Posts

दिवस

Image
 " आकाशवाणी पुणे , सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे." , किंवा ' इति वार्ताः " अशी दिवसाची अनेक वर्षे सुरवात होत असल्याने सकाळी सकाळी गुगल ला काहीतरी वाजवायला लावल्याशिवाय सकाळच्या कामांना गती येत नाही. माझे आणि त्या गूगल काकूंचे फार संख्या नाही. लावायला एक सांगितले कि लागते भलतेच. कुमार गंधर्वांचा , अक्षय कुमार करणारी गूगल मग डोक्यात जाते बऱ्याचदा. चूक तिची नसतेच. एक तर माझा accent तिला कळत  नाही नाहीतर माझी आणि तिची गती मॅच होत नाही. असेच आज सकाळी काहीतरी लावताना तिने अचानक , " बुद्धा वीकली" नावाचा यु ट्यूब चॅनल लावला. वैतागून स्टॉप म्हणायच्या आत एक शांत गंभीर आवाज , 'Chant with us ." म्हणाला आणि मी थबकले , काय म्हणतोय ऐकू या म्हणून ऐकत राहिले. आधी दोन एक मिनिटे काहीतरी माहित सांगत होते पण माझे लक्ष त्यातून उडालेले होते. त्या तिबेटी भिक्कूच्या आवाजामुळे हा आता ' ओम मणी पद्मे हम ' म्हणतो कि काय ? मग त्या वाक्य बरोबर डोळ्यापुढे  आलेली अनेक बुद्ध लेण्यांमधली चित्रे , तिसरी-चौथीमध्ये असतानाची काळ्यापांढर्या दूरदर्शन वरची नेपाळ मधली स्मगल...

समज

Image
  “ मी काय सांगितले ते समजले का ?” शेकडो वेळा किती तरी जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकले असेल. कधी कधी आपणही म्हटले असेल.   पण नक्की काय असते समजणे ?   समजते म्हणजे होते तरी काय ?   मेंदूला म्हणाला काही कळते का ? का ज्या अवयवाकडून एखादी कृती अपेक्षित आहे , ती कशी-कधी -केव्हा- कां करायची याची इन्स्ट्रक्शन कशी द्यावी हे मेंदूला कळते का ? नक्की काय घडते ?   विचार केला तर , असा लख्ख प्रकाश पाडणारा एखादा क्षणच   असतो जो बऱ्याच गोष्टी , न कळणे गटातून कळले गटात टाकून देतो. पण कधी कधी न करण्यातून ,   मला कळले-उमगले- समजले हे कधी घडते तेही तर समजत नाही. मनात , मेंदूत खोलवर कुठेतरी उत्पन्न होणाऱ्या आंतरिक संवेदना ज्यांना आपण समज म्हणतो त्या मनात मेंदूत त्यांची एक सृष्टी निर्माण करत असतात. त्यात असणाऱ्या सगळ्या संवेदना वेळी आवेळी ,   मेंदू/ मन लागेल तशा वापरते आणि आपण समजले किंवा नाही समजले , हा खेळ खेळतो. कधी कधी हा खेळ इतका पटकन घडतो की समजले   कधी हे ही समजतच नाही. मग मन त्याला लेबल लावते ,   उमजले , उमगले ,   नकळत कळले , इत्यादी इत्यादी. य...

कशासाठी? जगण्यासाठी.

Image
  बराच वेळ गाडीत बसायचे असले की रेडिओला पर्याय नसतो. परवा असेच झाले. संध्याकाळी गर्दी असल्याने वेळ वाढतच गेला. त्यातच स्टेशन्स फिरवताना कुठेतरी ‘आईस्क्रीम ब्रेड’ हा शब्द ऐकला आणि कान टवकारले गेले. एबीसी रेडिओ वर आईस्क्रीम ब्रेड टेस्टिंग बद्दल काहीतरी बोलत होते. नेहमीच्या वा वा , छान छान नंतर ही पाककृती ‘डिप्रेशन एरा’ मधील आहे असे काहीतरी म्हटले गेले. कार्यक्रम संपला माझा प्रवासही संपला. पण हा शब्द काही पाठ सोडेना. जरा शोधाशोध केल्यावर खजिनाच   सापडला. अमेरिकेतील शेअर बाजार कोसळल्यावर ,   1929 ते   1939 या काळातल्या अत्यंत आर्थिक मंदीचा हा काळ.   ताज्या अन्नपदार्थांचा तुटवडा ,   आर्थिक चणचण या सगळ्यातूनही सगळ्यांना खाऊ तर घालायचं . मग या बायका , हुशार बायका असे शोध लावायच्या. वितळलेले आईस्क्रीम पीठात मिसळून ते बेक केल्यावर तयार झालेला हा पदार्थ बराच चांगला झाला होता. कारण न मिळणारे दूध , साखर त्यात होते. ज्या कुणी तो शोधला त्याचे कौतुक वाटले.   गरज शोधाची जननी याचे उदाहरणच जणू. जे काही मिळत होते त्यातच कल्पकता दाखविली गेली होती.   जेवायला काय आ...

दिवाळी

Image
नेहमीप्रमाणे दिवाळी आली. छ्या… हे वाक्य लिहिताना पण विचित्र वाटते. दिवाळी नेहमीसारखी कधीच नसते. दरवर्षी ती वेगळीच असते. आठवणीत जितक्या मागे जाता येईल तेवढ्या वेळी त्या त्यावर्षीचे काहीतरी वेगळे असतेच.  वर वर पाहता फराळ, फटाके,आकाशकंदील, रांगोळी, दिवाळीअंक, नवे कपडे असे परम्युटेशन असले तरी त्याचे कॉम्बिनेशन दरवेळी वेगवेगळे असते. एक फॅक्टर कॉन्स्टंट असतो. त्यात असणारी माणसे. पण तीही काळाप्रमाणे बदलतात किंवा त्यांचे रोल बदलतात. वय, जागा, परिस्थिती बदलते तसे यातल्या प्रत्येक आठवणीचे संदर्भ बदलतात.  प्रत्येकाच्या आठवणीत फराळ असतोच पण त्याला जोडून येणारी चव, घरभर पसरलेला तळणीचा वास, तो करणारे हात हे वेगवेगळे. त्यामुळे मनात येणारा भावही नक्कीच वेगवेगळा. माझ्याही गेल्या  अनेक दिवाळ्या चार चौघांसारख्याच. पण मागे वळून पाहिले की उरणार्या आठवणी फक्त माझ्या पुरत्याच.  शाळेत असताना दादा बरोबर बांधलेला किल्ला मला जसा आठवतो तसाच त्यालाही नाही आठवणार. त्याच्या डोक्यातला किल्ला त्यात मी असूनही त्याचा त्याचा वेगळाच असणार. ताईच्या सुंदर रांगोळी शेजारी काढलेली माझी रांगोळी छानच असायची हा...

विरजण, टोस्का, इकेबाना आणि बरेच काही…

Image
  मातृभाषा न कळणारे रोज आजूबाजूला भरपूर असतात. छोट्या छोट्या गप्पा मारता मारता , काहीतरी तुझे माझे शेअर केले जाते. आणि इथे सगळे गडबडते. साधे साधे प्रश्न असतात पण उत्तर उगीचच अवघड होऊन जाते. काय सांगायचे यापेक्षा कसे सांगायचे यातच हरवायला होते. तिकडच्या बाजूच्यांचेही असेच होत असावे बहुतेक. ओढून ताणून ,   माहीत असणाऱ्या किंवा समोरच्याला माहीत असतील असे वाटणाऱ्या शब्दांचा , चवींचा , भावनांचा , घटनांचा आधार घेत घेत संभाषणाची गाडी चालू ठेवावी लागते.   नाहीतर ‘ स्मॉल टॅाक्स’ पुरतीच मर्यादित राहते. संध्याकाळी बागेत भेटलेल्या आजीशी बोलताना ,   त्यांचे शब्द कळतात. अर्थ कळतात. कारण भाषा कळते. पण त्या एखाद्या वस्तूचे , घटनेचे वर्णन करत असतानांचे चमकलेले डोळे दिसले तरी कारण उमजत नाहीच. रेडिओवर ,   अखंड चाललेल्या गप्पांच्या मधली गाणी ऐकू तर येतात पण लॉंग ड्राईव्हच्या प्ले लिस्ट मध्ये ती कधी सिलेक्ट होत नाहीत.   हौस म्हणून चव बदल म्हणून जगभरचे पदार्थ ताटात हजेरी लावतात पण दमून भागून घरी आल्यावर किंवा चार दिवसांच्या आजारपणानंतर त्यांची चव लागत नाही. भाषांतर जमूनही ,...

दमलेली मी/ती

Image
काळजी करून करून दमलेलेच होते , म्हणून शेवटी एकदाचे ठरलेच   शांतता ती ही मनाचीच परत मिळवायचीच काय चूक ? काय बरोबर ? विचार करून करून दमलेलेच होते म्हणून शेवटी एकदाचे ठरवलेच , आता कंबर कसून कामालाच लागावे कोणत्या ? मलाच येणाऱ्या आणि मलाच आवडणाऱ्या   माहित नाही , माहित नाही म्हणून दमलेलेच होते   म्हणून मग शेवटी एकदाचे ठरले , आता शोधायचेच शोधले आणि सापडले-   मीच ,   माझ्या जवळचे   सगळे ते पार नकोसे वाटणारे माझ्या दूर दूर चे सगळे   दुष्टावा , वाईटपणा बघून बघून दमलेलेच होते म्हणून शेवटी शोधलाच माझ्याच मनातला नंदनवनातला तो कोपरा , ज्यात सामावला गेला रोजचा सगळा दिवस माझा सगळ्यातला गुंता सोडवण्यात , त्यात गुंतण्यात दमलेलेच होते   म्हणून मग शेवटी ठरवलेच , सोडवलाच नाही तो गुंता   सरळ पडलेच बाहेर गुंत्यातून बघू लागले लांबूनच त्याच्याकडे दमलेल्या मला/ तिला बघून बघूनच दमून गेले मग मात्र ठरवलेच , दमलेच होते कशाने ?   दमलेल्या मलाच , दमलेली बघण्याने! - श्रुतकिर्ती ३०/०९/२०२२

पोर्ट की

Image
थंडीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केलीय आणि उबदार ऊन जाणवायला लागलेय. हे भल्या पहाटे दुलईत गुरफटणाऱ्या आपल्यापेक्षा झाडापानांना आधी  कळते. थंडीने मरगळलेले करडे , राखाडी झालेले त्यांचे जग , पोपटी-हिरवे होता होताच सगळीकडे फुलांचे बहर दिसायला लागलेही. काही काही फुलांचे वास आधी जाणवतात तर काही माझ्याकडे न पाहता पुढेच कसे जाल ? हे सांगायला पानोपानी फुलून अस्तित्व दाखवून देतात. या सगळ्यातून स्प्रिंग आलाय , उन्हाळा आता दूर नाही हे कळलेले असतेच. माझ्या रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर , भले थोरले चार माणसांना मिळूनही कवेत न घेता येण्यासारखे अनेक हिरवेगार वृक्ष आहेत. तिथून जाताना काल अचानक वार्याच्या झुळुकीबरोबर एक मंद सुवास आला. आणि मान वर करायचे कष्टही न घेता त्या चार-पाच झाडातले आंब्याचे झाड कोणते हे कळले होते. ते पानोपानी मोहरले होते. उन्हाळा आला , कैर्या , पन्हे , लोणचे , रस आम्रखंड   आंबा बर्फी , आईस्क्रीम , मस्तानी… क्षणार्धात तीनशेसाठ डिग्री चा प्रवास जिभेने केला. पुढची पाच सात मिनिटे , आंबा या एका शब्दाने जुन्या नव्या आठवणींच्या जगात भिरीभिरी फिरवून आणले.   किती...

धडपडणे…

Image
कपाट उघडून कप्प्यातून काहीतरी काढले आणि डोके वर केले मात्र , ठण्ण्… वरच्या कपाटाचे दार उघडेच ठेवले होते. चांगलेच डोके आपटले. विचार केला तर गेल्या आठवड्यात दोन-तीनदा डोकेच आपट ,   ठेचच लाग असं झालेले होतेच आणि जाणवले आपण बर्याचदा धडपडतोय.   वरचे कपाट उघडले आहे माहीत असूनही डोके वर केलेच कसे जाते ?   हे कोडे काही सुटेना.   रोज ज्या   दारातून शंभर वेळा जातो त्याच्यात पाय अडखळतोच कसा ? दाराला हँडल असताना वेगळीकडेच धरून हात चेमटतोच कसा ? बरंही आपटापटी होवून भागत नाही. मग सुरू होते कसे झाले ? काय झाले ? ची कथा. जखम टेंगूळ   दिसणारे असले   की मग तर विचारू नका. भेटणारा प्रत्येक जण विचारणारच आणि मग त्यावर , “ हळूच काम करत जा” , “ लक्ष कुठे असते ?” “ एकावेळी एकच गोष्ट करावी” असे समोरच्याच्या नात्यावर आणि स्वभावावर अवलंबून असलेले रिप्लाय वजा सल्ले , अर्थात चांगलेच पण येतात मात्र खरे. कुठून आपटलो असे वाटयला लावतातही ते. त्यातच एखादा वयाने आणि अधिकाराने मोठा आवाज “वेंधळेपणा नको करत जाऊ” म्हणतो मात्र… आणि डोक्यात चक्र फिरायला लागते नक्की काय होते ?   म...

गणपती आला न्…

Image
  नव्या वर्षाच्या नव्या कॅलेंडर मध्ये , भराभरा पाने उलटत गणेश चतुर्थी , दसरा आणि दिवाळीची तारीख बघायचीच असते. जोडून सुट्टी आली आहे कां ? दहा दिवसांचा का अकरा दिवसांचा गणपती आहे हे बघताना , गणपतीचे वेध लागलेले असतात.   यावर्षीही असंच झालं आणि यथावकाश वाजत गाजत गणपती आले. ‘पहिले नमन ‘ म्हणत ज्याच्यामुळे सगळ्याची सुरुवात होते त्याच्या पूजेची , सजावटीची , प्रसादाची तयारीही उत्साहात चालूच होती . आजूबाजूचे वातावरणही अगदी नेहमीसारखेच गणपतीमय झाले होते. उत्साहात ,   धामधुमीत सुरू झालेला हा सोहळा एक दिवसाचा , दीड दिवसाचा , पाच दिवसाचा असे करत करत अनंतचतुर्दशीला येऊन पोहोचला. आला आला म्हणताना , गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.   मागची आवरावरी करताना डोळ्यापुढे मनात बरंच काही येत राहीले.   यावर्षी डेकोरेशन काय करायचे याच्या डायनिंग टेबलवर घडणाऱ्या चर्चा.   रंगसंगती , नक्षी यावरचे लुटुपुटूचे वाद , त्यानंतर रोजची कामे आटोपल्यावरची छोटी छोटी तयारी.   खरेदी , आवराआवरी आमंत्रणे , एक ना दोन. एक सण साजरा करण्यामागे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी. मग सगळ्याचा शेवट ...

कहानी पोटली बाबा की!

Image
  गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीच्या एका शिकाऊ ड्रायव्हरला सिग्नल ला शांतपणे उभे असताना मागून येऊन एकाने धडक दिली. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. गाड्यांचे नुकसानही झाले नाही. हे सगळे ऐकल्यावर “ चला बरे झाले काही वाईट झाले नाही”  असे आपसूकच तोंडून निघाले. पण शिकवू ड्रायव्हर पटकन म्हणाला " Now I have a car crash story to share, my first crash story" फार मजा वाटली. खरच किती गोष्टी वेल्हाळ आहोत आपण . सगळ्याची   एक गोष्ट असते.   लहानपणी चिऊ काऊ करत सुरू झालेल्या गोष्टी अशा रोजच्या अनुभवांपर्यंत येऊन पोहोचतात. मनोरंजनाचे पहिले साधन जे आपल्याला कळते तेच असते गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे.   नुसत्या कल्पना , मग त्या कल्पनांमध्ये अनुभव ,   कधी एखादा सहज न पचनी पडणार सल्ला. या सगळ्याचे मिश्रण करून तयार होणाऱ्या गोष्टी तर महत्त्वाच्याच पण त्याहीपेक्षा रंजकदार पद्धतीने त्या सांगणारा महत्त्वाचा.   सांगणारा गोष्टीची मजा वाढवतो किंवा घालवतो.   आई बाबा ,   आजी आजोबा यांच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकताना गोष्टी इतकेच त्या सांगणाऱ्याच्या आवाजाने ,   अव...