Posts

सरते वर्ष

Image
  आज ३१ तारीख , वर्ष संपणार आणि नवे देखील येणार. मागच्या वर्षीही , त्या आधीही वर्षानुवर्ष हेच चाललेय. तरीही येणाऱ्या वर्षाकडे बघण्याचा उत्साह टिकून आहे आणि जाणाऱ्या वर्षाकडे बघत , जमाखर्च मांडायची सवयही. माणसानेच दिवस रात्री , चंद्र सूर्याकडे बघत आठवडा , महिना , वर्ष या संकल्पना तयार केल्या आणि त्या मानून त्या बरहुकूम आयुष्य बेतले. ते बदलले कि अस्वस्थता , वैताग , निराशा सगळे पटकन येते. गेली दोन वर्षे हे सगळे जास्तच जाणवतेय. जवळच्यांना भेटायला सुद्धा इतका विचार , इतका प्लांनिंग आणि त्यानंतरही निर्णय आपल्या हातात नाही याची हतबलता. भौगोलिक अंतर किती लांब असते याची जाणीव , ते पार करावेच लागते वेळेला मनात अंतर नसले तरी याची बोच रोजच होत होती. गृहीत धरलेल्या घटना , वस्तू , प्रसंग या कडे विचारपूर्वक पाहायलाही याच वर्षाने शिकवले. किती प्लॅन ठरले आणि मोडले. काही वेळा दिवस , आठवडे संपत संपले नाहीत तर काहीवेळा , वेळ भुर्रकन उडून गेला. 'I trust you are well.' किंवा 'I'm fine hope the same at your end' हि formality अगदी formally लिहितानाही या वर्षीच हात थरथरले. आजचा क्षण महत...

कोळ्याचे जाळे

Image
    दोन तीन दिवसापूर्वी कोळ्याच्या जाळ्याचे छान छान आर्टिस्टिक फोटो पाहिले आणि मलाही जिकडेतिकडे अचानक कोळ्याची जाळी दिसायला लागली. ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने तसेही कोळी अंगणात दिसायला लागले होते. पण अंगणापेक्षा घराच्या एखाद्या चुकार कोपऱ्यात जाळे दिसले रे दिसले कि ते , सुंदर आहे का ते विणणारा कोळी कुठे आहे ?   तो निरुपद्रवी का विषारी ? तो इकोसिस्टीम मध्ये किती महत्त्वाचा त्याच्या असण्याने काय घडते ?   नसण्याने काय घडणार ?   यातला एकही विचार मनाला दुरूनही स्पर्श न करता कुंचा हातात घेतला जातो. ते जाळे काढून टाकून कोपरा कधी स्वच्छ करून लख्ख चमकवते , हेच विचार   मनात प्रकाशाच्या गती पेक्षा वेगाने येतात. मनावर चिकटलेली कोळीष्टके काढावी असे कधी येते का मनात ? जाऊदे तो विचार आज न केलेलाच बरा… पण ही सुंदर जाळी दिसायला लागली आणि एक वेगळेच सुंदर , कोळ्याचे जग दिसले. नाजूक पण चिवट. मोजून मापून पण जलद गतीने भरभर परफेक्शन साधत केलेले काम , भल्याभल्या कलाकाराला आणि यंत्राला लाजवणारे होते. आणि त्याच दिवशी उपनिषदातील एक ऋचा वाचायला मिळाली , in fact इंग्लिश ट्रा...

वेव्हलेंग्थ

Image
  रेडिओचे नवीन स्टेशन कळले , दिवसभर गाणी वाजणारे. ओघानेच ते शोधायला AM/FM विचारले आणि त्याबरोबरच एक आकडा कळला. रेडिओ स्टेशनची वेव्हलेंग्थ दाखवणारा. माझ्या रेडिओचा काटा त्या फ्रिक्वेन्सीशी जुळला की मला गाणे ऐकायला मिळणार होते. नाही तर नुसती खरखर.  तसूभर इकडे किंवा तिकडे होवूनही फायदा असणारच नव्हता. वेव्हलेंग्थ जुळावी लागणार होती न पेक्षा जुळवावी लागणार होती. मग काय मेंदुला खेळ मिळाला. अशा जुळलेल्या आणि खरखर अलेल्या wavelengths शोधायचा. नक्की काय शोधायचे होते ? मनाची एक   जडणघडण माझ्या होती , तशीच ती समोरच्याच्याही होती. एक built-in मेंटल कॉन्स्टिट्यूशन होते. माझ्या मेंदूतल्या लहरींचे प्रतिबिंबच मी दुसरीकडे शोधत होते.   नुसत्या माणसाच्याच मेंदूशी नाही तर , जगातल्या प्रत्येक वस्तूशी , प्राण्याशी , घटनेशी मी माझी वेव्हलेंग्थ तपासून पाहत होते. कधी ती जुळली मग छानच सूर जमले. तर कधी   ‘ क्रेस्ट आणि ट्रफ ’ कानठळ्या बसवून गेले. काहीवेळा बघताक्षणी तर काहीवेळा प्रयत्नपूर्वक कष्टाने ओढून ताणून.   सगळ्याच वेळी त्यातल्या दोन्ही बाजूंच्या प्रयत्नांवर ते अवलंबून होत...

लोणचे

Image
  फायनली उन्हाळा आलाय. पाऊस घेऊन आलाय. कोणतीही वस्तू , प्रसंग , ठिकाण एकटे कधी येतच नाहीत. आठवणी हातात हात घालून येतातच. उन्हाळा आणि सुट्टी , आंबे , पत्ते , प्रवास या सगळ्या नोस्टॅल्जियातून   बाहेर येणे अवघडच.   त्याच आठवणींच्या खजिन्यात एक मोठी बरणी असते , चिनी मातीची. कापडाचा दादरा बांधलेली. कधी साखरांब्याची तर कधी लोणच्याची. आजची माझी लोणच्याची होती. तीही कैरीच्या. करकरीत फोडी , लाल , पिवळ्या , पांढऱ्या मसाल्याची अंघोळ केल्यावर जशा दिसतात ते शब्दात सांगणे फार अवघड. मनातल्या मनात एक फोड जिभेवर ठेवली की सगळे शब्द तोंडाला सुटलेल्या पाण्याबरोबर गिळुन टाकायचे. कैरी बरोबर आणखीन किती प्रकारची लोणची असतात. सगळीच चटकदार पण मुख्य मान कैरी चाच. त्यामुळे उन्हाळ्या बरोबर पावसाच्या एक दोन सरींबरोबर ती आठवण न येणे अवघडच , आणि त्या आठवणी चे करायचे काय ? त्यांचे लोणचे घालू शकत नाहीना. त्या मनात इतक्या मुरल्या आहेत की, कैरी दिसली रे दिसली की पाय भाजीवाल्याकडे वळतातच.   त्यानिमित्ताने आईला एक फोन होतो. मसाला करायचा का आयता आणायचा यावर एक चर्चासत्र. मग सोपा तर आहे हातासरशी करून ट...

शब्दबंबाळ

Image
  दिवाळीच्या आसपास दिवाळी अंकांचे वेध लागायला लागतात. काहीतरी वेगळे , नवीन वाचायला मिळावे म्हणून कोणते अंक घ्यायचे याचा विचार मनात सुरू होतो.   सध्या तरी ऑनलाईन वर भागवावे लागतेय. तसाच एक अंक सापडला. वाचता वाचता एक लेख वेगळाच वाटला. विषय काहीतरी मनाची जडणघडण , समाज आणि बरंच इतर काही होता. लिहिला मस्तच होता पण पाचच मिनिटात त्या शब्दांच्या जाळ्यात हरवून जायला झाले. बरेच शब्द परिचयाचे नव्हते , मुख्य म्हणजे अगदी छान मराठीत होते आणि तिथेच ते बुचकाळ्यात टाकत होते. रोजच्या वापरात त्यातल्या कितीतरी शब्दांना रिप्लेसमेंट करणारे इंग्रजी शब्द वापरल्याने हे शब्द लवकर समजतच नव्हते. दोष अर्थातच वाचणाऱ्याचा , म्हणजे माझा होता पण शिक्का मात्र ‘काय अवघड लेख आहे ‘ असा मारला गेला. शब्दांच्या मदतीशिवाय अर्थ कळत नाही पण शब्द उमजेनात तर करणार काय ज्या त्या क्षेत्राची स्वतंत्र परिभाषा असते. त्यातील स्वतंत्र शॉर्ट फॉर्म असतात. बाहेरच्या ला ते समजणे अवघड पण म्हणून त्यांचा   वापर चुकीचा तर ठरत नाही ना. Jargon’s वापर कामासाठी करणे आणि छाप पाडण्यासाठी करणे यात फरक आहेच. पुन्हा पुस्तकी भाषा आणि ...

शून्य गढ शहर…

Image
सध्या रोज ऊन पावसाचे चक्र चालू आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी असेच ढगाळलेले , टाचणी टोचली तरी धबाधबा  पाऊस पडेल वाली परिस्थिती.  रेडिओवर अगदीच ढणढण पंजाबी गाणी लागले. पाऊस पडायच्या ऐवजी ,   पळून जाईल हीच शक्यता वाटल्याने त्याजागी जमेल ती पहिली प्ले लिस्ट लावली. सुदैवाने पाचव्या सेकंदाला कुमार गंधर्वांच्या आवाजात अवधूता… ऐकू आले आणि हुश्श्य झाले. पावसालाही सुरांची साथ आवडली आणि तो एका लयीत कोसळू लागला.  एक दोन गाणी संपली आणि लागले ‘शून्य गढ शहर’ ... फक्त पावसाचा आणि तंबोर्‍याच्या सूर ,  आणि त्या जादुई स्वरांत  ते निर्गुणी भजन! संत गोरक्षांच्या त्या शब्दांना नुसते ऐकून , पटकन ,  काय तर विचार करूनही लवकर अर्थ लागत नाही. तशीही या निर्गुणी भजनाची गंमतच असते. दोन स्तरांवर चालणारा प्रवाह असतो तो.  शब्द सांगतात त्याला हि सुंदर अर्थ असतो पण त्या पलीकडे साधकासाठी लपलेला अत्यंत गुढ तर्कसंगती च्या कोणत्याही व्याख्येत न बसणारा अर्थाचा खोल डोह असतो.  त्यात बुडी मारली की बाहेर येणे अशक्य. एकेका वाक्याच्या दोह्याच्या, पंक्तीच्या भोवर्यात किती वेळ अडकलात , त्याचा ...

Missing Piece

Image
  नेमेची येतो मग पावसाळा , सारखी गणपती , दसर्यानंतर दिवाळी आली. जाहिराती ती जवळ आलीय हे विसरूच देत नाहीत. दिवाळीचे वेध लागायला लागले की भाजणी , पीठं , पोहे हे सगळे पाहीजे तस्से आणायचे तर इथे थोडी fielding लावावी लागते. stock संपायच्या आधी भाजणी , अनारस्याचे पीठ secure करावे लागते. घरी करायचे नसेल तर वेळेत order ही करावे लागतेच. तसे या वर्षीही हे सगळे उद्योग करून झाले. आता सगळी कच्ची तयारी करून झाल्यावर , पुढे काय याची सगळी योजना मनात तयार होती..  पण मनातच तयार होती. चार मैत्रीणींच्या नादी लागून चकली , शेव तयार झाली. आणि बाकीचे पुढे ढकलले जायला लागले. काहीतरी missing होते. कळतय पण हात वळत नव्हते. आता बिना करंज्या अनारस्यांची ही दिवाळी जाते काय ही भिती घरातल्यांना वाटून गेली. आणि अगदी अचानक… Fedex चा msg आला. आज parcel delivery असण्याचा. काय घेतलेय याचा विचार करूनही उत्तर नकारार्थीच होते. दुपारी खोके आले. पुण्याहून पार्सल आले होते. घरून फराळ आला होता. सगळा कंटाळा एका क्षणात गेला. दिवाळी खरच सुरू झाली. मागच्या वर्षीसारखे विचित्र वर्ष आणि एक दोन दु:खद घटना वगळता घरून पार्सल आले ...

वाढदिवस

Image
  या आठवड्यात ख्वाबिदा सुरू होवून एक वर्ष होतय. थोडक्यात ख्वाबिदाचा वाढदिवस आहे. जन्मदिवस नाही , कारण हे मनात येणारे विचार तेही random, haphazard… त्यांचा जन्म कधी झाला हे रूढार्थाने कळूच शकत नाही. पण हो वाढदिवस मात्र आहेच. आधी ते फक्त मनात असत , मग गेल्या वर्षभरात कागदावर आले. Random असले तरी कागदावर उमटतांना त्यांच्यांत काहीतरी सुसंगती यायचीच. मेंदू लिंक सोडत नाही कितीही फिरले तरी. कागदावरुन ते अनेकांच्या डोळ्याखालून गेले. कधी त्या विचारांनी हसवले , कधी माझ्या डोळ्यांची कड त्यावेळी पाणावली असणार याची जाणिव करून दिली. कधी आवडले , तर कधी हे काय काहीतरीच असेही वाटले असणार. पण दोन मिनिटे हे काय ? असा विचार नक्कीच मनात आला असणार. विचारांनी विचार करायला लावावे यातच मज्जा आहे. ख्वाबिदाचा उद्देशच स्वत्वाचा शोध घेणे. प्रत्येक विचारच्या कृतीच्या मागचा प्रवास बघणे , तोही शक्यतो तटस्थपणे , चुक बरोबर , रागलोभ बाजूला ठेवून. हाच होता आणि हाच आहे. विचारांना स्वप्नं बघायची सवय लागली की ती सवय सुटतच नाही. त्या प्रवासाला शेवट नाही. मजा प्रवासातच. त्यामुळे मन , मेंदू , विचार सगळे आहेत तोवर ख्वबि...

छोटी सी आशा!

Image
    उन्हाळा सुरू व्हायला लागला कि , चाफ्याची पाने गळतात. निष्पर्ण चाफा सुंदरच दिसतो. पण त्याला पाने यावीत. असे मनापासून वाटत राहते. रोज सकाळी सकाळी पान आलं का , बघून नाही आले , यांचे   वाईट वाटत होते. पाणी , माती , खत सगळे होते. पान येणार तेंव्हाच येणार होतं. पण छोटीशी इच्छा होतीच ना , पान येऊ दे अशी. अशा किती गोष्टी असतात , ना स्वार्थ ना काही फायदा. पण वाटते असे व्हावे आणि तसे व्हावे.   या छोट्याशा इच्छा , तशाही आपल्या कंट्रोल मध्ये असतातच कुठे ? पण मनावर तरी कंट्रोल असतो कुठे ? शेवटची ओव्हर ,   पंधरा-सोळा रन लास्ट पेयर बॅटिंगला. तरी चमत्काराची अपेक्षा करतोच ना , आपल्या टीम च्या बाजूने. केक , कुकीज , ढोकळा फुगू दे म्हणून फिंगर्स क्रॉस्ड असतातच ना ? वेदर मनासारखे असू दे , ट्राफिक नसू दे , विमानात , गाडीत खिडकीची सीट मिळू दे. छोट्या छोट्या इच्छांची यादी मारुतीच्या शेपटासारखी लांबच लांब. छोट्या छोट्या म्हणत किती इच्छा असतात. डोळे उघडताच सुरू होतात मनात यायला आणि   दिवस मिटताना स्वप्नात बरोबरच येतात.   काही पूर्ण व्हायला थोडीशी मेहनत पुरते ,   ...

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

Image
  क धीतरी कचऱ्यातून पडलेल्या बिया तून एक छोटासा वेल आला.पाने कशा सारखी वाटतात , याच्या चर्चेमध्ये भोपळ्याला बहुमत मिळाले. आणि डोळ्यासमोर आली , टुणुक टुणुक उड्या मारत भोपळ्यात बसून जाणारी म्हातारी. हुशार , चतुर आणि   आश्वासनाच्या बळावर संकटांना थोपवणारी. आमिष दाखवून त्यांना टाळणारी. वेळ मारून नेणारी. मुलीच्या घरी जायच्या ओढीने ,   संकटे पार करणारी. का सांगतात असली तात्पर्य असणाऱ्या रूपककथा ? त्याही अगदी लहानपणी. ताटातली भाजी ओळखण्याच्या आधी हा गोष्टीतला भोपळा माहीत होतो लहान मुलांना. तेव्हा त्या म्हातारीशी वाघ कसा बोलला ? ती भोपळ्यात कशी बसली ?   असले आचरट प्रश्न ही पडत नाहीत. गुण्यागोविंदाने गोष्ट ऐकत पिढ्यान पिढ्या झोपी जातात.   हळूहळू या कथांतून मन मेंदू बाहेर पडतो.   जग कळायला लागतं. अशाच कोणत्या तरी कारणाने , या गोष्टी वेगळ्या अर्थाने , रूपाने , समोर उभ्या राहतात. नकळत तेव्हा न कळलेला अर्थ आज उमजायला लागतो.   म्हातारी सारखे आपणही कितीदा तरी वागतो ,   हे आठवते आणि हसूही येते. चार दिवसांनी परत येते या आशेवर , आपणही म्हातारी सारखे किती जणांना आणि...