Posts

संततधार

Image
    मागच्या शुक्रवारी ख्वाबिदा लिहताना तीव्र उन्हाळा त्रास देत होता . घरी-दारी प्रत्येक जण ऊन कमी होण्याची वाट पाहत होते . सोमवार पर्यंत घामेजूननच सगळी कामे चालू होती . हवामान खात्याने भरपूर पाऊस सांगितलेलाही होता पण त्या दिवशी मात्र भरपूर काय याचा अंदाज अंधुकहि येत नव्हता . मंगळवार उजाडला आणि पावसाला सुरूवात झाली . आठवडा पुढे सरला आणि पाऊसही  . गुरुवारपासून तो संततधार झाला , जनजीवन विस्कळीत ,  मथळे बातम्यात आले . अजूनही रोजचे व्यवहार चालू होते व्यवस्थित . फक्त ओल्या कपड्यांची , बूट मोजे यांची , निथळणारा छत्र्यांची , आणि दारातल्या पाय पुसण्यावर चिखलाच्या ठशांची  संख्या वाढली होती . पाच मिनिटाचे अंतर रांगत्या ट्रॅफिक ने दहा-बारा मिनिटे केले होते . आता तीव्रता जाणवायला लागली होती . नद्यांचे, धरणाचे पाणी वाढल्याची नोटिफिकेशन्स   कॅन्टिन्यूअस झाली.   रस्ते बंद , पॉवर फेल्युअर , रस्ता वाहून गेला , हे टीव्ही आणि रेडिओवर धोक्याच्या   एकामागोमाग येणाऱ्या सूचनांमध्ये सारखे क ळत होते . रोजच्या वेळेला घरी परत येताना रस्त्यातले शॉपिं...

भविष्य

Image
  आज रोजच्यासारखे कॅाफी ब्रेकमधे गप्पा मारतानां एकीने ड्रॅावरमधून पाच सहा प्रकारचे tarot card set काढले. जे आवडेल ते घ्या म्हणून प्रत्येकाला दिले , कारण काय तर तीच्या आईने ते ओळखीच्यांना वाट म्हणून दिलेले. बोलतां बोलतां ती म्हणाली की तीची आई spiritual healer आहे. आणि पुढच्या दोन मिनिटात आजूबाजूच्यांचे कुतूहल वाढतच गेले. त्या दोन मिनिटा माझेही मन कुडमुड्या ज्योतिषापासून ते मोठे मोठे tv show करणार्यांपर्यंत फिरले. का एवढे महत्व पुढे काय होणार ते जाणून घ्यायला ? काय वाढून ठेवलेय ते पहायला ? भूतकाळाच्या आठवणित रमायला सगळ्यांनाच आवडते. वर्तमान त्रासदायक असेल तर संपण्याची घाई असते. भविष्यकाळात पोहचायचे आणि तिथे सगळे अलबेल आहे असे कोणीतरी सांगावे अशी तीव्र इच्छा असते. वर्तमान छान असेल तर ते संपूच नये. त्याला दुःखाची झालर लागू नये म्हणून खात्री देणारा कोणीतरी असावा असे वाटत असते. भविष्य , ग्रहतारे दशा , कुंडली , रत्ने , खडे , tarot हे खरे का खोटे या वादात मला स्वारस्य नाही. तो आपला विषयही नाही. मनाचे खेळ आणि भविष्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतानां मेंदू आणि मन काय विचार करतात याचेच महत्...

स्वप्न

Image
  टोमॅटोच्या झाडाला फुले येऊ लागली आणि मला रोज छोटा टोमॅटो शोधायचे खूळ लागले . एक दिवस त्या पानांनी , फांद्यांनी , हिरव्यागार झालेल्या वाफ्यात दोन इटुकले टोमॅटो दिसले . म्हणजे मला एकटीलाच दिसले . ‘ आनंद पोटात माझ्यामाईना ’ या गतीने घरादाराला बातमी पोचली . दोन प्रेक्षक कुतूहलाने बागेत आले . छ्या ! ते टोमॅटो गुल . शोधाशोध झाली थोडीफार आणि निष्कर्ष निघाला , तुला स्वप्नात दिसले असणार . चोविस तास डोक्यात तेच चालू होते ना तुझ्या . टोमॅटो होते का नव्हते , तो भाग वेगळा . पण मी माझ्याच स्वप्नांकडे पुन्हा बघायला लागले . मानसशास्त्राचा अभ्यास शून्य . त्यामुळे माझे लॉजिक माझ्यापुरते लागू होणारे . विचारच जर स्वप्नात दिसत असतील तर फरक काय विचारात आणि स्वप्नात ? तसेही स्वप्नातले सत्यात आणि सत्यातले स्वप्नात आणायला विचारांचे माध्यम लागतेच . सर्वसाधारणपणे स्वप्न पडतातही कोणती ? जवळची माणसे , आवडत्या घटना , वस्तू , जागा किंवा याच सगळ्या गोष्टी , पण नावडत्या . कधी घाबरवणारी स्वप्ने तर कधी रडवणारी , कधी आठवुन नंतरही हसू उमटवणारी . कधी तुटक तर कधी लांबलचक , ब्लॅक अँड व्...

फोटोतला आनंद

Image
  एखाद्या वर्किंग डे ला डब्यातले जेवण संपवून फोन उघडला की सोशल मीडियावर कोणी ना कोणी छान छान पदार्थांचे फोटो टाकलेले असतात , आणि पाच मिनिटात यातले काय काय करावे ? जमेल का ? कच्चे सामान आहे का ? असले सगळे प्रश्न डब्यात जर काही बोरिंग काही असेल तर ते विसरायला लावतात. काल असेच झाले. व्हाट्सअँपच्या ग्रुपवर कोणीतरी अप्पे , चटणी सांबार असा सुंदर दिसणारा ब्रेकफास्ट पोस्टला होता. फोटोतुनच पदार्थ झक्कास जमला हे   जाणवत होते. फोटोतून हातात येणार नसला तरी चित्रातल्या अप्प्याची चटणीत बुडवून खाल्लेली चव मेंदूने साठवलेली होतीच ती चटकन मनाला फॉरवर्ड झाली आणि तोंडाला पाणी सुटले. म्हणजेच जिभेने दाद दिली. झाले दोन मिनिटात पक्के ठरले , आता हा पदार्थ झालाच पाहिजे. पण... या अशा पदार्थाना पूर्वतयारी हवी ना. आले मनात वाढले ताटात कसे शक्य ? मग कोणीतरी सुचवले , इंस्टंटवाले कर ना , मी रेसिपि सांगते. कोणी म्हणाले रेडी बॅटर वापर. एकाने तर ऑर्डर करण्याचे ठिकाणही कळवले. हे ऑपशन्स काही वाईट नसतात. वेळेला सगळेच  का मा ला येते , पण आज नाही. फोटोने पद्धतशीरपणेच पदार्थ करायला भाग पडले होते. डाळ-तांदू...

कोण कुठले...

Image
  काल अनिल अवचट गेले आणि माझ्यासारख्या असंख्याना , ज्यांनी त्यांना नुसतेच चित्रात पहिले होते , पुस्तकात वाचले होते , खरंच मनापासून वाईट वाटले. कितीतरी जण असतात असे. कुठेतरी वाचून , ऐकून , बघून आपलेसे वाटायला लागलेले. जवळच्यां हु न ही जवळचे झालेले. ते कधी ओळखणारही नसतात. पण ती अपेक्षाही नसतेच ना. पहिल्यांदा कधीतरी त्यांचे लिहलेले , बोललेले वाचतो ऐकतो आणि भारावल्यासारखे सगळेच वाचायला ऐकायला लागतो. काही जणांच्या बाबतीत हे भारावलेपण क्षणिक असते तर काहींचे जन्मभर पुरते. कां एवढे भारून जातो ? अगदी फॅन क्लबचे मेंबर होतो ? बऱ्याचदा आवडणारे , करावेसे वाटणारे पण न जमणारे , न झेपणारे ते करत असतात. त्या वाटेवरचा एखादा तरी पाडाव चालायची इच्छा असते मग जमो किंवा न जमो. तर काही वेळा या सगळ्याच्या पलीकडे मनाला काहीतरी क्लिक झालेले असते जे मेंदूला उलगडून दाखवताही येत नाही. हे सगळे लोक काय खातात पितात ? कुठे राहतात ? रोज काय करतात ? घरच्यांशी कसे वागतात ? या सगळ्याशी काही देणे घेणे नसते. किंबहुना ते असूच नये. ते असेल तरच अनैसर्गिक. आपल्याला आवडतो तो एखादा गुण , एखादी कला. त्या क्षेत्रातले नाणे खण...

चाफा फुलला

Image
  गेली चार-पाच वर्षे माझ्याकडे एक चाफ्याचे झाड आहे . मला भेट मिळालेले . त्यानंतरही झाडे लावली , त्याआधीही . पण हा चाफा काही फुलेना . आधी कुंडीत , मग मातीत . सगळे झाले . खत पाणी घाल , घालू नको , सल्ले मिळाले - ऐकले . दर उन्हाळ्यात फुलेल फुलेल करत त्याने ऐनवेळी घोटाळा केलाच . बागेतला एक छानसा कोपरा त्याने कधीचा आडवलाय , असे आता उगाचच मला वाटायला लागले . मनापासून आवडणारे ते झाड हळूहळू दुर्लक्षिले जायला लागले . त्यातच दुसऱ्या जेमतेम सहा महिन्याच्या रोपाला फुल आल्यावर मन जरा खट्टू झाले .   माझी एक मैत्रीण आहे फुलपान वेडी . तिच्या हातात जादू आहे . ग्रीन थंब नाहीतर अख्खा ग्रीन हॅन्डच आहे तिचा . बोलता बोलता माझा संपलेला पेशन्स तिला जाणवला . थांब थांब सांगूनही मी ते झाड काढणार असे वाटल्यावर तिने मी येईस्तोवर थांब , असा अल्टिमेटम दिला . आठ दहा दिवसांनी ती आली , तोवर मी त्या झाडाकडे साफ दुर्लक्ष केले होते . ती आली , अंगणात गेली आणि अगं येणार फुल त्याला , काढू नको , करतच परत आली . खरंच आठवड्यात कळी दिसली आणि फूल उमलले . काय जादू केली तिने काय माहित . नक्की...

पाळंमुळं

Image
  रवींद्रनाथ टागोरांचे साहित्य  गीतांजली आणि रवींद्रसंगीत डोळ्यापुढे येते आणि हे इतके अवघड कधी आणि कसे वाचायचे आणि समजायचे म्हणून बाजूला टाकले जाते. काही दिवसांपूर्वी एक कविता सापडली. काहीतरी वेगळेच शोधताना , ' आमोदेर छोटो नदी ' 'our little river' तिसरी चौथीला शिकविली जाणारी ही कविता उगीचच आवडली आणि विषय तिथेच संपला. त्यातली छोटीशी कोपोई नदी मात्र मनात मनात खोलवर दडून बसली. ब्रिस्बेन शहर ज्या नदी काठी वसलंय ती ब्रिस्बेन नदी ओलांडायची वेळ जवळजवळ रोजच येते. पण तिचा विचार करायची वेळ कधी आलीच न्हवती. कोपोई बद्दल जेव्हा रवींद्रनाथ सांगतात , एका खऱ्या जिवंत नदीचे रोजचे जगणे दाखवतात तेव्हा डोळ्यापुढे एक चित्र रेखाटले जात असते. सतत बडबड करीत अवखळपणे धावणारी कोपोई त्यांना संथाल कन्येची आठवण करून देते. आटलेली असताना त्यात खेळणारी मुले तर पाणी असताना त्यात वाढणारे धान. सगळे शब्द डोळ्यापुढे काहीतरी आणतात. रवींद्रनाथांच्या कवितांत , गोष्टीत नद्यांचं नद्या गंगा , पद्मा , यमुना , इच्छामती , साबरमती आणि त्यांची लाडकी कोपोई. वर्णन वाचताना जे मनात येत होते त्यात या नद्या कुठेच न्हवत्...

विसर

Image
  दिवस संपत आला. उन्हाळ्यामुळे अंधार उशिराच झाला. विजेच्या दिव्याबरोबरच सवयीने देवापाशी दिवा लावला. अगदी सवयीने हात जोडले गेले. आणि रोजचीच रामरक्षा म्हणताना मेंदूची सुई अडकली. काही केल्या पुढचा शब्द आठवेना. हजारो शब्द , चित्र डोळ्यापुढे नाचत होती पण योग्य तो काही पुढे येईना. त्याचा पार विसर पडला होता. यथावकाश तो सापडला पण काही क्षणासाठी अगदी रोज वापरातला तो शब्द पार विसरला गेला होता. कारण काही नाही म्हणजे असेलही पण कळण्यापलीकडे आत्तातरी. सध्या सोप्या भाषेत मला आठवत न्हवते. विचार केला तर नुकसान काय झाले , काहीच नाही पण एखादी गोष्ट आठवत नाहीय यानेच ती आठवेपर्यंत मन कुरतडले होते. मनाला गोष्टी विसरायची सवय असते , न आवडणारे ते बरोबर विसरते सतरा आणि एकोणिसच्या पाढ्यासारखे. पण लक्षात ठेवायचे कामही ते तेवढ्याच तत्परतेने करते. शंभर वेळा हे विसर ते विसर सांगूनही खडा न खडा लक्षात ठेवते. गडबड होते मेंदू विसरायला लागला की. मध्ये कुठेतरी वाचले होते , नदीने कितीही वाटा बदलल्या तरी तिच्या जुन्या वाटा तिला पाठ असतात. ' Memories of rivers run deep.' आपलेही असेच असेल का ? वरवर खपली धरलेल्या...

सरते वर्ष

Image
  आज ३१ तारीख , वर्ष संपणार आणि नवे देखील येणार. मागच्या वर्षीही , त्या आधीही वर्षानुवर्ष हेच चाललेय. तरीही येणाऱ्या वर्षाकडे बघण्याचा उत्साह टिकून आहे आणि जाणाऱ्या वर्षाकडे बघत , जमाखर्च मांडायची सवयही. माणसानेच दिवस रात्री , चंद्र सूर्याकडे बघत आठवडा , महिना , वर्ष या संकल्पना तयार केल्या आणि त्या मानून त्या बरहुकूम आयुष्य बेतले. ते बदलले कि अस्वस्थता , वैताग , निराशा सगळे पटकन येते. गेली दोन वर्षे हे सगळे जास्तच जाणवतेय. जवळच्यांना भेटायला सुद्धा इतका विचार , इतका प्लांनिंग आणि त्यानंतरही निर्णय आपल्या हातात नाही याची हतबलता. भौगोलिक अंतर किती लांब असते याची जाणीव , ते पार करावेच लागते वेळेला मनात अंतर नसले तरी याची बोच रोजच होत होती. गृहीत धरलेल्या घटना , वस्तू , प्रसंग या कडे विचारपूर्वक पाहायलाही याच वर्षाने शिकवले. किती प्लॅन ठरले आणि मोडले. काही वेळा दिवस , आठवडे संपत संपले नाहीत तर काहीवेळा , वेळ भुर्रकन उडून गेला. 'I trust you are well.' किंवा 'I'm fine hope the same at your end' हि formality अगदी formally लिहितानाही या वर्षीच हात थरथरले. आजचा क्षण महत...

कोळ्याचे जाळे

Image
    दोन तीन दिवसापूर्वी कोळ्याच्या जाळ्याचे छान छान आर्टिस्टिक फोटो पाहिले आणि मलाही जिकडेतिकडे अचानक कोळ्याची जाळी दिसायला लागली. ऊन-पावसाचा खेळ सुरू झाल्याने तसेही कोळी अंगणात दिसायला लागले होते. पण अंगणापेक्षा घराच्या एखाद्या चुकार कोपऱ्यात जाळे दिसले रे दिसले कि ते , सुंदर आहे का ते विणणारा कोळी कुठे आहे ?   तो निरुपद्रवी का विषारी ? तो इकोसिस्टीम मध्ये किती महत्त्वाचा त्याच्या असण्याने काय घडते ?   नसण्याने काय घडणार ?   यातला एकही विचार मनाला दुरूनही स्पर्श न करता कुंचा हातात घेतला जातो. ते जाळे काढून टाकून कोपरा कधी स्वच्छ करून लख्ख चमकवते , हेच विचार   मनात प्रकाशाच्या गती पेक्षा वेगाने येतात. मनावर चिकटलेली कोळीष्टके काढावी असे कधी येते का मनात ? जाऊदे तो विचार आज न केलेलाच बरा… पण ही सुंदर जाळी दिसायला लागली आणि एक वेगळेच सुंदर , कोळ्याचे जग दिसले. नाजूक पण चिवट. मोजून मापून पण जलद गतीने भरभर परफेक्शन साधत केलेले काम , भल्याभल्या कलाकाराला आणि यंत्राला लाजवणारे होते. आणि त्याच दिवशी उपनिषदातील एक ऋचा वाचायला मिळाली , in fact इंग्लिश ट्रा...