Posts

Image
  रोज संध्याकाळी फिरायला जाताना बऱ्याच घरांमधून स्वयंपाकाचे वास येत असतात. आपले जेवण घरी तयार असले तरी हा वास कोणत्या पदार्थाचा हा guessing game मेंदू खेळतच राहतो. काही काही पदार्थांचे , वस्तूंचे गंध मनातल्या असंख्य तारा छेडून जातात. नाकाला जाणवणारे हे वास मनाला वेगळ्याच जगात transport करतात. सकाळी सकाळी कॅफे समोरून नुसते चालत गेले तरी खडबडून जाग येते , पोटात कॉफी न जाता देखील. पहिल्या पावसाचा सुगंध प्रत्येकाला आवडतो. कवीला कविता सुचवतो तर तुम्हा आम्हाला वेध लावतो तेलात चुर्रर्र आवाज करत तळल्या जाणाऱ्या डाळीच्या पिठाचे. खरपूस भाजली गेलेली माती आणि त्यावर पडलेले पाण्याचे चार थेंब! त्यामागून मनात यायला लागतो तो रस्ताभर सडा पडलेल्या गगनजाईच्या फुलांचा सुवास. या सुवासांना जोड मिळते या पावसाळी वातावरणात येणाऱ्या सणावारातील फुले पाने ,  उदबत्ती ,  कपूर याच्याबरोबर येणाऱ्या नैवैद्यातल्या पदार्थांची. एकदा कोणताही सणवार नाहीच हे माहित असताना देखील आमच्या घरी जेवायला आलेल्या पाहुण्याला सत्यनारायण आठवलेला. कारण फक्त अळूवडी आणि उदबत्ती यांचा एकत्रित वास. समुद्राच्या जवळ पोचायला ल...

कॅलेंडर

Image
नोव्हेंबर शेवटाला आला कि वेध लागतात कॅलेंडरचे , आणि मग हातात येते नवे कॅलेंडर. कधी छान चित्रासाठी घेतलेले तर कधी त्यातील अधिक माहितीसाठी. कॅलेंडर हाती आले कि काही गोष्टी पटकन बघितल्या जातात. वाढदिवस कोणत्यावारी येतोय ? गणपती केव्हा आहेत ? दिवाळीत भाकड तिथी आलीय का ? जोडून सुट्ट्या किती आल्यात ? ह्यातले काहीच न बघणारा विरळाच. काही कॅलेंडरच्या मागील भाग वाचनीय असतो मग निवांत पणे तो वाचणे हे ओघानेच आले. शनिवार , रविवारची वर्तमानपत्राची पुरवणी वाचल्याचे फीलिंग येते त्याने. पाककृती , भविष्य ते रेल्वे टाईमटेबल वाट्टेल ते सापडते त्यात. महिना संपल्यावर , पान उलटल्यावर त्या पानांचे विविध उपयोग सुरु होतात. लहानपणी पुस्तकांना कव्हर घालायला आणि मोठे आकडे असले कि ते कापून रोल नंबर तयार करायला हि पाने मी आणि माझ्या आसपासचे वय असणाऱ्या बऱ्याच जणांनी वापरली असणार नक्की. काही कॅलेंडर फार देखणी असायची. एकच मोठे चित्र आणि फाडून टाकायच्या महिन्याच्या पट्ट्या. कधी कधी त्या तारखांच्या पण असत. रोज ती तारीख फाडायला काय गम्मत यायची. बहुतेकवेळा किराणावला असले कॅलेंडर द्यायचा आणि हमखास त्यात जाडपुठ्यावर छापले...

शिंपला

Image
  मी आणि माझ्या दोन मैत्रिणी समुद्राकाठी चालत होतो. सुदैवाने आम्ही तीन आणि तो अक्खा किनारा , या व्यतिरिक्त कोणीच न्हवते. अचानक माझी नजर एका उघडलेल्या शिंपल्याच्या पेटीकडे गेली. आवासून उघडा पण तरीही दुसऱ्या भागाशी जोडला असलेला शिंपला उन , पाणी , वाळू , यात चमकत होता. न रहावून मी तो उचलला आणि झिप बॅग मध्ये लॉक केला. आणि मग त्या शिंपल्याने मन जणू अनलॉक केले , तिघीनांही नादच लागला. शंख , शिंपले , गोगलगाई , खेकड्यांची घरे , समुद्रीफेसाचे दगड बघता बघता स्थळ काळ वेळेचे भान हरवून बसलो... हे म्हणणे किती सोपे आहे कि भान हरपले पण खरंच तसे होते कां ? नक्कीच आम्ही रोजच्या धकाधकीतून , व्यापातून बाहेर पडलो होतो. समुद्र , लाटा , वाळू , झाडे , दगड अन धोंडे सगळ्यात रमलो होतो. गप्पांमध्येही रोजच्या उरलो न्हवतो. पण मेंदूचा एक कप्पा रोजचीच कामे करत होता. Ferry च्या वेळेकडे घड्याळाचे लक्ष होते , ठराविक अंतरापासून परत फिरायचे हि टिकटिक डोक्यात वाजत होती. चांगली जागा सापडली कि बसून थोडे खाऊया याची जाणीव पोटातली गुरगुर करून देत होतीच. तरीही हे आमच्या वागण्या बोलण्यात कुठंच न्हवते. तिथे उरल्या होत्या शंख...

चहा

Image
“ आज आपण खरा चहा पिऊया का ?” या वाक्याने शनिवारची सकाळ उजाडली आणि पाचच मिनिटात उकळणाऱ्या चहाचा सुगंध घरभर पसरला. आता प्रश्न पडेल कि खरा चहा हा काय प्रकार ?   तर खरा म्हणजे आपला नेहमीचा भारतीय उकळलेला , साखर घातलेला , झाकण ठेवून मुरात ठेवलेला , माफक दुधाचा चहा. एरव्ही सत्राशेसाठ flavour चे , थंड , गरम , दूधविरहित , डीपडीपचे , व्हेंडिंग मशीनचे असे सगळे झाले कि आठवण येते अमृततुल्य कटेल चहाची. मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या असंख्य आठवणी असणार त्याच्याशी जोडलेल्या. ज्या त्या पदार्थात कांदा , लसूण , टोमॅटो , टाकल्यासारखे रोज चहात आले , गवतीचहा , वेलदोडा , मसाला टाकला कि त्या वाफाळणाऱ्या चहावर अन्याय होतो. हा सगळा मेकअप एखाद्या special पावसाळी , धुक्याच्या दिवशी. घरी कोणी आले कि पाच मिनिटात आधण ठेवल्याचा आवाज आला कि त्या घरातल्या लोकांशी मनातून आपोआप नाते जुळते. “ चहा ला या एकदा ” मधली आपुलकी अस्सल चहाबाजलाच कळते. नाजूक नक्षीच्या कपातून काय किंवा काचेच्या ग्लासातून काय वेळेला चहा मिळाला कि बाकीच्या गोष्टी नगण्य ठरतात. मी आणि माझी एक मैत्रीण चहा टाक आलेच म्हणून चहाला भेटायचो आणि ...
Image
  पहिलीच्या वर्गातल्या wobbly tooth चर्चेने हळूहळू tooth fairy आणि Santa कडे मोर्चा वळवला. प्रत्येक गटात असतोच अश्या , एका धाडसी , confident   मुलाने “I know fairies don't exist and there is no Santa” असे म्हणताच सगळा गलका एकदम शांत झाला. एकीच्या डोळ्यात पाणी पण आले . एक छोट्याश्या मुलीने मात्र ठसक्यात , “I know they don't exist but I believe in them and their magic. ”   असे म्हटले आणि माझ्याजवळ येऊन  “ Do you believe in them, Mrs K? ”   असे म्हटले मात्र आणि विचारांचा एक मोठा गुंता मनात तयार झाला. तिने हे किती सोपे केले होते स्वतःसाठी , माहित आहे ते खरे नाहीत पण मी विश्वास ठेवते आहे त्यावर. आपणही हेच करतो कि , अनेक माहित असलेल्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतोच कि फक्त तिचा पुढचा भाग , च्या जादूवर विश्वास असणे मोकळेपणाने मान्य करण्याचा , तो वयानुसार हरवत जातो. खरेतर अवतीभोवती किती जादू घडत असतात पण प्रत्येक घटनेचे विवेचन , एक्सप्लेनेशन , reasoning देऊन देऊन आपण त्यातली जादू घालवूनच टाकतो. सकाळी उठून झाडावरची नवी पाने फुले पाहणे यात मॅजिक आहेच कि. द...

वाट...

Image
  Turn right after  500   metres   असे GPS काकू शांतपणे सांगत होती आणि मीही वळायची तयारी करू लागले. ती सांगेल तिकडे जाण्यातला यांत्रिकपणा उजवीकडे वळल्यावर लक्खपणे जाणवला , डावीकडे वळल्यावर काय लागते हे चौकात बघायचेच राहून गेले होते. नकाशाने ठिकाण शोधणे सोपे केले पण निदान तो वाचताना दिशा चुकण्याची तरी शक्यता होती. नकाशा उलटा धरला म्हणून तरी वेगळे ठिकाण सापडत होते. इथे सगळे सरधोपट होते. चुकू म्हटले तरी हि  reroute करून योग्य ठिकाणीच नेणार होती. मनात आले रोजच्या जगण्याचा GPS नको असायला. कोणता मार्ग निवडू याचा विचार करायला , चुकायला , सल्ला मागायला वाव तर हवाच. या पाऊलवाटा , रानवाटा , रस्ते , हमरस्ते.... प्रत्येक प्रवाशाला त्यांचे आकर्षण असतेच. सगळ्यांनी चोखाळलेली चालून चालून गुळगुळीत झालेली वाट सोपी असली तरी मनातल्या भटक्याला अनवट वाटेवर जावे वाटतेच , पुढे जाऊन हा रस्ता ध्येयाला पोचणार का no through असणार हे जाणून घेण्याचे कुतूहल शिल्लक राहावे. समोर दोन वाट आल्या कि मनात संभ्रम निर्माण होतो. निवड कधीच सोपी वाटत नाही. 'The Road Not Taken' या कवितेत Ro...

रांगोळी

Image
दिवाळीच्या तयारीसाठी कपाट उघडले आणि कोपऱ्यात एका काचेच्या बरणीत पुण्याहून सांभाळून आणलेली पांढरी रांगोळी दिसली , मन बघताबघता कितीतरी विचारांना , आठवणींना स्पर्शून आले. रांगोळी या शब्दाबरोबर मनाला दिसतात ते आईने देवापुढे काढलेले शंख , चक्र , गदा , पद्म! कितीतरी वर्षे लोटली तरी त्याचे चित्र लक्खपणे डोळ्यापुढे उभे राहते. कुठल्याही बिल्डिंगचा जिना उतरताना एखाद्या दारापुढे रांगोळी दिसली की नजर एक क्षण ठरतच असे. नीटनेटकी ठिपक्यांची रांगोळी हे घर टापटिपीचे असेल असा भास उगाचच निर्माण करी. लहानपणी दिवाळीत पुढच्या मागच्या अंगणात रांगोळी काढणे हा एक मोठा कार्यक्रम. कागदाला उदबत्तीने भोके पाडून सरळ रेषेत ठिपके काढायला मोठे skill लागे. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी माझे फ्रीहँड तेवढ्याच दिमाखात सगळ्यांना दाखविणारे आईबाबा आजही आठवतात न्हवे जाणवतात. आपण वेडीवाकडी रांगोळी काढलीय हे कधी गावीही नसे , काढल्याचाच आनंद फार मोठा असे. पुराणापर्यंत इतिहास असणारी रांगोळी तिचा संस्कृत अर्थ ; कलेचा रंगाद्वारे अविष्कार ( a creative expression of art through colours) आपल्या विचारणा मोठा आयाम देऊन जाते. दा...

एक होती परी...

Image
सुनिताबाई देशपांड्यानी ' आहे मनोहर तरी ' मध्ये पाखरांना सांगण्याच्या गोष्टीत , एक होती परी कि एक होती म्हातारी... एक होती परी आणि ती झाली म्हातारी असे म्हटलेले वाचले आणि आठवणीतल्या सगळ्या म्हाताऱ्या पऱ्या डोळ्यापुढे फेर धरून नाचू लागल्या. साधी पुरी करताना ती टम्म फुगली किंवा अगदीच फुगली नाही कि मला दुर्गाबाई भागवतांचा , करणारा फुगला म्हणजे चिडला नसला कि पोळी , पुरी फुगते हा संदर्भ हमखास आठवतो आणि उगीच हसू येऊन मनावर जादूची कांडी फिरते. टोपपदाराची साडी पाहिली कि शान्ताबाई शेळक्यांना अक्का म्हणणाऱ्या सरोजिनी बाबर आठवतात , तर अठराव्या शतकातली युरोपिअन चित्रे पहिली कि Jane Austin आठवते . या आणि अश्या कितीतरी छोटया छोटयाजादू करणाऱ्या पऱ्या अवती भोवती सदैव वावरतात आणि असंख्य जादुई क्षण देऊन जातात. रोजच्या कामात अगदी साधा सुरकुतलेला कपडा नीट झटकून वाळत घालताना किंवा अगदी साधी आमटीला फोडणी घालताना ते काम आईसारखे जसेच्या तसे जमले कि लहानपणापासून असंख्य जादू करणारी आपल्या आयुष्यातली हि आद्य परी आपल्या वाढत्या वयाबरोबर म्हातारी झाली याची प्रकर्षाने जाणीव होते. शाळेतल्या बाई , आव...

Are you a local?

Image
  हा प्रश्न मुळ गाव सोडल्यानंतर फार वेळा समोर येतो ,  मन नक्की त्याजागेत कधी रमते ?  हाच तो क्षण असे   pin point   करता येते कां ?   Electricity   च्या बीलावर नांव आले की ?  मतदार यादीत आलात की ?  घरदार झाले की ?   नक्की कधी ? Office   मधले सहकारी पहिल्या नावाने ओळखू लागले की ?  नेहमीचा कॉफीवाला न मागता   order   तयार करू लागला की ?  राहता तिथले प्रश्न आपलेसे वाटले की ? देश बदलला असेल तर भाषा ,   अन्न आपलेसे केले की ? हे सगळे घडूनही मन आपल्या मुळ गावाची देशाची ओढ धरून असतेच. मग नक्की काय घडते आणि हा प्रवास सुरू होतो ? माझ्या रोजच्या रस्त्यावर एक   bottle brush tree   आहे ,  एक गुलमोहोरही आहे. पुर्वी हा गुलमोहोर पाहीला की मला पुण्याचा मे महीना आठवायचा ,  मन उन्हाळ्यात फेरफटका मारून यायचे आणि आठवणीत रमायचे.... या वर्षी वसंतात   bottle brush   अचानक फुललेला दिसला   आणि मी गुलमोहराची आणि पर्यायाने उन्हाळ्याची वाट पाहू लागले. मनाने दक्षिण उत्तर गोलार्धाचे ,  उन्हाळी मह...
Image
  ही कहाणी आहे एका थोरलीची आणि दोन धाकट्यांची. (वयाने मोठ्या छोट्या म्हणून थोरल्या धाकट्या बरंका ! ) थोरली मुलांच्या , स्वतःच्या वेळा जुळवता याव्यात म्हणून नोकरी बदलते आणि तिथे तिला भेटते धाकटी .  ती  तिच्यासारखीच , शिक्षण वेगळे घेऊनही वेगळीच नोकरी करणारी. शांत , जरा अबोलच , नाजुकशी! हि मात्र अगदी उलट , सदैव गप्पाटप्पा , धांगडधिंगा. पण कसे कोण जाणे सूत जुळले. थोरलीला धाकटीच्या शांत स्वभावामागचा उत्साहाचा झरा सापडला तर धाकटीला बडबडीपलीकडची शांतता. थोरली धाकटीला सांभाळून घेते या पब्लिक फेस मागे अगदीच उलट चित्र प्रत्यक्षात असे. धाकटीच्या गंभीर पण ठाम स्वभावाचा निर्णयात मोठा role असे. वर्षामागून वर्षे गेली आता एकमेकांशिवाय आयुष्य शक्यच न्हवते आणि थोरलीने गाव बदलले. धाकटीचे कसे होणार हि चिंता आजूबाजूच्या साळकाया माळकायांना पडली. पण मुळातली खंबीर धाकटी अधिकच खंबीर झाली आणि थोरलीशिवायच्या रूटीनला लागली. मोठी मात्र दुसऱ्या मातीत रुजली नाही. धाकटीशिवाय रोजचे आयुष्य एन्जॉय करू शकली नाही. आणि एक दिवस एक गम्मत झाली तिला एक नवी धाकटी मिळाली खूप वेगळी अगदी उलट स्वभावाची , बावच...