Posts

दिवस असेही/तसेही

Image
कधीकधी , मनाला हवी असते विश्रांती तर मेंदूला असतो मुलखाचा उत्साह , मनाला   माझ्या कधी आवडते शांतता , एकांत तर माझ्याच मेंदूला   तेंव्हा हवा गर्दी , गोंगाट माणसांचा जमाव , मनाला प्रिय असतो घरातला कोपरा तर माझाच मेंदू मागत असतो मोकळे शिवार , मनाला बरे वाटते सवयीचे जगणे तेंव्हाच मेंदू म्हणतो करूया काहीतरी नवे , मग मन आणि मेंदू एकत्र येतात , मिळून एक तह करतात आता असाही - तसाही जाणारा दिवस बोलायला लागतो , मनाला मेंदूचा सल्ला पटायला लागतो मन आणि मेंदू होतात एक मग , हळूच बदलते माझे जग आता , स्वप्न लागतात व्हायला मोठी अपयशाची सावली भासू लागते छोटी आधीचे राखून राखून जगणे बदलायला लागते , लाजतबुजत वागणे संपलेलेच असते जगण्याला हवा असतो बदल , मन-मेंदू सांगतात सापडलीय दिशा लवकर चल असेच असतात माझे रोजचे दिवस कधी मनाप्रमाणे , तर कधी मेंदूप्रमाणे क्वचित जेंव्हा दोघे होतात एक , तेंव्हा दोघांप्रमाणे त्रिशंकू लटकलेला कधी आनंदात तर कधी दुःखांत , चकचकीत स्वच्छ तर कधी पार धुळ खात कालचे , आजचे आणि कधी उद्याचे , वाचून न झालेल्या ; का लिहून न ...

टच वूड

Image
  वेगवेगळ्या ठिकाणाहून निघून , भर गर्दीतून चार जण एकत्र आले की पार्किंग मिळाले का ? हा हमखास निघणारा विषय . दोन दिवसापूर्वी असेच झाले. आणि त्यातलीच एक जण , “ मला नेहमी छान पार्किंग मिळते. तेही पटकन!” असे म्हणाली आणि पुढच्या क्षणाला तो उत्साह थांबवत , “ टच वुड , टच वुड” म्हणत लाकूड न सापडल्याने डोक्यावर दोन टिचक्या मारूनच शांत झाली. माझ्यासारख्याच एक दोघांना हसू आवरेना. पण ती मात्र अगदी सिरियसली , “ Don’t jinx me.” यावर ठाम होती. श्रद्धा ? अंधश्रद्धा ? काय म्हणू ? काहीच नाही. छान चालू असलेली तिच्या आयुष्यातील एक गोष्ट ,   वारंवार घडत असलेली , थांबावी असे तिला वाटत नव्हते एवढेच. आणि तिला तसे वाटण्यात कोणाचे काही नुकसानही तर होत नव्हते.   चांगले चालू असलेले , काहीच तर थांबू नये. संपू नये. असे कायमच तर वाटते प्रत्येकालाच. म्हणून तर मागच्या पिढीतले , म्हातारे कोतारे ‘बोलून दाखवू नये’ असे म्हणताना आढळतातच की. मग हसू का आले मला तिच्या कृतीचे ? डोक्याला लाकडी खोके समजल्याने ? कोण जाणे . झाडांवर गार्डियन एंजेल्स राहतात. झाडावर टिचकी मारल्याने ते जागे होतात आणि मग आपले रक्ष...

सूर्यफूल

Image
  काल इव्हेंट्स मध्ये , फ्लॉवर फेस्टिवलची जाहिरात पाहिली आणि कधी , काय , कुठे , कधी जायला जमेल , कुणाबरोबर जायचे , सगळे प्लॅन्स झटपट तयार झाले. कितीतरी एकर जागेवर रांगेने फुललेली सूर्यफुले.   नजर फिरेल तेवढा , सगळा भाग व्यापून टाकणारे ते झुलणारे , डुलणारे पिवळे शेत. दिवसाच्या कोणत्या वेळेला पोहोचू त्यावर बदलणारे दृश्य. या सगळ्या विचारांनी डोक्यात आणि डोळ्यापुढे एकच गर्दी केली. मराठीत आणि इंग्रजीत एकच अर्थ सांगणारे नाव ल्यायलेले , छोट्या ताटली एवढे फुल. बघताक्षणी उत्साहाने ,   चैतन्याने भारून टाकते एवढे नक्की. ठराविक लयीत चक्राकार फिरत आहेत असा आभास निर्माण करणाऱ्या त्या पाकळ्या , बघतच रहावे अशाच असतात. लहानपणापासून सूर्यफूल ; सूर्याकडे बघते , पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते , इत्यादी इत्यादी…सरधोपट माहिती आणि बियांचे तेल काढतात या उपयोगा पलीकडे मन लावून या फुला कडे बघायला भाग पाडले ते व्हॅन गॉग ने. प्रचंड गाजलेले ते सनफ्लॉवर कधी पाहिले ते आता आठवत नाही. पण दर   वेळेला तेवढाच उत्साह , आनंद आणि प्रत्येक फूल वेगळे असल्याचा आभास ते चित्र निर्माण करते. प्रत्येक फुलाला , ...

असेच काही

Image
  उद्या नवे वर्ष सुरु होणार , मनातले विचार चांगले असतील तर वर्ष छान नोट वर सुरु होईल असे सारखे वाटत होते. लिहायला लागल्यावर मात्र तसे होत   न्हवते. आयरिश लोक , 'I am sad' च्या ऐवजी 'Sadness is on me' असे म्हणतात तसे काहीसे होत होते. मजेशीर आहे ना हे , अनेक गोष्टी तात्पुरत्या मनात येतात तसाच हा sadness थोड्या काळासाठी आलाय , गेला कि मी पुन्हा पूर्वीची असणार हे सांगणारे. मला माझ्याच भावनांमुळे identify न करणारे. भावनांशिवाय मन असणार कसे ? कधी थोड्याश्या उगाच चुकार येऊन जाणाऱ्या तर कधी टिकून राहणाऱ्या , तीव्र हाकलून दिल्या तरी न जाणाऱ्या. मागच्या आठवड्यात रेडिओवर   prolonged grief disorder बद्दल काहीतरी बातमी चालू होती. अमेरिकन सायकॅट्रिस्ट असोसिएशन ने हा एक मानसिक आजार म्हणून मान्य केला अशी. मधेच रेडिओ लावल्याने आगापिछा , काही कल्पना न्हवतीच. कानात पडणारे शब्द फारसे रजिस्टर होत न्हवते. आता मात्र ते शब्द मनातून जाईनात. भावना मनातून जाण्यासाठी वेळ घेतातच पण तो किती ? कसे ठरणार दुःखाची तीव्रता किती काळ टिकावी ते ? ती तेवढा काळ तीव्रच असावी ते ? मन हळुवार म्हणून हे घडते...

बांध

Image
  पूर येऊन गेला आणि हा डॅम इतका भरला आणि तो तितका . आता पाणी सोडले पाहिजे . सोडलेले पाणी किती प्रदेश बुडवणार ? किती वेगात येणार ? हीच चर्चा . लिटरचा , फार तर मिलिलिटरचा हिशोब समजणारे आपण , ते क्यूसेक्स आणि घनमीटर वगैरे ऐकायला मिळत होते .   पाणीच ते , बांधून ठेवल्याने अस्वस्थ झालेले . अति झाले आणि सगळे बांध तुटून पहिल्या मिळालेल्या संधीला धावत सुटले . महत्वाच्या दिवशी सकाळपासूनच उशीर झाल्यावर पळत सुटायला लागते तसे .   पाण्याला पक्के ठाऊक असते कुठे जायचे ते . तशी एरवी त्याची गतीही ठरलेलीच असते . त्याला ज्या नदीत जाऊन मिसळायचे असते तिचा धर्मच असतो वाहणे . त्यामुळे तिच्यात मिसळायचे तर यालाही थांबून चालतच नाही . नदीत मिसळले की त्याची गती नदीचीच बनते . कधी सुळकन धावणारी , मग भरभर पुढे निघून जात मागचा काठ कोरडा ठेवणारी . किंवा शांत , विस्तीर्ण वाहतच राहणारी . कधीही खंड न पडणारी . ऐलतीर पैलतीर असणारी .   तळाच्या दगडांना कधीच सूर्यप्रकाशात उघडे न पाडणारी . पाणी ज्या नदीत मिसळते त्याच गतीने ते पुढे जात राहते .   योग्य कामासाठी , गरज म्हणून योग...

रंग

Image
 फोनवर बोलता बोलता मैत्रीण पटकन , “ अगं भिंतीच्या रंगाला मॅचिंग नॅपकिन घेतले .” असे म्हणाली आणि आम्ही दोघीही खूप हसलो . एखाद्या रंगाचे वेड लागले की असेच होते , जळी स्थळी काष्ठी पाषाणी , तो रंग सापडायला लागतो आणि सगळीकडे तो हवाही असतो .   तसेही   आपण रंगमय विश्वात वस्ती करून असतो . प्रकाशकिरणांचे विश्लेषण झाले की इंद्रधनुष्याचे सात रंग आपल्याला मिळतात , पण थोडेसे शास्त्रीय स्पष्टीकरण बाजूला ठेवले तर रंग ही प्रकाशा विषयीची संवेदनाच ना . अगदी ज्याला आपण पांढरा प्रकाश म्हणतो त्यातही विविध रंगाचे कण सामावलेले असतातच . पांढरा हा प्रकाशाचा पूर्ण प्रभाव , तर काळा म्हणजे अभाव . तरीही आपल्या सोयीसाठी तेही रंगच आणि या दोघांच्या मध्ये असते ती आपली रंगीबेरंगी दुनिया . असंख्य रंग , त्यांच्या असंख्य छटा . आपल्या डोळ्याला दिसतात तशाच दुसऱ्याच्या ही दिसतात , असे समजून त्यांना दिलेली काही कॉमन ; काही अगदीच विचित्र नावं .   ‘ तानापिहिनिपाजा ’ पाठ करताना लहानपणी पडलेले , ‘ पारवा ’ या रंगाचे कोडे : मोठे झाल्यावर ‘ रामा कलरची पैठणी ’ किंवा ‘ राणी कलरचा शालू ’ अ...

मिसळणाचा डबा

Image
   पावसात घरात अडकून पडलं की , टीव्ही बघणे हा एकमेव सामुदायिक कार्यक्रम सुरू होतो . काल असेच SBS Food वर एक कार्यक्रम नजरेसमोर आला . कोणता तरी केक आणि काहीतरी तिखटमिठाचे शिकवणे चालू होते . मी आपली डोक्यात काहीही नोंद न घेता , डोळ्यांनी बघत होते . शेवटी कळले या सगळ्यात ते काही मसाल्याच्या पदार्थांचा वापर करणार होते , त्याबद्दलच माहिती सांगत होते . मेंदूने तेही रजिस्टर केलेच नाही . संपतांना शेफने बरोबरच्या गेस्टला त्याच्या , spice rack मध्ये असणाऱ्या आणि वारंवार संपणाऱ्या पाच मसाल्याच्या पदार्थांची नावे विचारली आणि मेंदू , कान टवकारले गेले . त्याच्या मीठ , मिरपुडीच्या बाटल्यांच्या जागी , मला माझा मिसळणाचा डबा दिसायला लागला . मनच ते , खेळ म्हणून मी स्वतःलाच विचारले माझे कोणते ते पाच मसाल्याचे पदार्थ ?   आता मात्र गोंधळ उडाला . ही संख्या चुकीची वाटायला लागली . मसाल्याचे पाळेच तर सात खाण्याचे . त्यातले सगळेच रोज लागणारे . त्याबरोबरच फोडणीला लागणार म्हणून शेजारी ठेवलेली हिंगाची डबी आली , बरं डब्यात जिरे असले तरी जिरेपूड वेगळी . काळा गोडा मसाला शेजा...

संततधार

Image
    मागच्या शुक्रवारी ख्वाबिदा लिहताना तीव्र उन्हाळा त्रास देत होता . घरी-दारी प्रत्येक जण ऊन कमी होण्याची वाट पाहत होते . सोमवार पर्यंत घामेजूननच सगळी कामे चालू होती . हवामान खात्याने भरपूर पाऊस सांगितलेलाही होता पण त्या दिवशी मात्र भरपूर काय याचा अंदाज अंधुकहि येत नव्हता . मंगळवार उजाडला आणि पावसाला सुरूवात झाली . आठवडा पुढे सरला आणि पाऊसही  . गुरुवारपासून तो संततधार झाला , जनजीवन विस्कळीत ,  मथळे बातम्यात आले . अजूनही रोजचे व्यवहार चालू होते व्यवस्थित . फक्त ओल्या कपड्यांची , बूट मोजे यांची , निथळणारा छत्र्यांची , आणि दारातल्या पाय पुसण्यावर चिखलाच्या ठशांची  संख्या वाढली होती . पाच मिनिटाचे अंतर रांगत्या ट्रॅफिक ने दहा-बारा मिनिटे केले होते . आता तीव्रता जाणवायला लागली होती . नद्यांचे, धरणाचे पाणी वाढल्याची नोटिफिकेशन्स   कॅन्टिन्यूअस झाली.   रस्ते बंद , पॉवर फेल्युअर , रस्ता वाहून गेला , हे टीव्ही आणि रेडिओवर धोक्याच्या   एकामागोमाग येणाऱ्या सूचनांमध्ये सारखे क ळत होते . रोजच्या वेळेला घरी परत येताना रस्त्यातले शॉपिं...