Posts

नांव ठेवतांना

Image
एका व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या तीन गिनीपिग्जची नावे ठेवायला मदत करा असे त्यांची मालकिण सांगत होती आणि नावांचा पाउस कमेंट्समध्ये पडत होता. त्या एक दिवसाच्या पिल्लांकडे बघून कुणाला एक वाटत होते तर कुणाला दुसरेच. रंग, रूप, attitude, आकार आवाज असे सगळे पाहून मजेमजेशीर नावे समोर येत होती. नांवे काय ठरली ते नंतरच्या व्हिडीओत कळणार होते पण ती ठरवण्याची पध्दत मजेशीर होती. मग मनात आले, प्रत्येक गोष्टीला निदान एक नांव आहे. कसे ठेवले गेले ते? कुणी ठेवले? कां? आणि मुख्य म्हणजे तेच कां? अगदी लहानपणी प्रश्न पडतो.. टेबलाला टेबलच  का म्हणायचे तसे. प्रत्येक शब्दाला, नावाला काहीतरी उगम असतो. कोणत्यातरी भाषेतले काहीतरी मुळ रूप असते बरा वाईट अर्थ असतो . प्रत्येक नावाची प्रचलित नावापर्यंत येवून पोचण्याची कथा वेगळीच असते. ती कळली की सगळे कोजे सुटल्यासारखे वाटते.  नावात काय असे कितीही म्हटले तरी नावातच सगळे दडलेले असते. सिकंदर म्हटला की घोडाच डोळ्यापुढे येतो मांजर नाही. मांजराला ते नांव ठेवायला काही हरकत नाही पण एखादे सिकंदर मांजर भेटेपर्यंत डोळ्यापुढे मांजर काही येतच नाही. माणसांचेही असेच होत...

ड्रीमकॅचर

Image
सध्या इथे बुक विक चालू आहे. पुस्तके वाचणे, लिहिणे, लिहिणारे, त्यात चित्र काढणारे अशा सगळ्यांना साजरे करणारा आठवडा. लहान मुलांना डोळ्यापुढे ठेवून आखला असला तरी, त्या वातावरणात सगळेच ओढले जातात. गेला आठवडाभर रोज सकाळी रेडिओवर लेखकांशी गप्पा मारण्याचे कार्यक्रम चालू आहेत.  ट्रॅफिक, रस्ता, डोक्यातले दिवसाचे विचार यातून कानावर पडणाऱ्यातले काही काहीच डोक्यात जाते. असेच एका लेखकाने दोन दिवसांपूर्वी “मी दिवसभर शांत बसून डे ड्रिमिंग करतो” असे म्हटले आणि मुलाखत घेणारी पटकन म्हणाली, “दिवास्वप्न बघणारी माणसे सगळ्यात हुशार असतात असं म्हणतात.” झाले, आपल्या कामाचे एक वाक्य मिळाल्यासारखे मी आता तेवढेच लक्षात ठेवले. बाकी मुलाखत केव्हाच विसरली. ख्वाबिदा म्हणजे तरी काय वेगळे? उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्नेच की. स्वप्न बघायला कुणाची परवानगी लागत नाही आणि आता चार-पाच स्वप्न बघून टाकू म्हणून ती बघता ही येत नाहीत. त्यांना पाहिजे तेव्हा ती पडतात आणि त्यांना पाहिजे तशीच ती पडतात. चांगली-वाईट, छान -घाण, आनंदी कधी तर कधी भयंकर त्रासदायक, यावर कंट्रोल कोणाचा? स्वप्न फक्त बघणाऱ्याची असतात. त्यात कितीही सपोर...

स्पर्श

Image
थंडीच्या दिवसात गुरफटून बसावे वाटतानाच, सकाळी सकाळी ऊनही खुणावते. आणि एकदा का उन्हात गेले की मग तिथेच बसावे वाटायला लागते. असेच दोन-तीन दिवसापूर्वी ऊन पडले. उन्हात बसायला कारण म्हणून घरातल्या, दारातल्या कुंड्यांच्या आजूबाजूला रिकामे उद्योग काढले गेले.  पहिलीच कुंडी उचलली. तिच्या बाहेरची शोभेची कुंडी आणि झाडाची कुंडी यांच्या मधल्या फटीतून पालीचे छोटेसे   पिल्लू सुरकन बाहेर आले. काय करावे ते न कळल्यासारखे पुन्हा आत गायब झाले. आता कुंडी खाली ठेवता येईना, ते चिरडले गेले तर! पण उचलून बाहेर काढू आणि अंगावर आले तर!  शेवटी मनाचा हिय्या करून छोटी कुंडी उचलली आणि अपेक्षित असल्यासारखे ते हातावर आले. ओरडून उपयोग नसल्याने मनातच किंचाळून हात झटकला.  पिलू पळाले.  त्याचा आकार तो कितीसा , माझा तो केवढा …माझ्या हातात जड कुंडी, बाहेरचा उजेड, सूर्यप्रकाश, त्याला भीती वाटणारे अनेक फॅक्टर पण घाबरले होते मी.  घाबरण्यापेक्षा तो स्पर्श नकोसा होता. काहीतरी किळसवाणे, शिसारी वाटणारे होते त्यात.  कुंडी जागेवर ठेवली. उनबीन विसरून घरात जाऊन हात धुतले. पुन्हा हात धुतले. पुन...

पिंपळपान.

Image
थंडीच्या शनिवार संध्याकाळी,चार मित्रमंडळी जमून गप्पाटप्पा चालू असताना त्यातला एक गाणारा रादर चांगले गाणारा;अरुण दात्यांचे “या जन्मावर ,या जगण्यावर” म्हणतो.  ते सूर, ते संगीत  आणि थंडीत गुरफटून बसलेले चार सहा आपलेपणाने ऐकणारे श्रोते. वातावरणाचा  परिणाम म्हणा की शब्द सुरांचा. का गोड गळ्याचा? पण प्रत्येक  शब्दावर हरवून जाणे एवढेच काम उरले होते . अचानक “इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे”  ही ओळ आली आणि काही केल्या डोळ्यापुढून ते जाळीदार पान जाईना. आपले विश्व आपल्याच परिघापूरते. त्यामुळे की काय पण त्या पानावरच्या प्रत्येक रेषेत प्रत्येक जाळीत मला माझेच भोवताल दिसायला लागले. नशिबाने एवढा समृद्ध भोवताल दिला. या विचारात हरवलेले भान, जवळच्या सगळ्या जीव ओवाळून टाकावा असे क्षण देणाऱ्यांची आठवण करून द्यायला लागले. हे सगळे गाणारे, वाजवणारे, रंगवणारे,नाचणारे आजूबाजूला असणे किती भारी असते; याची जाणीव व्हायला लागली. ते गातात, वाजवतात, नाचतात, चित्रे काढतात त्यांच्या समाधानासाठी. त्यांच्यातले त्यांचे मी पण त्यांना ते करायला लावते.  पण फायदा होतो माझ्यासारख्या बाजूला वा...

थांबा जरा !

Image
कितीदा सांगतेय थांबा जरा, हा ढीग वाढतच जातोय खरा वेळ नाहीय सध्या मला, वाचू, समजू …समजून उमजून वाचू ? का ठेवून देवू तसेच?  काहीच कळेना गोंधळच झाला क्षण काही निवांत असेच मिळूदे, सगळे भोवताल जणू धूसर धूसर होउदे अनुभवाची त्रिज्या जरा विस्तारूदे, माझ्यात डोकावायला माझ्यातून  बाहेर तर पडूदे त्या शब्दांची जादू मग खरी कळेल, भूरळ घालेल मनावर अन् कब्जा करेल त्यातच शोधेन मग छोटेसे जग, हरवून जातील शंकाकुशंकांचे ढग त्यातच मिळेल मला माझे हसणे; लिहणे, वाचणे, बोलणे आणि शांत बसणे जगणे शोधेन त्यात आगळे वेगळे, सापडेलही  हळू हळू सगळे कळलेय मला त्या ढिगाने सांगितलेले, आजून बरेच काही वाचायचे राहीलेले पण तरीही, थांबा जरा पुस्तकांनो  थोडा वेळ हवाय मला…. अत्ताच आणखी एक काम आलेय! - श्रुतकिर्ती - १७/०५/२०२४

झाडे

Image
जानेवारी आला आणि ॲास्ट्रेलियन ओपन सुरू झाली. वय वाढले की, रुटिनमधे गुंतत गेले की आणि आपले आवडते प्लेअर रिटायर झाले की खेळातील रस कमी होतो तसेच या गेम्सकडे दुर्लक्ष झाले होते. अचानक काल बातम्यांमध्ये  जोकोविच च्या आवडत्या झाडाची बातमी झळकू लागली. मेलबर्नच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्याचे एक लाडके झाड आहे. त्याला भेटून , त्याच्याशी बोलून “ He keeps himself grounded “ हे ऐकतांनाही भारी वाटत होते. रोजच्या कामाच्या रस्त्यात खुप गर्द झाडी आहे. एक झाड जातानांची कितीही ही घाई  थांबवत एक क्षण तरी नजर फिरवायला भाग पाडतेच. जवळ जवळ शंभर एक वर्ष वयाची ती सगळी झाडे. चार सहा जणांनी हात पसरले तरी बुंधा मोठाच पडेल असे ते डेरेदार हिरवे झाड. गार्डनिंग ॲास्ट्रेलिया वाला कोस्टा जेंव्हा या रस्त्यावर आला होता, तेंव्हा या सगळ्या झाडांना त्याने मिठी मारली होती असे एका शो मध्ये म्हणाला होता. काय मिळत असेल या सगळ्यांना  या अशा बुढेबाबा बरगद   टाईप झडांशी बोलून? या झाडांच्या भोवती रेंगाळतांना जाणवते त्यांची समृध्दी, पानाफांद्यांमधून मिरवणारी श्रीमंती. जवळ गेले की वार्याच्या झुळकेने थरारणारी ...

पाऊस पडतोय

Image
पाऊस पडतोय, पडतोच आहे केंव्हाचा आवाजात काय सापडतेय? शोध  चालूच आहे तेंव्हा पासूनचा असं म्हणतात; गाणार्याला ऐकू येते गाणे, कविला कविता आणि काहींना खळखळून हसणे  कान देवून ऐकतेय, डोळे मिटून ऐकतेय पावसाने कुजबुजत तरी म्हटले आहे कां गाणे? कधीतरी वाचलेले, कुठेतरी ऐकलेले पावसाने जे गायलेले आणि काळ्या काळ्या ढगांनी ते लिहलेले आज आजूनही पाऊस गातच नव्हता, धबाधबा कोसळतांना सुर होता विसरला कुठेतरी वाचलेले, कधीतरी ऐकलेले पाऊस गातो गाणे;   मग हळूच खोटे वाटू लागले पावसाला एकदा सांगितले, मनालाही समजावले विश्वास असा डगमगणार नाही माझा,  गाणाऱ्या पावसावरचा आणि आभाळाच्या लिहण्यावरचा मग ठरलेच, डोळे मिटले, कुशंकाना  हळूच दूर लोटले कानात प्राण का काहीसे, घट्ट गोळा केले कोसळणारा पाऊस आता कुजबुजत होता भिजलेल्या जमिनीवरून वाहत होता; काळ्या पांढर्या ढगांसोबत, माझेच गाणे गात होता… -श्रुतकिर्ती १३-०१-२०२४

वाबी साबी

Image
उन्हाळा आला, सुट्टी आली की प्रवास, भेटीगाठी, गमती जमती याबरोबरच आवरा आवरी नावाचे भूत माझ्या मानगुटीवर बसते.   स्प्रिंग क्लिनिंग या गोंडस नावाने ते पार ताबा घेते. सुट्टीत करूया, म्हणून बाजूला ठेवून दिलेले हे काम, जाता येता “सुट्टी आली “ असे कधी हळूच कधी ओरडून ओरडून सांगायला लागते.  मग एक दिवस त्याचा मुहूर्त सापडतो. पसारा काढायला फार मजा येते. एक करता करता, दहा गोष्टी आठवतात आणि उठून चालताना,  पाय ठेवताना, खाली जागा पुरेना एवढे भोवताली जमा होते. यानंतर येतो खरा गमतीचा टास्क. टाकून देण्याचा, फेकून देण्याचा, याचा उपयोग नाही हे लक्षात येण्याचा. एरवी असे कपडे, किरकोळ सामान, कधीतरी लागते वाले काहीतरी,  फिरकी हरवलेले,  खडा पडलेले कानातले,  संपत आलेली पेनं हे सगळे, “पाच मिनिटात आवरून होईल! निम्म टाकूनच द्यायचे” या गटात मनाने टाकून दिलेले असते.  पण आज, यातले प्रत्येक जण आपली गोष्ट घेऊन समोर आले. “हे कधी आणले ? हे कोणी दिले?  हे कधी वापरले ? “ त्यावर,  कोण काय काय म्हणाले ? असले असंख्य निरुपयोगी विचार तो पसारा संपवूच देत नव्हते.  घड्याळ पुढे ज...

दिवाळीची पणती

Image
  कॅलेंडर आले की , सणवार आणि विकएंड हे गणित मांडायला सुरुवात होते.   पुण्यात असताना सुट्टी बुडाल्याचे होणारे दुःख , इथे आनंदात रूपांतरित कधी झाले   ते कळलेच नाही. यावर्षीही दिवाळीत शुक्रवार , शनिवार , रविवार आलेत आणि त्यातही भाकड दिवस आलाय म्हटल्यावर आनंदच आनंद.  मग साधारण जूनच्या आसपास मित्रमंडळीत यावर्षी आमच्याकडे दिवाळी असे एक जण ठरवते , आणि सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहायला लागतात. मेनू प्लान होतो. ठेवणीतले कपडे बाहेर निघतात. गिफ्ट्स आणल्या जातात आणि ज्याच्या घरी कार्यक्रम ते तर दोन वीकेंड आधीपासून, घरदार आवरावरी ते घर सजवणे या सगळ्यात बिझी होऊन जातात. मेसेजेस ना पूर येतो आणि ठरलेल्या दिवशी नटून थटून सगळे वेळेत पोहोचतात. आठवणीने आणलेला फराळ , जेवायसाठी केलेले पदार्थ , दिवे , रांगोळ्या सगळ्याबरोबर उत्साहाने गप्पाच गप्पा रंगतात. खेळ होतात , टीम्स पडतात. लुटुपुटीची हार जीत होते. मेंदू खाजवत , चर्चा रंगत चहा पाण्यावर दिवसाची सांगता होते. घरी परततानाचा प्रवास मजेशीर असतो. दिवसभरातल्या गमती जमती रंगवून रंगवून एकमेकांना सांगितल्या जातात. फोटो बघताना ते क्षण परत ...

शॅापिंग कार्ट

Image
  ॲानलाईन शॅापिंगच्या चकव्यामध्ये फिरतांना मधूनच ध्यानीमनी नसलेले काहीतरी दिसते आणि मग वाया घालवलेला वेळ इतकाही  काही वाया गेला नाही असे वाटू लागते. असेच काल अचानक एका साईटवर किल्ल्यातले मावळे दिसले आणि काय भारी असे पटकन वाटले. ते प्रवास करून वेळेवर माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत , मिळाले तरी मी किल्ला कुठे करणार होते त्यांना मांडायला ? असे सगळे असूनही पाच मिनिटे मज्जा वाटलीच. किती विचित्रपणा मनाचा , कुंभारवाड्यातून असंख्यवेळा पाटीभर खेळणी आजूनही आज किती अप्रुप वाटले होते त्या मावळ्यांचे. मग छंदच लागला , अशा सगळ्या गोष्टी बघत बसण्याचा. काय नव्हते त्यात ? सगळी दिवाळी त्यात सामावलेली होती. जे जे मनात येत गेले ते कुठेतरी सापडतच होते. आणि जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही पोहचवणारे असंख्य होते. त्या पाचदहा मिनिटांच्यां ब्राउझिंगने गेल्या सगळ्या वर्षातल्या दिवाळ्या डोळ्यांपुढे नाचवल्या. आणलेले , केलेले आकाशदिवे , पणत्या , रांगोळ्या , रंग , तेल साबण उटणे….बरं नुसतं साबण दिसत नसतंच मनाला , ते आठवले की अगदी तालासुरात मोती साबणाची जहीरात हटकून आठवतेच. रांगोळीबरोबर, उदबत्तीने भोक पाड...