Posts

शून्य गढ शहर…

Image
सध्या रोज ऊन पावसाचे चक्र चालू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी असेच ढगाळलेले , टाचणी टोचली तरी धबाधबा  पाऊस पडेल वाली परिस्थिती.  रेडिओवर अगदीच ढणढण पंजाबी गाणी लागले. पाऊस पडायच्या ऐवजी ,   पळून जाईल हीच शक्यता वाटल्याने त्याजागी जमेल ती पहिली प्ले लिस्ट लावली. सुदैवाने पाचव्या सेकंदाला कुमार गंधर्वांच्या आवाजात अवधूता… ऐकू आले आणि हुश्श्य झाले. पावसालाही सुरांची साथ आवडली आणि तो एका लयीत कोसळू लागला.  एक दोन गाणी संपली आणि लागले ‘शून्य गढ शहर’ ... फक्त पावसाचा आणि तंबोर्‍याच्या सूर ,  आणि त्या जादुई स्वरांत  ते निर्गुणी भजन! संत गोरक्षांच्या त्या शब्दांना नुसते ऐकून , पटकन ,  काय तर विचार करूनही लवकर अर्थ लागत नाही. तशीही या निर्गुणी भजनाची गंमतच असते. दोन स्तरांवर चालणारा प्रवाह असतो तो.  शब्द सांगतात त्याला हि सुंदर अर्थ असतो पण त्या पलीकडे साधकासाठी लपलेला अत्यंत गुढ तर्कसंगती च्या कोणत्याही व्याख्येत न बसणारा अर्थाचा खोल डोह असतो.  त्यात बुडी मारली की बाहेर येणे अशक्य. एकेका वाक्याच्या दोह्याच्या, पंक्तीच्या भोवर्यात किती वेळ अडकलात , त्याचा ...

Missing Piece

Image
  नेमेची येतो मग पावसाळा , सारखी गणपती , दसर्यानंतर दिवाळी आली. जाहिराती ती जवळ आलीय हे विसरूच देत नाहीत. दिवाळीचे वेध लागायला लागले की भाजणी , पीठं , पोहे हे सगळे पाहीजे तस्से आणायचे तर इथे थोडी fielding लावावी लागते. stock संपायच्या आधी भाजणी , अनारस्याचे पीठ secure करावे लागते. घरी करायचे नसेल तर वेळेत order ही करावे लागतेच. तसे या वर्षीही हे सगळे उद्योग करून झाले. आता सगळी कच्ची तयारी करून झाल्यावर , पुढे काय याची सगळी योजना मनात तयार होती..  पण मनातच तयार होती. चार मैत्रीणींच्या नादी लागून चकली , शेव तयार झाली. आणि बाकीचे पुढे ढकलले जायला लागले. काहीतरी missing होते. कळतय पण हात वळत नव्हते. आता बिना करंज्या अनारस्यांची ही दिवाळी जाते काय ही भिती घरातल्यांना वाटून गेली. आणि अगदी अचानक… Fedex चा msg आला. आज parcel delivery असण्याचा. काय घेतलेय याचा विचार करूनही उत्तर नकारार्थीच होते. दुपारी खोके आले. पुण्याहून पार्सल आले होते. घरून फराळ आला होता. सगळा कंटाळा एका क्षणात गेला. दिवाळी खरच सुरू झाली. मागच्या वर्षीसारखे विचित्र वर्ष आणि एक दोन दु:खद घटना वगळता घरून पार्सल आले ...

वाढदिवस

Image
  या आठवड्यात ख्वाबिदा सुरू होवून एक वर्ष होतय. थोडक्यात ख्वाबिदाचा वाढदिवस आहे. जन्मदिवस नाही , कारण हे मनात येणारे विचार तेही random, haphazard… त्यांचा जन्म कधी झाला हे रूढार्थाने कळूच शकत नाही. पण हो वाढदिवस मात्र आहेच. आधी ते फक्त मनात असत , मग गेल्या वर्षभरात कागदावर आले. Random असले तरी कागदावर उमटतांना त्यांच्यांत काहीतरी सुसंगती यायचीच. मेंदू लिंक सोडत नाही कितीही फिरले तरी. कागदावरुन ते अनेकांच्या डोळ्याखालून गेले. कधी त्या विचारांनी हसवले , कधी माझ्या डोळ्यांची कड त्यावेळी पाणावली असणार याची जाणिव करून दिली. कधी आवडले , तर कधी हे काय काहीतरीच असेही वाटले असणार. पण दोन मिनिटे हे काय ? असा विचार नक्कीच मनात आला असणार. विचारांनी विचार करायला लावावे यातच मज्जा आहे. ख्वाबिदाचा उद्देशच स्वत्वाचा शोध घेणे. प्रत्येक विचारच्या कृतीच्या मागचा प्रवास बघणे , तोही शक्यतो तटस्थपणे , चुक बरोबर , रागलोभ बाजूला ठेवून. हाच होता आणि हाच आहे. विचारांना स्वप्नं बघायची सवय लागली की ती सवय सुटतच नाही. त्या प्रवासाला शेवट नाही. मजा प्रवासातच. त्यामुळे मन , मेंदू , विचार सगळे आहेत तोवर ख्वबि...

छोटी सी आशा!

Image
    उन्हाळा सुरू व्हायला लागला कि , चाफ्याची पाने गळतात. निष्पर्ण चाफा सुंदरच दिसतो. पण त्याला पाने यावीत. असे मनापासून वाटत राहते. रोज सकाळी सकाळी पान आलं का , बघून नाही आले , यांचे   वाईट वाटत होते. पाणी , माती , खत सगळे होते. पान येणार तेंव्हाच येणार होतं. पण छोटीशी इच्छा होतीच ना , पान येऊ दे अशी. अशा किती गोष्टी असतात , ना स्वार्थ ना काही फायदा. पण वाटते असे व्हावे आणि तसे व्हावे.   या छोट्याशा इच्छा , तशाही आपल्या कंट्रोल मध्ये असतातच कुठे ? पण मनावर तरी कंट्रोल असतो कुठे ? शेवटची ओव्हर ,   पंधरा-सोळा रन लास्ट पेयर बॅटिंगला. तरी चमत्काराची अपेक्षा करतोच ना , आपल्या टीम च्या बाजूने. केक , कुकीज , ढोकळा फुगू दे म्हणून फिंगर्स क्रॉस्ड असतातच ना ? वेदर मनासारखे असू दे , ट्राफिक नसू दे , विमानात , गाडीत खिडकीची सीट मिळू दे. छोट्या छोट्या इच्छांची यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब. छोट्या छोट्या म्हणत किती इच्छा असतात. डोळे उघडताच सुरू होतात मनात यायला आणि   दिवस मिटताना स्वप्नात बरोबरच येतात.   काही पूर्ण व्हायला थोडीशी मेहनत पुरते ,   ...

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

Image
  क धीतरी कचऱ्यातून पडलेल्या बिया तून एक छोटासा वेल आला.पाने कशा सारखी वाटतात , याच्या चर्चेमध्ये भोपळ्याला बहुमत मिळाले. आणि डोळ्यासमोर आली , टुणुक टुणुक उड्या मारत भोपळ्यात बसून जाणारी म्हातारी. हुशार , चतुर आणि   आश्वासनाच्या बळावर संकटांना थोपवणारी. आमिष दाखवून त्यांना टाळणारी. वेळ मारून नेणारी. मुलीच्या घरी जायच्या ओढीने ,   संकटे पार करणारी. का सांगतात असली तात्पर्य असणाऱ्या रूपककथा ? त्याही अगदी लहानपणी. ताटातली भाजी ओळखण्याच्या आधी हा गोष्टीतला भोपळा माहीत होतो लहान मुलांना. तेव्हा त्या म्हातारीशी वाघ कसा बोलला ? ती भोपळ्यात कशी बसली ?   असले आचरट प्रश्न ही पडत नाहीत. गुण्यागोविंदाने गोष्ट ऐकत पिढ्यान पिढ्या झोपी जातात.   हळूहळू या कथांतून मन मेंदू बाहेर पडतो.   जग कळायला लागतं. अशाच कोणत्या तरी कारणाने , या गोष्टी वेगळ्या अर्थाने , रूपाने , समोर उभ्या राहतात. नकळत तेव्हा न कळलेला अर्थ आज उमजायला लागतो.   म्हातारी सारखे आपणही कितीदा तरी वागतो ,   हे आठवते आणि हसूही येते. चार दिवसांनी परत येते या आशेवर , आपणही म्हातारी सारखे किती जणांना आणि...

पुनरागमनायच!

Image
  गेला महिनाभर गौरीगणपती विचारात, मनात सगळीकडेच ठाण मांडून आहेत. छोट्याशा आयुष्यात दर वर्षी इतके महत्त्व का आहे त्यांना ?   यानिमित्ताने खूप प्रश्न पडतात. खरंच इतकी श्रद्धा आहे ? का प्रथा-परंपरा , समारंभाची हौस ? सवय लागली म्हणून ? न केल्यावर चुकल्या चुकल्यासारखे वाटते म्हणून ? मुर्तिपूजा हा अस्तिकतेचा पुरावा आहे म्हणून ?   कारण तरी काय आटापिट्या मागचे ? पाच दिवसाच्या सणासाठी , सगळ्या घरादाराला त्यात गुंतवण्याचे ? नेहमीसारखी गडबड , लगबग सगळ्या सगट त्या गौराया आल्या , जेवल्या. संध्याकाळ आप्तेष्टांच्या सृहृदांच्या हास्याने भरून गेली. आणि रात्री समईत तेल घालताना शांततेत यातल्या सगळ्या नाही , पण बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मिळाली.त्या शांत उजेडात अगदी खऱ्या भासल्या. माझ्या जवळच्या प्रत्येकी सारख्या. मुखवटे घडवणार्याची कमाल , असे जरी मेंदू मागून टोकत होता तरी मन मात्र आपल्या मनात जे आहे तेच डोळे बघतात. मनाला सांगतात   याची जाणीव करून देत होते.   ज्येष्ठा कनिष्ठा माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या , आयुष्यात येऊन गेलेल्या किती जणींची आठवण   क्षणात करून देऊन गेल्या. आण...

गणपती '२१

Image
  गौरी गणपती जवळ आले की नॉर्मली ,  विचारात तोच विषय घोळत असतो. त्यामुळे ख्वाबिदाचा विचार करतानाही प्रयत्नपूर्वक सुद्धा दुसरे काही सुचुच  शकले नाही. आस्तिकता- नास्तिकता , मूर्तिपूजा , प्रथा-परंपरा , सोवळे -ओवळे या सगळ्या बद्दलचे कोणतेही विचार , धारणा असल्या तरी गणपती आपलासा वाटतो.हातात ब्रश घेणाऱ्या प्रत्येकाने तो रेखाटला आहे. सगळ्या संतांनी त्याला प्रथम वंदनाचा मान देऊन काव्य रचले. बहुदा आपली विचारसरणी तयार व्हायच्या आधीच हा सण आपल्याला एकतर आवडायला किंवा नावडायला लागतो. आजूबाजूला इतके वातावरण तयारच असते , की त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. मग त्या बद्दल प्रेम किंवा निर्विकारपणा नाहीतर टोकाचा राग काहीतरी तर येणारच. पण हे वातावरण आनंद देते ,  उत्साह देते एवढे मात्र खरे.प्रत्येक वेळी आठवणीत वेगळे काहीतरी लक्षात राहणारे निघते.कधी जमलेले तर फसलेले मोदक. कधी सजावट   तर कधी गणपतीची मिरवणूक. काहीना काही आठवण्यासारखे असतेच वेगळ्या वेगळ्या वर्षी वेगवेगळ्या मनस्थिती प्रमाणे लक्षात राहणारी वेगवेगळी आठवण.हे वेगळे वेगळे म्हणताना आठवले , ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ची सुर...

रेशो!

Image
  सणावारांचे दिवस चालू आहेत . सगळीकडे पुरणपोळी आणि मोदक यांची चर्चा आणि तयारी . मधेच कोणाशी तरी बोलताना उकड काढायला पाण्याचे प्रमाण काय घेतलं या ऐवजी ती पाण्याचा पिठीशी ‘ रेशो ’ काय ग ? असे म्हणाली आणि मनातल्या मनात हसूच आलं . इतका छान शब्द वापरण्याचं कौतुकही वाटलं . बरोबरच होतं तीचं उकडीत पाण्यालाही महत्त्व होतच त्यामुळे दोन्ही जिनसांचे हिस्से किती हे महत्त्वाचे वाटले तिला . सगळ्या गोष्टीं मध्ये रेशो , फ्रॅक्शन असतात नाही का ? जिथे दोन वस्तू , व्यक्ती . घटना , भावना आल्या तिथे त्यांचे कमी अधिक प्रमाण आणि ते दाखवायला रेशो ! दोन घटकांची तुलना करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण हे प्रत्येक ठिकाणीच असते . कुठलीही घटना , प्रसंग , नाते दोन घटकांचे . त्यात एकतर्फी काहीच नसते कमी-जास्त पन्नास-पन्नास अगदी एक-नव्याणव असा काहीही असला तरी रेशो हा असतोच . शंभर / शून्य असे कधी नसते . हक्क , अधिकार , अपेक्षा , कर्तव्य , राग , लोभ सगळ्यांचेच कमी-जास्त प्रमाण झाले की  नव नव्या भावना तयार होतात आणि त्यातून उभा राहतो मानवी मनाचा व्यापार . त्यातल्या एका भागात असताना , द...

मन वढाय वढाय

Image
  भीती या शब्दांचीच कधी कधी भीती वाटायला लागते. भीती , एन्झायटी या शब्दांकडे बाहेरून त्रयस्थ म्हणून बघणे आणि स्वत: त्यातून जाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. डोळ्यात टचकन पाणी येणाऱ्याला इमोशनल म्हणून हिणवणे , भित्र्यभागूबाईची उपमा देणे फार कॉमन आहे. स्वतः त्या ठिकाणी नसताना सल्ला देणेही फारच सोपे आहे नाही. कां पण हे सगळे वाटले आज ? चार-पाच आठवड्यांपूर्वी ठरले कि एक ठराविक वीकेंड एकीकडे. सकाळी लवकर जमून परतण्याची घाई न असण्याचा. भेटण्याच्या ओढीने तयाऱ्या सुरु झाल्या. उत्साहाच्या भरात एका अगदी छोटयागोष्टीकडे माझे जरा दुर्लक्षच झाले. मैत्रिणीच्या घराचा पोस्टल ऍड्रेस आता बदललाय. जिपीएस शिवाय तिच्या घरी जायला यायला आत्ता कुठे जमायला लागले आणि ताईंनी घरच बदलले. झाले! डाव्या उजव्याचा घोळ घालणारी मी गूगल काकूंनी टर्न लेफ्ट म्हटले कि तीन लेन बदलत बरोबर उजवीकडे टर्न घेते. त्यामुळे हे लक्षात आल्यावर आदल्यादिवशी पासून मोर्चे बांधणी सुरु झाली. तीनचार महत्वाची वळणे बघून ठेवली. मनाला जे होईल ते होईल वगैरे समजावत दुसरा दिवस उजाडला. आणि गूगल मॅप्स ला गम्मत करायचा मूड आला. आणखीनच भलता रस्ता तिने ...

Learning to unlearn.

Image
  गेला अक्खा आठवडाच मजेशीर होता. सोमवारी मी काहीजणांबरोबर भगवदगीता वाचत होते , वाचता वाचता मधेच फेमस , ' यदा यदा ही धर्मस्य... ' वाला श्लोक आला. आणि नीट तालासुरात गीता वाचणारा माझा मेंदू बी. आर. चोप्रांच्या सुप्रसिद्ध ट्यून ला कधी ट्यून झाला ते कळलेच नाही. कधी काळी लहानपणी डोक्यात फिट झालेली ती चाल विसरता आलीच न्हवती. मेंदूने नवी चाल शिकून सुद्धा. इतकी छोटीशी गोष्ट सुद्धा मेंदूला unlearn करायला जमत न्हवती , त्या चालीशी असलेले कनेक्शन विसरता येत न्हवते ; काहीतरी आठवणी जोडलेल्या होत्या त्याच्याशी म्हणून असेल का कदाचित ? त्याच दिवशी अफगाणिस्तानच्या बातम्या येऊ लागल्या. विडिओ पाहायला मिळाले. स्वतःचे घर दार , चालू असलेले आयुष्य एका क्षणात सोडून , जमेल तसे स्वतःच्या देशाच्या बाहेर जायला निघालेले शेकडो लोक दिसले. त्यांना त्यांचा वर्तमानकाळ सोडून जायचे होते. भूतकाळातल्या बर्याचश्या आठवणी पुढे येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करून पुसून टाकायच्या होत्या. कसे जमणार होते त्यांना ? पूर्ण पुसता येत नसतातच पण निदान तात्पुरत्या तरी बाजूला सारायच्या होत्या. काहींना ते जमेलही पण तात्पुरते , कधी ...