिश्रणातून आपल्याच मनात आपले एक जग असते. ते प्रत्येक व्यक्तीकडे घटनेकडे वेगळ्याच दृष्टिकोनातून ब...

चष्मा

Image
  कालपासून पाऊस रिमझिम रिमझिम पडतोच आहे , थोडे उघडल्यावर बाहेर पडलेतर पाच वाजताच आभाळ दाटून आंधारले होते. पावसाचे पाणी पडलेल्या चष्म्यातून ढग अजूनच राखाडी दिसत होते. रोजचाच तो समुद्रकिनारा पण आज ढगाळलेला , पाणी गढूळलेले आणि रोजची गर्दीही (तशी एरवीही ती तुरळकच असते.) न्हवती. एक सर येऊन गेली आणि आभाळ मोकळे झाले. दिवस मावळू लागल्याने तसाही प्रकाश कमीच झाला होता. अचानक मला चष्म्यावरच्या पाण्याच्या थेंबांची जाणीव झाली ते पुसले आणि माझ्या दृष्टीवरचे मळभही क्षणात दूर झाले. बुडणाऱ्या सूर्याने राखाडी ढगांची किनार सोनेरी केली होती. उथळ जागेत समुद्राचा तळ नितळ पाण्यातून दिसू लागला , लांबवर चालणारी दोन-चार डोकीही दिसली. माझ्याही पावलांना गती आली… एका छोट्याशा कृतीने माझाच रोजचा चष्मा स्वच्छ पुसल्याने , तेच दृश्य एकदम सुस्पष्ट झाले. बारकावे दिसले आणि विचारही बदलले. मनात आले या दोन काचांनी गेली अनेक वर्षे किती प्रामाणिक साथ दिलीय. आता तर मी चष्म्याशिवाय माझा विचारच करू शकत नाही इतका तो माझा अविभाज्य भाग झालाय. सवयीने नाकाला चष्म्याचे ओझे नाही जाणवत आता. चष्म्याची चेहऱ्याला आणि माझ्या चष्म्यासक...

साम्य

Image
खाराच्या मिरच्या घातल्या , दोन दिवसांपुर्वी ; चक्क मोठी बरणी भरून आणि मग जेवणाच्या आधी एका छान वाडग्यात काढून फोडणी घालतांना मला एकदम माझी आई झाल्यासारखं वाटले. जेवायला वाढायच्या आधी वेगवेगळ्या चटण्या , लोणची , कोशिंबिरी सारखी करणारी , फोडण्या धालणारी आई कायम मनात मेंदूत कोरली गेलेली. अचानक मी ती असल्यासारखं वाटले आणि... दिल गार्डन गार्डन हो गया! त्याचवेळी पटकन आठवली ती तात्तोचान ( Tetsuko Kuroyanagi या जपानी लेखिेकेचे पुस्तक) मधली छोटीशी तात्तोचान. कॅंपला गेल्यावर सुप मधली गरम पळी ढवळून पोळल्याचे नाटक करित कानाच्या पाळीला हात लावून ‘सस्स’ करणारी... हे पाहून तिच्याच वर्गातला दुसरा छोटा मुलगा कारण विचारतो तेंव्हा आई हे असे करते आणि हे करायचे मी ठरवलेच होते हे मोठ्या कौतुकाने सांगते. कां वाटते असे करावे ? Follow करण्याची इच्छा येते कुठून ? आपण आई/ बाबा/ बहीण/ भाऊ यांच्यासारखे दिसतो , असे कुणी म्हटल्यावर उगीचच बरे तरी कां वाटते ? कितीतरी मित्र मैत्रिणीं असतांना काहीतरी common thread असणार्यांशीच मैत्री कां होते ? साम्य शोधत राहतो आपण कायम या सगळ्यात. वेगळेपणाचे attraction असतेच....

सवय

Image
' मागून तिसऱ्या लाल झाकणाच्या बरणीत बघ ' किंवा ' दुसऱ्या ड्रॉवरच्या डाव्या कोपऱ्यात वरून दुसरा ' हे असे direction सांगणारे संवाद बऱ्याचदा आमच्या घरात चालू असतात. आणि मग माझ्या डोळ्याला चष्म्यात लेसर स्कॅन बसवलाय का हे चेक होते. हा सवयीचा परिणाम का दुष्परिणाम कोण जाणे. त्याच वस्तू तीच ठिकाणे , वारंवार ठेवणारा तोच हात सगळे सवयीने होऊन जाते. सवयीने सगळे सोपे होते. हातांना डोळे फुटतात असे वाटते. एक comfort zone निर्माण होतो. एका डब्याची जागा बदलली तरी वैतागणारे अनेक जण असतात आणि रोज उठून वस्तूंच्या जागा बदलणारे पण. सवयीच्या वस्तू , सवयीचे रस्ते , जागा , काम आणि मुख्य म्हणजे सवयीची माणसे. खूप वेळा माणसांची , त्यांच्या वागण्याबोलण्याची न्हवे असण्याचीच इतकी सवय होते कि त्यांची जाणीव होणेच बंद होते. मग सवयीनेच त्यांचे महत्वहि कमी होते. साखरेचा डब्बा रोज तिथेच आहे हे माहित असल्यावर त्याचे असणे जाणवणे थांबते तसे. पण अचानक गोष्टी जागा बदलतात. रस्ता चुकतो , काम बदलते आणि कधी कधी माणसेही दूर होतात. आपण चाचपडतो , धडपडतो , नाराज होतो पण मग हळूहळू त्याचीही सवय लागते. नवीन वस्तू , ग...

को जागर्ति?

Image
अनेक दिवसांनी आम्ही चार पाच मैत्रिणी एकीकडे जमलो होतो. जेवण झाल्यावर गप्पा मारताना चला झोपूया उद्या मला लवकर निघायचंय, मला ट्रेन आहे,  ट्रॅफिक लागला कि मला एकाच्या जागी दोन तास लागतात. हे सगळे म्हणतानाही गप्पा काही थांबत न्हवत्या. घड्याळाचा काटा पाणी,कॉफी ,गप्पा  अशा चक्रात गोल गोल फिरत होता. पहाट झाली आणि थोडे पडूया म्हणत सगळ्या झोपल्या. सकाळी थोडीशीच झोप झालेल्या पण खूप फ्रेश चौघी आपापल्या घरी परतल्या  घरी येताना माझ्या मनात घोळत राहिल्या रात्रीच्या आठवणी आणि मनात आले का जागलो इतक्या?रात्रीच का रंगल्या या गप्पा?  रात्री मारलेल्या गप्पांची जादू मनावर टिकून राहते. रात्रीची शांतता,कामांमधून मिळालेली उसंत,कशाचीच नसलेली घाई या सगळ्याचा परिणाम म्हणून कि काय जागरणाला उत येत असावा वाटते.  मुळात गप्पा मारायला सुरवात झाली कि स्थळकाळाचे भान विसरणे हेच त्यातील यश आहे. चार जवळची माणसे आणि जिव्हाळ्याचा विषय. आणखी हवे तरी काय? निरर्थक,निरुद्देश गप्पानीच जगण्यातील मजा टिकून राहते. अशा रात्र रात्र जागूनच गप्पातून काहीतरी नवनिर्मितीही होते. Sharing is Caring हे लहानपणापासून माह...
Image
     घड्याळाचा काटा उलटा फिरत नाही तसाच वजनाचा पण बऱ्याचदा. एकदा निघाला की निघालाच. सुरवात जरासे गाल गुबगुबीत होण्याने होते खरी , पण हळूहळू चांगले बाळसे धरते. मग सुरु होते मनाची आणि जीवाची कसरत. काय काय करावे तेवढे थोडे. शेकडो diets, हजारो exercise ,  सतराशे साठ lifestyle आणि गल्लीबोळात जिम. रोज काटा जरासा मागे जरासा पुढे पण तेवढाच. अगदी भिंगाखाली बघितले तरच फरक दाखविणारा.        चार जण (मुद्दाम जणी हा शब्दप्रयोग टाळलाय वजन कुठलाही भेदभाव करीत नाही.) भेटले कि हवापाणी , ट्रॅफिक नंतर एखादा बारीक झालेला/झालेली सगळ्यांना सापडते आणि मग टिप्स ची देवाणघेवाण , खात्रीलायक उपाय , guaranteed डाएट हे सगळे चवीचवीने चघळले जाते. घरी येऊन उरलेल्या वजनदार लोकांचे ठाम निश्चय होतात. जोशात सुरवात होते आणि दहातले आठ पुढच्या भेटीत अजून वजनदार झालेले सापडतात. नव्या वर्षाच्या सुरवातीला हा अनेकांचा पहिला गोल असतो. पण छान छान खाद्यपदार्थ , ते खाण्याच्या अमाप संधी , cheat days ची वाढणारी संख्या , कठोर परिश्रमांचा येणार कंटाळा हा गोल हळूच शेवटी ढकलतो आणि आपण शेवटी एकती...

Mirror Mirror on the Wall

Image
     Snow White च्या सावत्र आईने वारंवार हा प्रश्न विचारला आणि नेहमीच तिच्या मनासारखे उत्तर मिळत गेले. ती सुंदर असणार हे तर नक्कीच आणि चांगली जादूगारीण देखिल , कारण एवढे खरे बोलणारा आरसा होता तिच्याकडे. एकदाच मनाविरुद्ध उत्तर मिळाले आणि तिच्यातली खलनायिका जागी झाली. आरस्याच्या जागी कोणी माणूस असता तर , कदाचित हो ला हो म्हणाला असता आणि गोष्ट वेगळी असती. पण नाही ना! आरसा खरा बोलणारा होता.      आपल्या सगळ्यांकडेच हा आरसा असतोच , या ना त्या रूपात. पण वापरतो किती वेळा ? त्यातही आपल्याला हवे ते उत्तर पाहिजे असतानाच जातो आपण त्याला प्रश्न विचारायला. ' सांग दर्पणा कशी मी दिसते ?' विचारायच्या आधी माहित असते उत्तर सुंदर असणारच आहे. Bad Hair Day च्या दिवशी कोण विचारेल असला प्रश्न ? खारट आमटी कशी झालीय हे विचारण्याचा मूर्खपणा मी तरी नाही करणार.      मग माहित असताना विचारतोच कशाला आपण ? तेही वारंवार ? Endorsement हवी असते ना आपल्याला. Filter लावून सेल्फी काढण्याच्या जगात त्या आरस्याला खरा प्रश्न नाहीतर विचारणारच आहोत कशाला आपण ? अगदी विचारलाच खरा प्...

आठवण.

Image
" मला आठवण कर ग जातांना हे घेवून जायची" , " आठवणीने ने हं" , " मला आठवण आहे न्यायची" हे संवाद दिवसभरातून पन्नासवेळा घडून ही मैत्रीण घरी गेल्यावर मी फ्रीज उघडला आणि कारली आवासून माझ्याकडे बघत होती. शेवटी आम्ही दोघीही विसरलोच. लक्षात काही राहीले नाही. आमच्या दोघींच्याही so called तल्लख मेमरी ने ' भरवशाचा म्हशीला टोणगा! ' हे पुन्हा prove केलेच होते. दिवसभरातल्याच नव्हे तर मागच्या असंख्य वर्षातल्या आठवणी आम्ही तेवढ्या वेळात उगाळल्या होत्या पण लक्षात ठेवण्याची एक practical गोष्ट पार विसरलो. आता हा ही क्षण आमच्या कायमचा आठवणींचा भाग झाला होता. ' मागच्या वेळेस विसरलो होतो ' हे आम्ही नक्की लक्षात ठेवणार होतो. क्षणांच्या आठवणी अशाच होतात कां ? ' मला आठवतय ' असे म्हणतांना आपल्या बंद डोळ्यांपुढे एक इस्टमन कलर मुव्ही चालत असतो. भले बुरे साठवून ठेवलेले पडद्यावर आणत राहतो. रम्य आठवणी म्हणता म्हणता काही आठवणी पिच्छा सोडत नाहीत. ...