Posts

दिवाळीची पणती

Image
  कॅलेंडर आले की , सणवार आणि विकएंड हे गणित मांडायला सुरुवात होते.   पुण्यात असताना सुट्टी बुडाल्याचे होणारे दुःख , इथे आनंदात रूपांतरित कधी झाले   ते कळलेच नाही. यावर्षीही दिवाळीत शुक्रवार , शनिवार , रविवार आलेत आणि त्यातही भाकड दिवस आलाय म्हटल्यावर आनंदच आनंद.  मग साधारण जूनच्या आसपास मित्रमंडळीत यावर्षी आमच्याकडे दिवाळी असे एक जण ठरवते , आणि सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहायला लागतात. मेनू प्लान होतो. ठेवणीतले कपडे बाहेर निघतात. गिफ्ट्स आणल्या जातात आणि ज्याच्या घरी कार्यक्रम ते तर दोन वीकेंड आधीपासून, घरदार आवरावरी ते घर सजवणे या सगळ्यात बिझी होऊन जातात. मेसेजेस ना पूर येतो आणि ठरलेल्या दिवशी नटून थटून सगळे वेळेत पोहोचतात. आठवणीने आणलेला फराळ , जेवायसाठी केलेले पदार्थ , दिवे , रांगोळ्या सगळ्याबरोबर उत्साहाने गप्पाच गप्पा रंगतात. खेळ होतात , टीम्स पडतात. लुटुपुटीची हार जीत होते. मेंदू खाजवत , चर्चा रंगत चहा पाण्यावर दिवसाची सांगता होते. घरी परततानाचा प्रवास मजेशीर असतो. दिवसभरातल्या गमती जमती रंगवून रंगवून एकमेकांना सांगितल्या जातात. फोटो बघताना ते क्षण परत ...

शॅापिंग कार्ट

Image
  ॲानलाईन शॅापिंगच्या चकव्यामध्ये फिरतांना मधूनच ध्यानीमनी नसलेले काहीतरी दिसते आणि मग वाया घालवलेला वेळ इतकाही  काही वाया गेला नाही असे वाटू लागते. असेच काल अचानक एका साईटवर किल्ल्यातले मावळे दिसले आणि काय भारी असे पटकन वाटले. ते प्रवास करून वेळेवर माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत , मिळाले तरी मी किल्ला कुठे करणार होते त्यांना मांडायला ? असे सगळे असूनही पाच मिनिटे मज्जा वाटलीच. किती विचित्रपणा मनाचा , कुंभारवाड्यातून असंख्यवेळा पाटीभर खेळणी आजूनही आज किती अप्रुप वाटले होते त्या मावळ्यांचे. मग छंदच लागला , अशा सगळ्या गोष्टी बघत बसण्याचा. काय नव्हते त्यात ? सगळी दिवाळी त्यात सामावलेली होती. जे जे मनात येत गेले ते कुठेतरी सापडतच होते. आणि जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही पोहचवणारे असंख्य होते. त्या पाचदहा मिनिटांच्यां ब्राउझिंगने गेल्या सगळ्या वर्षातल्या दिवाळ्या डोळ्यांपुढे नाचवल्या. आणलेले , केलेले आकाशदिवे , पणत्या , रांगोळ्या , रंग , तेल साबण उटणे….बरं नुसतं साबण दिसत नसतंच मनाला , ते आठवले की अगदी तालासुरात मोती साबणाची जहीरात हटकून आठवतेच. रांगोळीबरोबर, उदबत्तीने भोक पाड...

भान

Image
  आजूबाजूला बघतांना कळतं ; खंबीर बनायचंच असतं , थोडं अवघड असतांनाही सगळं छानंच असतं   मृदू , कोमल , हळूवार ; मन जपायला शिकलेलंच असतं , कारण आधीचं गिरमिटलेलं सगळं पुसायचं पण असतं   मेहनत , काम , कष्ट ; गरजेला सगळं करायचंच असतं , पण स्वप्न पाहातांना मात्र दिवस न् रात्रीचं गणितंच नसतं   धटाशी धट आणि खटाशी खट ,   जगराहाटीला धरून वागायचं असतं , स्वतःसाठी   मात्र स्वतःच ताठ कण्याने उभं रहायचंही असतं   चुकलं की सुधरवायचं असतं ; हरलं की पुन्हा नव्याने खेळायचं असतं , कुठेतरी कधीतरी विश्वास ठेवून बघायचंही असतं   प्रयत्नात कमी पडायचंच नसतं ; हरवलेलं शोधायचही नसतं , पण पुन्हापुन्हा गमावेल असं काही करायचंही नसतं   विचार करून , मनाशी बोलून शहाण्यासारखं वागायचं असतं ; पण तरीही प्रत्येकक्षण जगणं सोडायचंही नसतं   मनापासून जगण्याचं भान कधी सोडायचंच नसतं….   - श्रुतकिर्ती २७/१०/२०२३

माझी उशी

Image
  ही जी उशी आहे ना , कापूसच नाही तीच्या आत पण भरली आहेत स्वप्नं  मात्र   सात…. कधी रंगीबेरंगी , कधी धवल तर कधी कधी अगदीच सरळ उशीची आणि स्वप्नांची ; खुप गाढ मैत्री डोकं ठेवताच दोघांच्या गप्पा रोज रात्री डोळे ही मग यात होतात सामील , मिटून घेतलेल्या पापण्या मेंदूला ठेवतात गाफील स्वप्नांचा हात धरून डोळे खुप लांबवर जातात , दमून भागून गजराआधी बरोब्बर परत येतात चुकूनमाकून कधीकधी तिथेच रमतात , परत आल्यावर स्वप्ने उशीवरच रेंगाळतात उघड्या डोळ्यांना दिसतात ती खरी , पण हाती लागतील तर स्वप्ने ती कसली ? उशीवरची स्वप्ने लपतात उशीत परत ; उघडे डोळे आणि मन , मात्र असतात त्यांनाच शोधत   - श्रुतकिर्ती ०८/१०/२०२३

काहीतरी राहिलंय!

Image
गणपती गौरींच्या आधीचा वीकएंड आला आणि हळूहळू चाललेल्या तयारीने वेग घेतला. सगळे बिट्स अँड पिसेस जुळून यायला लागले. घर आवरलेले दिसायला लागले आणि सणाचे वातावरण जाणवायला लागले. तशा याद्या , पुन्हा पुन्हा केलेल्या याद्या , खरेदी हे सगळे बरेच आधी चालू असतेच पण वेग येतो तो दोन दिवस आधीच. मेंदू आणि हात भराभर चालतात आणि to do   लिस्ट टिक ऑफ व्हायला लागते. एकाच्या जागी चार हात उत्साहात कामाला लागतात आणि दमायला न होताच कामाचा उरक पडतो. पण हे सगळे चालू असताना मन मात्र एकीकडे काहीतरी राहिलंय , काहीतरी विसरलंय असे सारखे सांगत असते. मेंदू आठवायचा प्रयत्न कसून करत असतो पण छे! सगळे झालेय , होत आलेय असेच चित्र कागदोपत्री दिसत असते. "तुला शंकाच जास्त " "टेन्शन आलाय का ? म्हणून असे होत असेल" अशी उत्तरे मिळूनही काहीतरी राहिलंय चा भुंगा काही पिच्छा सोडत नाही. मग शेवटचे अस्त्र निघते. पूजा , व्रत-वैकल्ये आपल्या समाधानासाठी असतात. काही राहिले तरी त्याने फार फरक पडत नसतो. भक्तिभाव महत्वाचा. तो गणपती काही हे राहिले ते राहिले असे म्हणणार नाहीय. असे सगळे सल्ले मिळतात. ते मनाला माहित अस...

नीलमोहोराचे झाड

Image
फुलांनी बहरलेलं नीलमोहोराचे झाड, जाता येता हसतं ओळखपाळख नसतांनाही, दोन मिनिटे रस्त्यात थांबवतं मी ही शिष्टासारखी,  उगीच थोडीशी हसते त्याचे फुललेले रूप डीपी वर चिकटवून, ओळख साजरी करते फुले गळली, फांद्या उरल्या तरीही झाडाने रोजच,  ओळखीच्या खुणा मिरवल्या मीच आपल्या नादात, माझी रोजचीच घाई उगीचच जातायेता एकदा झाडाला बघून जाई झाड तिथेच, तसेच उभे शिशिरामुळे निष्पर्ण  पण तितकेच देखणे लांबूनच त्याला बघून, मला उदासी जाणवली झाडाने मात्र अजूनही, ओळखीचीच हिरवी खुण दाखविली ऋतू बदलले, झाड पुन्हा बहरले भरभर चालणार्या माझे, थोडे पाउल रेंगाळले नीलमोहोर पुन्हा फुलला, आता मात्र मी रस्ता बदललला नीलमोहोराची फुले आता टपटप गळतात झाडाखाली गप्प बसलेल्या माझ्याशी खुप गप्पा मारतात… -श्रुतकिर्ती ०२/०९/२०२३

जमतंय…

Image
  अरे वा! जमलं की तुला पटकन म्हणाले कोणीतरी भारी वाटतेच मग , विषय असला अगदी आलाणा फलाणा तरी   पण खरे उत्तर शोधलेच तर ; जमवण्याचा प्रयत्नच चालू असतो ना दिवसभर धडपडून , पडझडून कसेही करून “ जमले की!” हे एकच वाक्य मनाशी धरून जमलंय का मग खरंच ? प्रश्न पडला कि संपलच   रोजच मग , जमण्याच्या रस्त्यावर चालत चालत दूर मनातल्या मेंदूतल्या जंगलात हरवत जिथे दिशा एकच , वाटा मात्र अनेक रस्ता अंधारा मात्र मधूनच सुर्याचा किरण एक झाडापानांतून झिरपणारा सुर्यप्रकाश हाताला धरून मार्गांवर चालवतो सावकाश   जमतंय जमतंय सांगाणारे आजूबाजूचे आवाज मनात मात्र शंकेचीच मोठी गाज इतके अवघडही नसते प्रत्येकवेळी पण सोपेही नसतेच तिन्हीत्रिकाळी   नाही , नाहीच जमले मला बर्याचदा पण तरीही प्रयत्न चालूच आहे जमवण्याचा माझे मलाच , मनाने मेंदूला एकदातरी , “ जमले की तूला” म्हणण्याचा…   - श्रुतकिर्ती १४/०८/२०२३

“मी पण!”

Image
काल मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवला. प्राण्यांच्या मनातले जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद करणाऱ्या एका ॲनिमल कम्युनिकेटर किंवा व्हिस्पररचा. छानच होता. लगेच बोलता बोलता हीलर , ॲारा रिडर असे सगळे विषय चर्चेत आले. हे सगळे खूप इंटरेस्टिंग आहे वाटायला लागल्याने आणखीन चार दोन व्हिडिओ पाहिले. AI च्या कृपेने लगेच ऑनलाईन कोर्सेस च्या जाहिराती दिसायला लागल्या आणि आपणही हे करून बघावे असे मन मांडे खायला लागले. मनातलेच मांडे पटकन तयार झाले आणि डोळ्यापुढे पार क्रिस्टल बॉल , धूर , रंगीबेरंगी स्टोन्स आणि मध्ये मी असले चित्र दिसले. तेवढ्यात ,   दुसऱ्या एका मैत्रिणीने रिकाम्या डब्यात चार लाडू घालून पाठवले होते ते आठवले. मैत्रिण सुगरण. मिठाया खाव्यात तर तिच्याच हातच्या. त्यामुळे पटकन लाडू तोंडात टाकला आणि आपणही डिंक आणून ठेवलाय विकेंडला लाडू करूया. तेव्हा हिलाच विचारू नक्की काय केले , हेही मेंदूने नोंदवून ठेवले. तिसऱ्या मैत्रिणीची बाग फार छान. कोणतीही काडी तिने जमिनीत रोवावी आणि रोपाने बहरून फुले फळे द्यावीत इतकी तिची हातोटी. तिची फुलेपाने पाहिली की तो विकेंड बाग खुरपण्यात आणि आहे ती चार झाडे खत -माती ...

भाजीवाली

Image
  रविवारच्या असंख्य ठरवलेल्या , 24 तासात 28 तासांची कामे फिट करण्याच्या यादीत भाजी आणि भाजी बाजारातील चक्कर सकाळ सकाळच्या प्रायोरिटी लिस्ट मध्ये मोडते. तसेच आज सकाळी भाजी घेताना नेहमीची भाजीवाली घेतलेल्या कोथिंबीर पुदिनाच्या जुडीला थांब   थांब म्हणत पुदिन्याची दुसरी जुडी घेऊन आली. ती मुळे असलेल्या काही काड्या असलेली. कुंडीत लाव आता. स्प्रिंग आला की तुला खूप पुदिना मिळेल , असे तिच्या मोडक्या तुटक्या व्हिएतनामिज इंग्रजीत हात वारे करत करत म्हणाली. कुठला तो भाजी बाजार ,   त्यातली माझ्यासारखी अनेक गिऱ्हाईके. ती   बऱ्याच जणांशी असं छान छान वागत असणार. पण मला एकदम स्पेशल असल्याचे भारी फिलिंग आले. आणि रस्ताभर अशा सगळ्या भाजीवाल्यांची आठवण रविवारचा रस्ता पटकन संपवणारी ठरली. आईच्या दर शनिवारच्या राणी लक्ष्मीबाई मंडईतली चिंगी. एका शनिवारी आईने भरपूर भाज्या थोड्या थोड्या आणि एक वेताची दुरडी घेतल्यावर , काय चाललेय ? हा प्रश्न विचारून मुलगी फॅन्सी ड्रेस मध्ये भाजीवाली होते म्हणताच , “ त्याच शाळेबाहेर मी बोर चिंचा विकते.माझ्याकडून पानाची चंची आणि कमरेचा पट्टा घे” म्हणाली. आ...

मागे वळून पाहतांना …

Image
काल तीन- साडेतीन वर्षांनी आम्ही दोघी पुन्हा आमच्या पुर्वी नेहमीच्या असलेल्या कॅाफी शॅापला गेलो. कारण तीचे मला भेटायला दुरचा प्रवास करून येणेच होते. तीच कॅाफी सांगितली आणि नेहमीचा टी केक मागितला… काउंटरवरची मुलगी बावचळली, आमच्या कॅफेत असा केक नसतो म्हणाली आणि मधली वर्षे निघून गेल्याचे भान आम्हा दोघांनीही आले. मग वेड्यासारखे हे बदलले, या जागी ते आले….. मागे वळून बघण्याचा छंदच लागला . घरी आले शुक्रवार आला, आणि जाणवले आज शंभरावा ख्वबिदा . काल दुपारचा चळ आज परत लागला. आणि आठवडे न् आठवडे मागे घेवून जाउ लागला. नांव सुचणे ते ब्लॅाग तयार करणे ही प्रोसेस सोपी होती. पण हे काय असावे पेक्षा यात काय नसावे हे ठरवणे अवघड होते. मनात कधीही केंव्हाही कसेही randomly  येणाऱ्या विचारांचा हा ब्लॅाग तर मग यात सगळेच असणार की, स्वत:चा शोध सुज्ञपणाने घ्यायचा होता. मीपण शोधतांना मीपणाने दुखवणे, खुपवणे, जखमांच्या खपल्या काढणे, उगाच स्वतःलाच असला तरी सल्ला न देणे हे पक्के ठरले आणि मग सगळे सोपे झाले. कोऽहं हा प्रश्न त्रयस्थ बनून स्वतःकडे पाहीले की सुटतो हे समजल्याने, विचारांना न थांबवायला मेंदूला जमायला लागले. म...