Posts

त्याला तयारी पाहिजे!

Image
  सध्या रोजच्या बातम्या पहिल्या , ऐकल्या , वाचल्या कि कुठेतरी संकट , अडचणी आजूबाजूला वावरताहेत याची जाणीव होते. मग ते वादळ असो , बुशफायर असो , किंवा   गेल्या वर्ष दीडवर्षातला जीवघेणा अनुभव असो. पण संकटाशिवाय   जगण्याला मजा ती काय ? एकदम self-help पुस्तकातला किंवा motivational quotes मधला dialogue वाटतो ना वाचायला. पण येणारच आहेत हि छोटीमोठी वादळे हे माहित असतेच कि रोज सकाळ झाल्यावर. नव्याने दिवसाची सुरवात केल्यावर , फरक एवढाच कधी वाघोबा म्हणावे लागते तर कधी वाघ्या. मग विचार करताना मनात आले ; आपल्या प्रत्येकाचा संकटाला फार काय छोट्यामोठ्या अडचणीला तोंड देण्याचा , react होण्याचा algorithm वेगवेगळा असतो. पद्धत वेगळी असते. कधी रणछोडदास बनणे पसंत करतो तर कधी आ बैल मुझे मार! तर कधी calculated risk. अडचण वेगळी , परिस्थिती वेगळी , माणूस वेगळा , प्रतिक्रिया वेगळी. ' आई ' ' बाबा ' असे मोठे भोकाड पसरण्यात दादा , ताई , मित्रमैत्रिणी अशी भर पडत पडत एक दिवस आपण एकटेच या सगळ्याला सामोरे जायला तयार होतो , आणि मग नंतर कुणाच्या तरी अशाच हाकेला ओ देण्याचा प्रवास सुरु होतो. आस्तिकांन...

Expecting the Unexpected!

Image
  शुक्रवार संध्याकाळ, खूप थंडी पडलीय आणि नेटफ्लिक्सवर सस्पेन्स मूवी चालू होता. सुरवात तर एकदम भारी झाली, काय चालूय याचा थांगपत्ता लागत न्हवता. आमच्या तिघांचेही तर्क कुतर्क चालू होते. मधेच काहीतरी घडले आणि सगळे कोडे उलगडल्यासारखे वाटले. पुढची दहा मिनिटे step by step मिस्टरी सोडवण्यात गेली आणि मग...   मग काय सिनेमा बघण्यातला रसच गेला. एकेकाने काढता पाय घेतला. जोवर शेवट कळात न्हवता तोवरच मज्जा होती. बऱ्याच गोष्टींचे असे होते नाही कां? एकतर्फी मॅच कधी बघावीच वाटत नाही. भले आपण जिंकणार्याच्या बाजूचे असलो तरी. अटीतटीने, शेवटच्या क्षणापर्यंत हारजितीचे पारडे वरखाली करणारी मॅचच लक्षात राहते. निवडणूकांचे निकालही exit poll प्रमाणेच आले तर चर्चेतही येत नाहीत. न्युज न टिकता ब्रेकिंग न्यूज मोठी होण्याचे कारणही हेच असावे बहुतेक. कहानी में ट्विस्ट नसेल तर काय मजा असेच झालेय. वॅनिला, स्ट्रॉबेरी आईस्क्रिमचे नाव काढताच जिभेवर चव जाणवते आणि मग तोचतोचपणा घालवायला चिली आईस्क्रिम, पुरणपोळी आईस्क्रिम हे असे मेंदूला आणि जिभेला गोंधळात टाकणारे फ्लेवर ट्राय केले जातात.  थोडक्यात काय अपेक्षित न...

व्यंगचित्रे

Image
  पा च मे ला National Cartoonist Day झाला. असे काही असते हे माहीतच न्हवते मुळी पण त्या दिवशी चिंटू त्याच्या मित्रांची स्केचेस काढतोय असे चित्र बघायला मिळाले आणि खूप काही आठवले. कार्टून बघायला , त्याचा आनंद घ्यायला लहान असायची गरज नसते हे सगळ्यात भारी. म्हणून तर कार्टून नेटवर्क , ABC किड्स , पोगो असले बघून फार फार मज्जा येते. आजही शॉन द शीप बघताना हसू येतेच आणि टॉम अँड जेरी बघून सगळा कंटाळा  जातो.  किती तरी , नावे घ्यायला लागले तर वर्ड लिमिट क्रॉस होईल एवढे शो मला मनापासून आवडतात. पण हि झाली टीव्ही वर बघायची. सगळ्यात जवळची वाटतात ती व्यंगचित्रे पेपरातली आणि मासिकातली. रोज महाराष्ट्र टाइम्स हातात पडला कि R. K. Laxman यांचे ' कसं बोललात ' वाचायला मिळे. राजकारण , समाजकारण याची ओळख त्यातूनच तर झाली. ब्रश स्ट्रोक्स मध्ये किती अफाट ताकद असते ते त्यांच्या caricatures वरूनच कळले. त्या व्यंगचित्रात कोणता नेता आहे ते शोधून बाबांना सांगायचे हा आवडता उद्योग होता त्या काळातला. इंदिरा गांधींचे केस आणि साडी , गांधीजींचा चष्मा , जयललितांच्या साडीची केप आणि या सगळ्यावर वरताण प्रत्येक...

झळ

Image
  रोजचा दिवस नवीन बातमी घेऊन उजाडतोय. खरे म्हणाल तर जुनीच बातमी अजून त्रासदायक करून दाखवतोय. कितीही असंवेदनशील असलेले मन सुद्धा याकडे तटस्थपणे बघू शकणार नाही. रोजच्या जगण्यात दुःख हे असतेच एक हिस्सा म्हणून , सध्याच्या प्रसंगापेक्षाही वाईट प्रसंग येऊन गेलेले असतात वैयक्तिक आयुष्यात. मग याच वेळी याचे परिणाम इतके खोल का होताहेत ? आजूबाजूला कोणी गेले , गंभीर आहे कळले कि त्याचा परिणाम इतका जास्त का होतोय ? एकदा वाटले कि दुःखाने इतकी समोरून धडक दिलीच न्हवती कां कधी ? तर हो खरंच   खूप फिल्टर्स होते मध्ये , अगदी लहानपणी कुणी वारले कि , बातमी अती सौम्य होऊन मिळायची. बहुदा आईबाबा , आजी आजोबा कुणाच्यातरी घरी जाऊन आलेत. तिथे काहीतरी वाईट घडलेय एवढेच कळायचे. मग कधीतरी मृत्यू हि संकल्पना कळली. जवळचे , नात्यातले ,extended family मधले कोणी गेले तरी आई बाबा होते बरोबर धीर द्यायला. दुःखाची तीव्रता कमी करायला. जे झाले ते अपरिहार्य होते. काळापुढे कोणाचे काय चालते इत्यादी सौम्यपणे समजावत. या सगळ्याची झळ कमी करायला. हळूहळू हे समजावून सांगायची गरज कमी होत गेली. दुसऱ्याला तर कधी स्वतःला धीर देण...

जळमटे

Image
  दिवस फार मजेशीर आहेत सध्याचे. मनाच्या शांत डोहात खळबळ माजायला एक छोटासा दगड पुरेसा ठरतो. आणि मग तरंग उठतच राहतात. मग अस्वस्थ मन रिकामी कामे शोधतच राहते. हे आवर ते आवर ... शोधून शोधून उकरून कामे काढावीशी वाटतात. मग सुरवात होते कपाटे आवरायला. Netflix वर organising skills च्या वेबसीरिज बघून विशेषतः मरी कोंडो ला फॉलो करून आवरायची सुरसुरी येतेच. मला तिचा सहा महिने न वापरलेली वस्तू Thank you म्हणून टाकून द्यायचा फंडा फार आवडतो. त्यामुळे कितीही स्वच्छ घर आवरले कि टाकून द्यायला , donate करायला निघतेच काहीतरी आणि ते केले कि मन उगाचच हलकेही होते. पूर्वी पत्रे , जाहिराती , मासिके यायची तेंव्हा कागदी कचरा किती व्हायचा. आमच्याकडे दर रविवारी फाडसाहेबाचा कार्यक्रम असायचा. बिनकामाची पत्रे , याद्या , पे केलेली बिले , आमंत्रण पत्रिका फाडून टाकायचे म्हणून फाडसाहेब. मज्जा यायची टराटरा फाडायला. Stress Buster म्हणतात ते हेच असावे बहुतेक. हे सगळे करून छान घड्या करून कपडे ठेवले. स्वच्छ पुसून कागद बदलून बरण्या मांडल्या , चमचे , गाळणे तारेच्या घासणीने उगीचच जोरात घासले. देव्हाऱ्यातले देवही आमसूल लाव...

२५ तासांचा दिवस!

Image
एखादा दिवस , आठवडा , फार मजेशीर उगवतो. Planner भरगच्च भरलेले असते. तरीही काही नवे दिसले , कळले , कि ते ही करावे वाटते. मग होते काय , रात्र थोडी सोंगे फार! पुरत नाही दिवस , उद्याच्या काळजीने सरत नाही रात्र आणि मग विस्कटते सारेच चक्र. मग मनात येते आजचा दिवस चोवीस ऐवजी पंचवीस तासांचा हवा होता ना! छान थंडी पडायला लागलीय , पाच मिनिटे आजून झोपलो तरी घड्याळाने पाचाचा काटा साडेपाचावर नेऊ नये अशी इच्छा सोमवारी सकाळी होतेच कि , मग वाटते हा अदृश्य तास सकाळीच असावा घड्याळात. कितीही घाई केली तरी निघताना दोन मिनिटे झालेला उशीर , प्रत्येक सिग्नलगणिक मिन्टामिन्टाने वाढला कि वाटते फिरवा कांडी जादूची आणि थांबवा या घड्याळाला. कॉफी पिताना सहज मैत्रीण online दिसते मग एकाला दुसरा असे मेसेज वाढायला लागतात. मेंदूत घड्याळाची टिकटिक वाजत असते पण हात मात्र पुढे टायपत राहतात आणि मग वाटते ' वाढव रे एक तास! ' ( लावरे तो विडिओ च्या चालीवर) . परतीच्या प्रवासात मात्र घड्याळ उलटे चालावे वाटते. २० minutes to home पटकन २ minutes व्हावे वाटते. सगळा स्वार्थीपणा. त्या घड्याळानेही आपल्याच सोयीने वागावे. मन...

कम्फर्टर

Image
    गेले आठ दहा दिवस सतत पाऊस पडतोय. Autumn सुरु होऊन महिना झाला असला तरी फारशी थंडी जाणवत न्हवतीच. पण या पावसाने हवेत दोन दिवसापुरता तरी गारवा आणलाच , आणि मग कपाटातल्या जाड पांघरूणाना बाहेर यायचे वेध लागले. रजई , दोहर , गोधडी , doona काहीही म्हणा आहेत हे सगळे कॅम्फर्टर. इथल्या अल्पकाळ टिकणाऱ्या थंडीमुळे हि सगळी पांघरुणे वर्षाचा बराच काळ कपाटात hibernation mode मधेच असतात. त्यामुळे बाहेर निघाली कि डांबराच्या गोळ्या , लवंगा , वेखंड , लव्हेंडर बॉल्स असले असंख्य वास मन भरून टाकतात. वातावरण उबदार करून टाकतात. त्या बिचार्या पांढऱ्याशुभ्र naphthalene बॉल्स ना डांबर गोळ्या का म्हणतात हे एक ना सुटणारे कोडे आहे. समोर येणारी प्रत्येक घटना अनेक आठवणी नेहमीच जाग्या करते. या डांबर गोळ्यांचा वास आणि माझ्या सासूबाईंचे कपाट हे डोक्यातले एकदम फिट समीकरण आहे. त्यांचे कपाट उघडले कि कोणत्याही घडीखालून डांबराच्या गोळ्या निघतच. फारसा आवडीने ना घेतला जाणारा हा वास , आम्हा सगळ्यांच्या आठवणींच्या कप्प्यात कधी जाऊन बसला ते कळलेच नाही. अशा या जपून ठेवलेल्या धुवट साडीच्या गोधडीची सर कोणत्याच पांघरुणा...

दही

Image
ग्रोसरीच्या लिस्टमध्ये दही होते मग नेहमीच्या ओळखीच्या ब्रँडचे योगर्ट उचलले आणि पून्हा एकदा आईची आणि गंजातल्या साईच्या दह्याची , विरजणाची आठवण आली. लहानपणापासून साईच्या दह्याने गच्च भरलेला वाडगा काढून मनापासून दहीदूध भात खाणाऱ्या मनाला कितीही चांगला असला तरी योगर्टचा डबा टोचतोच. मन आणि आठवणी विचित्र असतात. कोणत्या गोष्टीला त्या कुठे नेऊन जोडतील याचा भरवसा नाही. मग चांगले वाईट , स्थळ काळ , अर्थ यांचे भान आठवणींना नसतेच. या दह्याच्या बाबतीत माझे कायम हेच होते. ज्ञानेश्वरीत माउली सांख्ययोग समजावताना एक ओवी  लिहतात. ना तरी जाणिवेच्या आयणी I करीता दधि कडसणी I मग नवनित निर्वाणी I दिसे कैसे II माऊलींची उदाहरणे देऊन समजावण्याची पद्धत , त्यामुळे असे अनेक सुंदर दृष्टांत आपल्याला सापडतात. ओवीचा भावार्थ , शब्दार्थ बराच वेगळा असला तरी मला मात्र वर्षानुवर्ष सकाळी फ्रिज बाहेर काढून ठेवलेले दही , ताकाचा गंज , रवी आणि हळूहळू ते घुसळून लोणी काढणारी आई एवढेच डोळ्यापुढे येते. किती मॅनॅजमेण्ट , प्लँनिंग इन्व्हॉल्व्ह असे या अख्या सोहळ्यात. दूध गरम करून गार केले कि पुन्हा तापवायच्या आत साय काढणे , आधीच लक...

वाचू आनंदे

Image
परवा   लायब्ररीत   लहान   मुलांच्या  section  मध्ये   Ruskin Bond   यांचे   The Road To Bazaar   हे   पुस्तक   दिसले   आणि   अक्षरश : memories flooded back!   देहरा   गावच्या   बाजारातील   सगळ्या   गोष्टी आठवू   लागल्या .  कोकी ,  मुकेश ,  सुरज   शेजारी   पाजारीच   वावरत   असल्यासारखे   वाटले .  खरे   पाहता   हे   पुस्तक   शेवटचे   वाचले   त्याला१५ - २०   वर्ष   तर   नक्कीच   झाली ,  पण   ते   जसेच्या   तसे   लक्षात   राहण्याची   जादू   त्या   पुस्तकात ,  लिखाणात   होती . असे   वाचतानां   बर्याचदा   होते ,  आपण   जणू   त्या   कथेचा   भागच   होतो .  नाकतोड्यांची   शर्यत   लावणार्‍या   या   मुलांचे   आपणही   एक   सवंगडी   आहोत   असे   वाटायला ...